नित्य फुलांचे गजरे
विकण्यास हा बालक
घेत हातात सकाळी
झाला अवेळी पालक
लावितसे हातभार
कमविण्या चार पैसे
विक्री करी गज-यांची
माय बाप सांगी तैसे
खरे वय खेळण्याचे
पहा नशिबाची गती
हरवले बालपण
होतै कुंठित ती मती
वणवण फिरुनिया
दिसे पहा थकलेला
सहजची विसावता
आडोशाला झोपलेला
जीव तयाचा लहान
किती करणार कष्ट
वाटे देवाने इतुके
होऊ नव्हे ना रूष्ट
DBSसाहित्यिक नाशिक
आयोजित
चित्र काव्य
शीर्षक..मेहनती मुलगा
वय आहे खेळण्याचे
पहा काय दैवाची गती
कोवळ्या वयात महेनत
पाहून कुंठीत होते मती
का दैवाने असे लिहावे
खेळ मौज सारूनी दूर
लहान वयात कष्ट सहणे
काम संपविण्याची हूरहूर
काय करणार पोटासाठी
खायला हवेत दोन घास
नित्य उठूनी मोल मजूरी
मेहनत करावी लागेल खास
स्वकष्टाने करतोय महेनत
महेनतीचे मिळेल फळ
दुष्कृत्य तर करत नाही
देवच देतोय त्याला बळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा