आयोजित उपक्रम क्रमांक 520
ओळकाव्य ...हृदयामधले हळवे नाते
नाते जडले अजाणता
जन्मा येताच मातेचे
हृदयी जागा अनुरागाची
वाहे झरे प्रेमळतेचे
केले जतन फुलापरी
हृदयी प्रेमाचा सागर
साहुनिया अनंत कष्ट
दिली भरुनी सुखाची घागर
होता जरा दुखापत
करी कंपित हृदयाला
नाते हृदयामधले हळवे
अस्वस्थ करी मनाला
काळ लोटता जीवनाचा
बालक झाली छत्रछाया
हृदयामधले नाते हळवे
बहरावे देण्या त्यांना माया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
ओळकाव्य
क्षण निवांत सांजेचा 26/6/2020
सांजवेळी सय येते
प्रत्येकास स्वगृहाची
जेथे मिळे मनःशांती
भेट होता स्वजनांची
वाट पाहती बालके
रंगलेली खेळण्यात
दारी उभी गृहलक्ष्मी
होई क्षणी आनंदात
तेजाळते सांजवात
करी मना प्रफुल्लित
शांत प्रसन्नता भासे
घर होई उल्हासित
शब्द गुंजताती कानी
रामरक्षा पठणाचे
**क्षण निवांत सांजेचा**
मनशांती मिळण्याचे
करुनिया गुज गोष्टी
घेउनिया हाती हात
मिळे मोद क्षणभर
मन रमे आठवात
वैशाली वर्तक
सांजवेळी सय येते
प्रत्येकास स्वगृहाची
जेथे मिळे मनःशांती
भेट होता स्वजनांची
वाट पाहती बालके
रंगलेली खेळण्यात
दारी उभी गृहलक्ष्मी
होई क्षणी आनंदात
तेजाळते सांजवात
करी मना प्रफुल्लित
शांत प्रसन्नता भासे
घर होई उल्हासित
शब्द गुंजताती कानी
रामरक्षा पठणाचे
**क्षण निवांत सांजेचा**
मनशांती मिळण्याचे
करुनिया गुज गोष्टी
घेउनिया हाती हात
मिळे मोद क्षणभर
मन रमे आठवात
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा