बुधवार, ८ मे, २०२४

नारळ



 सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित 

उपक्रम 348

विषय.  नारळ

   कल्पवृक्ष 


स्थान फळांत मानाचे

असे सदा नारळाला

 श्री उपपद लावून

 वदती जन श्रीफळाला


असो कार्य कुठलेही 

नाव  यादीत खचित 

मान त्याला मिळणार 

हे तर खरेच सदोदित 


स्वयंपाक घरात स्थान 

असे त्यांचे हमखास 

चटणी भाज्यांना तया विना

रुचिरा येई ना  खास


जाता समुद्राच्या किनारी 

हवेच  पिण्या नारळ पाणी 

 गोडी त्याची शमवे तहान 

 रमती युगुल गात गाणी


असे नारळाचे झाड

दावी सौंदर्याची शान

उंच उंच झावळ्या 

दिसतात किती छान 


 उपयोग  किती तयाचे

 कळते हे तर कल्पवृक्ष 

सर्वच अवयव पहाता

समजे सारेच कार्य दक्ष


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, ६ मे, २०२४

चित्र काव्य गजरे वाला


नित्य फुलांचे गजरे
विकण्यास हा बालक 
घेत हातात सकाळी 
झाला अवेळी पालक

 लावितसे हातभार 
कमविण्या चार पैसे 
विक्री करी गज-यांची
माय बाप सांगी तैसे 

खरे वय खेळण्याचे
पहा नशिबाची गती
हरवले बालपण
होतै कुंठित ती मती

वणवण फिरुनिया
दिसे पहा थकलेला 
सहजची विसावता
आडोशाला झोपलेला

जीव तयाचा लहान 
किती करणार कष्ट 
वाटे देवाने इतुके 
होऊ नव्हे  ना रूष्ट





DBSसाहित्यिक नाशिक 
आयोजित 
चित्र काव्य 
शीर्षक..मेहनती मुलगा


  वय आहे खेळण्याचे
  पहा काय दैवाची गती
  कोवळ्या वयात महेनत
  पाहून कुंठीत होते मती

  का दैवाने असे लिहावे 
खेळ मौज सारूनी दूर
लहान वयात कष्ट सहणे
 काम संपविण्याची हूरहूर 

काय करणार पोटासाठी 
खायला हवेत दोन घास
नित्य उठूनी मोल मजूरी
मेहनत करावी लागेल खास 

 स्वकष्टाने करतोय महेनत 
महेनतीचे मिळेल फळ
 दुष्कृत्य तर  करत नाही 
देवच देतोय त्याला बळ

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ मे, २०२४

चित्र काव्य सकाळ

*आले  रवी राजे नभी
उजळल्या दाही दिशा
सोनसळी किरणांत 
न्हाली मंगलमय ऊषा      

 जणु करीती वंदन
दोन तरु आदराने 
यावे रवी राजे नभी
सृष्टी फुलली मोदाने   


प्रतिबिंब आदित्याचे
अवर्णनीय   खरोखर 
शांत निश्चल जलात
दिसे किती मनोहर

थंड मंद पवनाची 
झोंबे अंगा झुळुक
करी मनाला प्रसन्न 
 नव कामास उत्सुक
असतेच सकाळ ती
नव आशा  फुलवते 
दूर  करुनी निराशा 
नव चैतन्य जाणवते

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

चित्र काव्य शब्दगंध समूह



उपक्रम रचना
विषय - चित्र  काव्य 

काय हरवले साजणी
कुठल्या  गुढ विचारात
आहे बसलेली एकांतात
गर्द हिरव्या रानात

कोठे तुझा साजण
चुकलीस का तू वाट
म्हणून दिसते उदास
पाहून रान घनदाट

येईल तुझा साजण
सोडू नकोस तू धीर
हसरी फुले सभोवती 
उगा होउ नको गंभीर

प्रकाशाचा आहे झोत
तीच  किरण आशेची
निसर्ग  देईल साथ
नको मनी चिंता निराशेची

वेलींनी  फुले  उधळली
वेच तू त्या धवल फुलांना
वेळ जाता क्षणिक
मिळेल आनंद मनाला

वैशाली वर्तक

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

शाखा

लावियलेले रोप सानुले,
बहरले आज, वृक्ष रुपात 
तया सम, शब्दगंध समूह 
झळकतोय त्याच्या यौवनात 


