शुक्रवार, २६ मे, २०२३

चौकट

सायबर क्राईम मधे प्रकाशित 










                                                       

 मनस्पर्शी साहित्य परिवार


*स्पर्धेसाठी*



विषय .चौकट



चौकट शब्द उच्चारता

डोळ्या समोर येते बंदिस्त आकृती 

चार कोन चार भुजांनी

बनलेली रचनाकृती


जीवन पण मानवाचे

अवस्थेत  विभागलेले चार

त्याच चौकटीत वाढतो मानव

निसर्ग  नियमानुसार.


नियमांच्या बंधनाची चौकट

पाळावीच लागते जीवनी

करत थोडा फेर बदल

मानव रचतो कल्पना मनी


बाजूस सारूया परंपरेची चौकट

घेऊया  लक्षात पर्यावरण 

थांबवुया -हास वृक्ष  वनाचा

जाती भेद  , राग द्वेषाचे करु होळीत दहन


वर्तनात असे कायद्याची चौकट

पाळावी लागते सातत्याने

न रहाता चौकटीत तियेच्या

शिक्षा भोगणे येते नियमाने



जगणे  ठराविक चाकोरीत 

कधी वाटते कंटाळवाणे

करुन चौकट  आकुंचित

मानवाला आवडे  जगणे स्वच्छंदाने



वैशाली वर्तक

अहमदाबाद

गुरुवार, २५ मे, २०२३

ओळकाव्य . ह्ददयामधले नाते हळवे. क्षण निवांत सांजचा


सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 520 
ओळकाव्य ...हृदयामधले हळवे नाते


नाते जडले अजाणता
जन्मा येताच मातेचे
हृदयी जागा अनुरागाची
वाहे झरे प्रेमळतेचे

केले जतन फुलापरी
हृदयी प्रेमाचा सागर
साहुनिया अनंत कष्ट
दिली भरुनी सुखाची घागर

होता  जरा दुखापत 
करी कंपित हृदयाला
नाते हृदयामधले हळवे
अस्वस्थ करी  मनाला

काळ लोटता जीवनाचा
बालक झाली  छत्रछाया
हृदयामधले नाते हळवे
बहरावे देण्या त्यांना माया


वैशाली वर्तक
अहमदाबाद


ओळकाव्य 

क्षण निवांत सांजेचा             26/6/2020

सांजवेळी सय येते
प्रत्येकास स्वगृहाची
जेथे मिळे मनःशांती
भेट होता स्वजनांची

वाट पाहती बालके
रंगलेली खेळण्यात
दारी उभी गृहलक्ष्मी
होई क्षणी आनंदात

तेजाळते सांजवात
करी मना प्रफुल्लित
शांत प्रसन्नता भासे
घर होई उल्हासित

शब्द गुंजताती कानी
रामरक्षा पठणाचे
**क्षण निवांत सांजेचा**
मनशांती मिळण्याचे

करुनिया गुज गोष्टी
घेउनिया हाती हात
मिळे मोद क्षणभर
मन रमे आठवात

वैशाली वर्तक


सोमवार, २२ मे, २०२३

लेख ...भावनांना रफू करून पहावे काव्य भावनांना कविता भावना


*स्पर्धेसाठी* 

मनस्पर्शी स्पर्धा समूह
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या जेष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ नीलांबरी गावू
यांच्या वाढदिवसानिमित्त
विशेष भव्य राज्यस्तरीय लेखन स्पर्धा

विषय...*भावनांना रफू करुन पहावे*


     मन आपणास माहीतच आहे, सतत विचार करत असते. ते कधीच स्वस्थ बसत नसते. झोपलेल्या मनात पण विचार चालू असतात.. कधी कधी या झोपलेल्या मनात दिवस भराच्या विचारांचे काहूर माजता स्वप्न रुपात ते विचार मनी विहरतात येतात व  मग ...स्वप्नात घाबरून जागे होणे अथवा जागे होताच," ‌अरे काय भयंकर स्वप्न पाहिले ! वा  कधी काय मजेचे स्वप्न पाहिले!   तर कधीss कधी.. काय अर्थच नाही  त्या स्वप्नाला असे आपण उद्गार काढतो."
     तर एकंदर काय मनात चालणारे विचार ...हया विचारात अनेक *भावना* दडलेल्या असतात. त्या भावनानुसार मनुष्य  कृतीत आचरण करतो वा कृतीला नियंत्रित करतो. .मनातील विचारांना,कल्पनांना जणु.......

