सोमवार, २२ मे, २०२३

लेख भावनांना रफू करून पहावे

*स्पर्धेसाठी* 

मनस्पर्शी स्पर्धा समूह
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या जेष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ नीलांबरी गावू
यांच्या वाढदिवसानिमित्त
विशेष भव्य राज्यस्तरीय लेखन स्पर्धा

विषय...*भावनांना रफू करुन पहावे*


     मन आपणास माहीतच आहे, सतत विचार करत असते. ते कधीच स्वस्थ बसत नसते. झोपलेल्या मनात पण विचार चालू असतात.. कधी कधी या झोपलेल्या मनात दिवस भराच्या विचारांचे काहूर माजता स्वप्न रुपात ते विचार मनी विहरतात येतात व  मग ...स्वप्नात घाबरून जागे होणे अथवा जागे होताच," ‌अरे काय भयंकर स्वप्न पाहिले ! वा  कधी काय मजेचे स्वप्न पाहिले!   तर कधीss कधी.. काय अर्थच नाही  त्या स्वप्नाला असे आपण उद्गार काढतो."
     तर एकंदर काय मनात चालणारे विचार ...हया विचारात अनेक *भावना* दडलेल्या असतात. त्या भावनानुसार मनुष्य  कृतीत आचरण करतो वा कृतीला नियंत्रित करतो. .मनातील विचारांना,कल्पनांना जणु.......

नाना भावना असती
मनातल्या कल्पनांचे
 काही उदास निराश 
 मनोभाव विचारांचे
                 असे म्हणता येईल .  या कल्पना कधी उत्साही ,प्रेरणादायी, आनंदीदायी. तर कधी सुखद, दुःख:द , तर कधी सकारात्मक वा नकारात्मक , निराशावादी... अशा नवरस पूर्ण भावना असतात.  व त्या नुसार वर म्हटल्याप्रमाणे मन काम. कार्य करित असते.
        आपणास राग येतो .उद्वेग येतो तेव्हा या रागाच्या भावना मनात उचंबळून येतात. व आपण कटकट वा धुसफुस ..वा चिडचिड करतो. तर तेव्हा त्या भावना नियंत्रित करणे म्हणजे रागाच्या भावना रोकणे.रागास मुरड चालणे, मनात त्या भावना दाबण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे भावनांना मुरड घालणे....पणआपणास राग का आला ?
 कधी कधी असेही होत असते की आपल्याच मनात सारखे व्हावे व तसे न झाल्यास राग राग करणे. तेव्हा
आपण मनास समजवावे. भावनांना ना रफू करावे. नेहमी च आपलेच घोडे का चालवायचे? कधी इतरांचे पण ऐकले पाहिजे ना! तर रागाची भावना शमते.
       कधी उगाच नको तितकी भीती बाळगून मनावर  भितीचे सावट पांधरुन  मनावर दडपण आणणे.
ही पण भितीची दडपण भावना आहे. ती विचाराने.. चार लोकांत बोलून . एकमेकांचे विचार ऐकून सहज दूर करता येते.
       भावना या अगदी जन्मापासून निर्माण होतात. बाल्यावस्थेत बोलता येत नाही पण स्पर्शाने
त्या उमजतात. ...उगाच का तान्हे बाळ मातेच्या स्पर्शाने रडत असता शांत होते. व त्या भावना मातेला सहज कळतात. प्रेम भावना. जशी आनंद दायी तशी कष्ट दायी पण असते.  प्रेम असूनही कधी काळजी पोटी रागावून बोलावे लागते.  जसे आरोग्यासाठी अमुक करणे वा खाणे अयोग्य असल्यास ऐकत नसेल तर प्रेमापोटी काळजीने विरोध करावा लागतो. प्रेम असले तरी भावनांना रफू घालून  ..आवर घालून वागावे लागते.
     काही भावनांना मात्र वेळीच अडवाव्या लागतात. हो. उदाहरणार्थ   द्वेषाची भावना. वाईट कृत्याची भावना
 खोटे बोलणे ..चोरी लबाडीची भावना. यांना वेळीच  आळा घातला पाहिजे. या साठी रामदासांचे मनाचे श्लोक भावनांना काबूत ठेवू शकतात.  मनाला  चांगली शिकवण देणारे आहेत...काय करावे  व काय करू नये या विचारांचे सदा शिंपण  श्लोकातून मिळाल्याने . चांगल्या भावनांचे नीट रफु काम होते. बिंबवले जातात.  व सात्विकचे विचार कल्पना सदैव मनी रुजतात. आणि त्याच कल्पनेतून सात्विक भावना मनात जन्मतात.. उज्वल जीवनास बालपणीचे संस्कार कामी येतात. त्या भावनांना घेऊन खंबीर मने  जीवनी उभे राहू शकतात.