काव्यसंग्रहे,काव्यांच्या ध्वनी मुद्रिका
घेतल्या पहा किती भरारी 
बहरलेल्या जणु तयाच्याच फांद्या शाखा
सारस्वतांना देत सदा उभारी

जरी जाता  तया सोडून दूर 
शब्द रुपानी जीव भेटण्या आतूर 
दूरदूर परदेशी पसरल्या फांद्या 
शब्दांना भैटण्याची मनी हूरहूर 



समूह देतो विविध विषय
देतो संधी दाविण्या चुणुक 
सारस्वतांना मिळता खाद्य 
लेखणी सरसावे होऊन उत्सुक 


दरवळणारा शब्दगंध वृक्ष
करितो सेवा माय मराठीची
नको नुसते बोलणे मुखाने          
संवर्धन ,जतन करी मायबोलीची 

किती वर्णू ,   करू गुणगान 
असाच वृध्दिंगत  होवो सदैव 
दरवळावा तयाचा  किर्ती सुगंध
 Mms शब्दगंध  असे एकमेव.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
२५\४\२४



खोपा सुगरणीचा
21/4/24


पाहूनी चित्र  मी रमले
रमले, खोप्यातच मन
किती पक्षी हा कलावंत 
कलावंत, तो सुगरण

पिले सुरक्षित राखण्या.       
राखण्या,  मऊ ते आसन.       
कसा विणला पहा खोपा
खोपा , केला विना साधन


आणी तृण पाती चोचीने.                  
चोचीने गुंफली सुबक                    
 केली येण्याची जागा आत                        
आत, पहा मऊ बैठक 


ईवले पिल्लू  भिरभिरे
भिरभिरे, पहाण्या आई
आई दरडावूनी सांगे
सांगे, आतच  रहा बाई
l

 कुठलीही    आई असो
असो, पक्षी वा मानवात
काळजी  घेण्याची वृत्ती
वृत्ती, दिसते  अभिजात 

बहिणाबाईं  काव्ये खोपा.  
खोपा वर्णिलेला सुंदर 
नसता हात बोटे  तरी 
 तरी,विणीला मनोहर

वैशाली 



बुधवार, २४ एप्रिल, २०२४

चित्र काव्य खट्याळ मुलगा


सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित चित्र काव्य 
     *खट्याळ मुलगा* 


     नित्य उद्योग रोजचा
     असे  काढण्याचा खेळ 
     घेऊनिया डोई वरी
.    कसा घालवितो वेळ 

    वदतो पहा कसा तो
   आहे मी तर बलवान 
    सर्व खेळतील वस्तू 
     भासे मजला लहान 

  घेतो पूर्णतः खेळणी
  डोईवरी उचलून 
  घर भर फिरवितो
  हसतो स्वतः खळाळून 

  हसताना  गेला की तोल
  पसरला खेळ घरभर
  भरण्याची चिंता  मनी 
 भांबावला क्षणभर 

असता हुकमाचा एक्का हाती
 सुरू करितो रडण्याचा डाव 
धावून येतातच सारी मंडळी 
चेहऱ्यावर साळसूदीचे भाव 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

शेल काव्य. खोपा सिंगापूर शब्दगंध शेल रचना

        खोपा
 21/4/2024.  चित्र काव्य 
पाहूनी चित्र  मी रमले
रमले, खोप्यातच मन
किती पक्षी हा कलावंत 
कलावंत, तो सुगरण

पिले सुरक्षित राखण्या.       
राखण्या,  मऊ ते आसन.       
कसा विणला पहा खोपा
खोपा ,तयार  विना साधन

आणी तृण पाती चोचीने.                  
चोचीने गुंफली सुबक                    
 केली येण्या जागा आत                        
आत, पहा मऊ बैठक 

ईवले पिल्लू  भिरभिरे
भिरभिरे, पहाण्या आई
आई दरडावूनी सांगे
सांगे, आतच  रहा बाई

 कुठलीही    आई असो
असो, पक्षी वा मानवात
काळजी  घेण्याची वृत्ती
वृत्ती, दिसते  अभिजात 

बहिणाबाईं  काव्ये खोपा.  
खोपा वर्णिलेला सुंदर 
नसता हात बोटे  तरी 
तरी, विणीला मनोहर.






मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...