नाना भावना असती
मनातल्या कल्पनांचे
 काही उदास निराश 
 मनोभाव विचारांचे
                 असे म्हणता येईल .  या कल्पना कधी उत्साही ,प्रेरणादायी, आनंदीदायी. तर कधी सुखद, दुःख:द , तर कधी सकारात्मक वा नकारात्मक , निराशावादी... अशा नवरस पूर्ण भावना असतात.  व त्या नुसार वर म्हटल्याप्रमाणे मन काम. कार्य करित असते.
        आपणास राग येतो .उद्वेग येतो तेव्हा या रागाच्या भावना मनात उचंबळून येतात. व आपण कटकट वा धुसफुस ..वा चिडचिड करतो. तर तेव्हा त्या भावना नियंत्रित करणे म्हणजे रागाच्या भावना रोकणे.रागास मुरड चालणे, मनात त्या भावना दाबण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे भावनांना मुरड घालणे....पणआपणास राग का आला ?
 कधी कधी असेही होत असते की आपल्याच मनात सारखे व्हावे व तसे न झाल्यास राग राग करणे. तेव्हा
आपण मनास समजवावे. भावनांना ना रफू करावे. नेहमी च आपलेच घोडे का चालवायचे? कधी इतरांचे पण ऐकले पाहिजे ना! तर रागाची भावना शमते.
       कधी उगाच नको तितकी भीती बाळगून मनावर  भितीचे सावट पांधरुन  मनावर दडपण आणणे.
ही पण भितीची दडपण भावना आहे. ती विचाराने.. चार लोकांत बोलून . एकमेकांचे विचार ऐकून सहज दूर करता येते.
       भावना या अगदी जन्मापासून निर्माण होतात. बाल्यावस्थेत बोलता येत नाही पण स्पर्शाने
त्या उमजतात. ...उगाच का तान्हे बाळ मातेच्या स्पर्शाने रडत असता शांत होते. व त्या भावना मातेला सहज कळतात. प्रेम भावना. जशी आनंद दायी तशी कष्ट दायी पण असते.  प्रेम असूनही कधी काळजी पोटी रागावून बोलावे लागते.  जसे आरोग्यासाठी अमुक करणे वा खाणे अयोग्य असल्यास ऐकत नसेल तर प्रेमापोटी काळजीने विरोध करावा लागतो. प्रेम असले तरी भावनांना रफू घालून  ..आवर घालून वागावे लागते.
     काही भावनांना मात्र वेळीच अडवाव्या लागतात. हो. उदाहरणार्थ   द्वेषाची भावना. वाईट कृत्याची भावना
 खोटे बोलणे ..चोरी लबाडीची भावना. यांना वेळीच  आळा घातला पाहिजे. या साठी रामदासांचे मनाचे श्लोक भावनांना काबूत ठेवू शकतात.  मनाला  चांगली शिकवण देणारे आहेत...काय करावे  व काय करू नये या विचारांचे सदा शिंपण  श्लोकातून मिळाल्याने . चांगल्या भावनांचे नीट रफु काम होते. बिंबवले जातात.  व सात्विकचे विचार कल्पना सदैव मनी रुजतात. आणि त्याच कल्पनेतून सात्विक भावना मनात जन्मतात.. उज्वल जीवनास बालपणीचे संस्कार कामी येतात. त्या भावनांना घेऊन खंबीर मने  जीवनी उभे राहू शकतात.

   त्यामुळे  मनात नेहमीच सकारात्मक भावना चमकत्या ठेवा. ज्या आनंद, उत्साह ,यशसंपादन करण्यास मदत रूप ठरतात . नकारात्मक भावनांना दूर सारून सदा आनंदाची बातमी ऐकत जगावे.
      तसेच मनात येणारे विचार कल्पना ज्या भावना तयार करतात त्यातील महत्वाची भावना म्हणजे
*तडजोडीची भावना*... जी अत्यावश्यक आहे . तडजोडीची भावना ज्या व्यक्तीत असते त्याला जीवन सहज आनंदाने जगता येते. आपल्याला मनीच्या भावनांना मुरड घालून. ..व जसे वय वाढते तसतशी  ही भावना आलीच पाहिजे.   जेथे  तेथे..आमचे दिवस.  आमचा काळ .. आम्ही /मीपण. सोडून देऊन  वाणीत  ..भाषेत मधाळ मृदू शब्द   प्रेमळ भावनांचे  धागे घेऊन परिस्थिती हाताळली पाहिजे. गोड वाणीनेच जग जिंकता येते. नाही का?
         संयम ही पण मनाची  भावना. संयम बाळगून.. संयमाचा धागा सर्वच ठिकाणी कुशलतेने रफू करण्यासाठी फार उपयोगी ठरतो.संयम ही मनात दाटून भरलेली भावना अती गरजेची असते. संयम... धीर. या पण मनाच्या नाजुक भावना. संयमाच्या ...धीराच्या  धाग्याने विचारांना रफू करता यशाची पावले आपोआपच खुणावतात. जीवनी यशाची सकाळ सदैव हसत उजळते. 
      तर असा खेळ मनीच्या कल्पनांचा विचारांचा   म्हणजे च भावनांचा  जीवनक्रम आयुष्य भर चालूच असतो.
 आता काही जन /लोक फारच भावना प्रधान... तर काही भावना शुन्य असतात. ते त्यांच्या बालपणी
झालेल्या जडण घडणावर   अथवा बालपणीच्या त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पण फार भावना
प्रधान माणसे हळव्या मनाची असतात. जराही  दु:खद विचार सहन करु शकत नाही. त्यांना खंबीर भावनांच्या  धाग्यांचे रफू करावे लागते. पण येता परिस्थिती त्याप्रमाणे बदल घडत जातो.कणखर पणा आणावा लागतो. तरच जीवनी पुढे पाऊल पडते. नाजुक तेरा कणखर धाग्याचे रफउकआम काळाच्या ओघात केलं जाते.
      स्वातंत्र्य वीरांना.... वीर जवानांना. .. घरची ओढ ...कुटुंब *प्रेमाची भावना* नसते असे नाही पण मनात देशभक्तीचे विचार सतत थैमान घालत होते त्यामुळे विचारांना कल्पनांना *देशभक्त ची भावना* जागृत झाल्याने   बलिदान करून देशास स्वातंत्र्य  प्राप्त करून दिले व वीर जवान देश सेवेत शहीद होत आहेत.
       तर एकूण काय मनातील विचारातून कल्पनातून भावना  जन्म घेतात. आपणच ठरवावे  कुठे भावनांना मुरड घालावी व यशस्वी जीवन आनंदाने जगावे.


वैशाली वर्तक
अहमदाबाद




कमलविश्व राज्यस्तर स्पर्धेसाठी 
मासिक भव्य राज्यस्तरीय लेखन स्पर्धा 
दि ३०\६\२५
विषय ....भावना
शीर्षक.


नाना असती  भावना
मनातल्या कल्पनांना 
 कधी उदास,  तर निराश 
 मनोभाव  दावी  विचारांना

मन असते चंचल
  करी क्षणोक्षणी विचार 
   कल्पनेत होता रममाण 
 भावनांचे दर्शन अपार 


 मनातील भाव दाखवी
भावना  मुखावर क्षणात
विरहाचे भाव दिसती
नारीच्या वागण्यात 

भावना असे संवेदना 
 प्रसंग येतो जसा
अंतर्मनीच्या भावनांचे
दर्शन घडे तसा


घडता भिषण प्रसंग 
विमान अपघाताचा
 दु:खी भावना मनाने
धावा सुरु मनी देवाचा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, १६ मे, २०२३

भटकंती

 अ भा म सा पण कल्याण डोंबिवली महानगर समूह 2

आयोजित उपक्रम क्रमांक 547

विषय....भटकंती


करावीत देशाटन

भटकंती ही कामाची

वृध्दी होतसे ज्ञानात

 शिदोरी ती अनुभवाची


निहाळावा  रम्य निसर्ग

तोची असे आद्य गुरू

देतसे सहज शिकवण

ज्ञानार्जन होते सुरू


तडजोडची शिकवण

देतअसे भटकंती

कसे जुळते घेणार

येता साद्य परिस्थिती .


शिकावी लागेल विनयता

स्वभाव होई खेळकर

आरोग्यास लाभदायी

भटकंती खरोखर


वैशाली वर्तक

अहमदाबाद

मंगळवार, ९ मे, २०२३

चित्र काव्य ....कसे सांगू ?

 खूप आहे सांगायचे

कशी करू सुरूवात

माझे मला उमजेना.            

करी विचार मनात.               



 मन गुंतले विचारी

गुज असती अधरी

सांगू कसे तुला ते

शब्द आठवी अंतरी


मनी केलाय विचार

 लिहू शब्द सांगण्यास

वही लेखणी घेऊनी

 मन स्तब्ध लिहिण्यास


सख्या तूची ते जवळी

शब्द होतील ते व्यक्त

तुझ्या भेटण्याचे बघ 

मम मन होई रिक्त




सांगू कसे तुला ते

माझे मला उमजेना.   

