सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

रंग (विविध फुले)

 अभा म प सा ठाणे जिल्ला 2

आयोजित 

उपक्रम 

विषय - रंग

                                                                   


     किमया  निसर्गाची


निसर्गाची पहा किमया

फुले फुलली विविध रंगात

लाल पिवळी श्वेत निळी

 तितकीच   असे नाना गंधात



फुलांचा राजा गुलाब

रंगे, रुपे, गंधे, रुबाबदार

फुलतो विविध  मोहक  रंगात

 पहा त्याची ऐट शानदार



फुलला   मोगरा  श्वेतरंगी

माळिता तयाचा  गजरा

 गंधे चित्ताला वेधक

  सहजची  वळती नजरा


 चाफा  शेवंती  कह्णेरी

असती  विविध रंगात


असे मान तयांचा खास

खुलून दिसती गंध रूपात



  रंगात बकुळी रातराणी 

 जरी पडती   जरा मागे

सुगंधात आसती वरचढ

 आठवणींचे विणती धागे



सारी किमया विश्वंभराची

केवढी केली सृष्टी  तयार

आहे का तया निर्मीतीची भ्रांत

 पण सुख दिधले आपणा अपार



वैशाली वर्तक 


अहमदाबाद




सारस्वतांची मांदियाळी (R)

आयोजित उपक्रम क्रमांक 4

विषय... रंग 

      निसर्गाचे रंग 

सूर्य किरणांचे पृथ्थकरण

करिता मिळती सप्तरंग 

सारे रंग पहा कसे मोहक

पाहून मन प्रमोदाने दंग 


सोनसळी किरणांची ऊषा

नभात उधळण केशराची

सूर्य जस जसा चढे नभी 

लाली वाढे नभात किरणांची 


येता वर्षा काळी अवनी

सखा तियेचा सजले नटवे 

रुप तियेचे पार बदलते

नव वधुसम नेसे वस्त्र हिरवे.


जलाशय घेई रंग  नभीचा

सुंदर नभ सु -नील रंग 

रूप  प्रतिबिंबित किती सुंदर 

जन मनात भरे उमंग 



दाखवी  रंग नवे नवे

निसर्गच चित्रकार खरा

ऋतु चक्रा प्रमाणे  दावी

निसर्गाच्या विविध त-हा.


वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

8141427430



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...