शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

चित्र काव्य. मिळाला निवांत

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

उपक्रम क्रमांक 1156

दि 22/11/24

विषय .. चित्र काव्य 


   मिळाला निवांत


हवासा वाटतो एकांत 

 म्हणूनच येऊन बसला

पहात निश्चल शांत जल

गहन विचारात गुंगला


नको तो आवाज गोंगाट

हवा आहे तया एकांत 

रम्य सायंकाळी आला

एकटाच बसला निवांत


मिळविण्या ज्ञान , सिध्दी

 चित्ताला  एकांत  हवा

होता एकचित्त , सारे विसरता

एकाग्रता देते विचार  नवा    


जलात उठणारे तरंग 

करीती प्रेरित विचारांना 

प्रश्न मनीचे सोडविण्या

सहज ची शोधी उत्तरांना


वर सुंदर निळे नभ

मधे तुरळक आकाशी मेघ

प्रतिबिंबाने झाले जलनिळे 

दुरवर दिसते क्षितीज रेघ


सारे सारे कसे शांत

मिळेल मनास शांती

आला होता विचारात 

जातांना नसेल मना भ्रांती


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...