केव्हा तुला उमजेल 

माझे मला कळेना 

माझ्या मनातल्या त्या





मांडून शब्द मनीचे.  केले विचार न्यारे  

वदण्यास  मी पहाते

मजलाच न समजे

अधरीच का न येती


सखयातुला कितीदा.  

ंसांगू तुला जवळये


सखया  तुची  जवळी ये

शब्द होतील ते व्यक्त

तुझ्या भेटण्याचे बघ 

मम मन होई रिक्त


बुधवार, ३ मे, २०२३

श्वास

 शेतकरी साहित्य मंच

आयोजित उपक्रम

दि १४\४\२३

विषय.. श्वास


*श्वास माझ्या अंतरीचा*


मनी सदा एक ध्यास

तुझ्या नाम स्मरणाचा

सदाकाळ विठुराया

*श्वास* माझ्या अंतरीचा


ध्यानी मनी स्वप्नी मज

तूच दिसे सदाकाळ

कधी नाही चुकविली

वारीतील ती सकाळ


तूच असे पांडुरंगा

श्वास भक्त मंडळींचा

सांग आता तू उपाय

पंढरीच्या दर्शनाचा


 स्मरु तुज चिंतनात

 नाचू गाऊ भजनात

श्वास माझ्या अंतरीचा

पूजू तुजला मनात


वैशाली वर्तक  

अहमदाबाद

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

मी अशी मी तशी | २ तेव्हा मी अशी


 फुलोरा कलेचे माहेरघर

उपक्रम

एक पाऊल परिपूर्णते कडे

पहिल्या ओळीत १० दुसऱ्या ओळीत ८शब्द

विषय....अशी मी ...असा मी

शीर्षक.. स्व -भावाचे गुणगान


          कोण म्हणे *मी अशी मी तशी* 

            बोला , बोला तुम्ही काही

           माझ्यात फरक तसुभर

            कधी, पडणार नाही             १


            नेहमीच वाटते जनांना 

            आहेची मी थोडी शिष्ट

            पण ,खरच सांगते तुम्हा

            नाहीचय, मी गर्विष्ठ              २


           लागलाय छंद लेखनाचा 

           सेवा निवृत्त जीवनी

           तोची असे माझा  विरंगुळा 

           मोद मिळे मनोमनी. ‌‌           ३ 


          रहाते  रममाण माझी मी

          सदा माझ्याची छंदात 

          अन् मिळतो परमानंद 

          मला दिवस भरात             ४


         आहेच हं , मात्र मी मनाने.  

         अतिशय स्वाभिमानी 

         माझ्या जीवनातील काळात

        खरोखरी  समाधानी    ५


वैशाली  वर्तक

अहमदाबाद

गुजरात



सिद्ध  साहित्यिक  समूह 

काव्य  लेखन उपक्रम

विषय - अशी मी तशी मी

====================


अशी मी तशी मी

 म्हणा तुम्ही  काही 

फरक माझ्यात

कधी होत नाही


 वाटते जनांना 

आहे थोडी शिष्ट

 खरच  सांगते

नाही मी गर्विष्ठ


छंद  लिखाणाचा

निवृत्त  जीवनी

देतो विरंगुळा

मोद मनोमनी


रमते माझी मी 

माझ्याच छंदात

मिळतो स्वानंद

दिवस भरात


आहेच मनाने 

सदा स्वाभिमानी

 मम  जीवनात

   सुखी समाधानी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद





कल्याण डोंबिवली महानगर २

आयोजित उपक्रम

काव्यलेखन

विषय ... तेंव्हा तू तशी




पाहिलीत माझीच रुपे

किती बदलेली सहज

होते अवखळ बालपणी

सांगण्याची नसे गरज


संपताच बाल्यकाळ

झाले  समजूतदार

शिस्त लागता मनाला 

पहाता जाहले ऐटदार


साधी  पण  ऐटबाज

अंगिकारली रहाणी

चार लोकांत उठून दिसावी

अशी कर्तृत्वाने देखणी



 म्हणती जन मजला

 होती तू सदा अभिमानी

खरं सांगते तुम्हाला

आहे मी सदैव  स्वाभिमानी


   म्हणा तुम्ही *तू तेंव्हा तशी*

   घेतले मी अनुभव जीवनी

   जाहले अनुभवाने शहाणी

    हेच मात्र खरे ,सांगते या क्षणी


वैशाली वर्तक

अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...