   त्यामुळे  मनात नेहमीच सकारात्मक भावना चमकत्या ठेवा. ज्या आनंद, उत्साह ,यशसंपादन करण्यास मदत रूप ठरतात . नकारात्मक भावनांना दूर सारून सदा आनंदाची बातमी ऐकत जगावे.
      तसेच मनात येणारे विचार कल्पना ज्या भावना तयार करतात त्यातील महत्वाची भावना म्हणजे
*तडजोडीची भावना*... जी अत्यावश्यक आहे . तडजोडीची भावना ज्या व्यक्तीत असते त्याला जीवन सहज आनंदाने जगता येते. आपल्याला मनीच्या भावनांना मुरड घालून. ..व जसे वय वाढते तसतशी  ही भावना आलीच पाहिजे.   जेथे  तेथे..आमचे दिवस.  आमचा काळ .. आम्ही /मीपण. सोडून देऊन  वाणीत  ..भाषेत मधाळ मृदू शब्द   प्रेमळ भावनांचे  धागे घेऊन परिस्थिती हाताळली पाहिजे. गोड वाणीनेच जग जिंकता येते. नाही का?
         संयम ही पण मनाची  भावना. संयम बाळगून.. संयमाचा धागा सर्वच ठिकाणी कुशलतेने रफू करण्यासाठी फार उपयोगी ठरतो.संयम ही मनात दाटून भरलेली भावना अती गरजेची असते. संयम... धीर. या पण मनाच्या नाजुक भावना. संयमाच्या ...धीराच्या  धाग्याने विचारांना रफू करता यशाची पावले आपोआपच खुणावतात. जीवनी यशाची सकाळ सदैव हसत उजळते. 
      तर असा खेळ मनीच्या कल्पनांचा विचारांचा   म्हणजे च भावनांचा  जीवनक्रम आयुष्य भर चालूच असतो.
 आता काही जन /लोक फारच भावना प्रधान... तर काही भावना शुन्य असतात. ते त्यांच्या बालपणी
झालेल्या जडण घडणावर   अथवा बालपणीच्या त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पण फार भावना
प्रधान माणसे हळव्या मनाची असतात. जराही  दु:खद विचार सहन करु शकत नाही. त्यांना खंबीर भावनांच्या  धाग्यांचे रफू करावे लागते. पण येता परिस्थिती त्याप्रमाणे बदल घडत जातो.कणखर पणा आणावा लागतो. तरच जीवनी पुढे पाऊल पडते. नाजुक तेरा कणखर धाग्याचे रफउकआम काळाच्या ओघात केलं जाते.
      स्वातंत्र्य वीरांना.... वीर जवानांना. .. घरची ओढ ...कुटुंब *प्रेमाची भावना* नसते असे नाही पण मनात देशभक्तीचे विचार सतत थैमान घालत होते त्यामुळे विचारांना कल्पनांना *देशभक्त ची भावना* जागृत झाल्याने   बलिदान करून देशास स्वातंत्र्य  प्राप्त करून दिले व वीर जवान देश सेवेत शहीद होत आहेत.
       तर एकूण काय मनातील विचारातून कल्पनातून भावना  जन्म घेतात. आपणच ठरवावे  कुठे भावनांना मुरड घालावी व यशस्वी जीवन आनंदाने जगावे.


वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...