गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

उंबरठा


काव्यलेखन

विषय ... "उंबरठा"


ओलांडूनी जया प्रवेशते घरा 

आहे मान तव उंबरठ्याला

कुंपण आहे तेची कुटुंबाचे

मान मर्यादा असती तयाला !


नित्य कौटुंबिक घडामोडी

सदैव चालीरीती घरादाराला 

आणू नयेत चव्हाट्यावरी 

चूकभूल द्यावी उंबरठ्याला !


वधू माप ओलांडून जाते

पतीच्या घराचा उंबरठा 

उजळण्या दोन कुळे

चालविते संस्कृतीच्या वाटा !


 संस्काराचे जपते बंधन

 राखून थोरांचा सन्मान 

 ध्यानी उंबरठाची मर्यादा 

वाढविते कुटुंबाची शान !


मर्यादा आपापल्या घराची

पाळावी लागते प्रत्येकाला 

तरच कुटुंब आदर्श ठरते

वेळोवेळी मान उंबरठ्याला !


आपले संस्कार व संस्कृती

कर्माचरणाने टिकवून ठेवा 

समतेचे महान राष्ट्र म्हणवून 

जगाला वाटू द्यावा हेवा





आ भा म भा प ठाणे जिल्हा 2

आयोजित उपक्रम क्रमांक 592

विषय - उंबरठा


ओलांडूनी. प्रवेशितो घरा

 मान असे त्या उंबरठ्याला

कुटुंबाचे असते  ते कुंपण

देई मान -मर्यादा  वागण्याला



कुटुंबाच्या नित्य घडामोडी

चालती सदैव घराघरातूनी

न आणाव्या चव्हाट्यावरी

उंबरठ्याची मर्यादा असे मनातूनी


वधू ओलांडून प्रवशिते

उंबरठा पतीच्या घरचा 

उजळण्या दोन कुळे

चालविण्या वारसा संस्कृतीचा.


 जपते संस्काराचे  बंधन

 राखून सन्मान थोरांचा

 ध्यानी  उंबरठाची मर्यादा 

मान वाढविते कुटुंबाचा


कुंपण मर्यादा  घराची

पाळावी  लागते प्रत्येकाला 

तरच कुटुंब  ठरते आदर्श

मान  देत उंबरठ्याला


आपले संस्कार व संस्कृती

करिताती वेळोवळी जाण

म्हणूनच टिकेल राष्ट्र- धर्म 

मनाच्या उंबरठ्याला द्यावा मान


वैशाली वर्तक

अहमदाबाद


मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

आदर्श

सर्वधर्म  समभाव साहित्य मंच
आयोजित 
उपक्रम 
काव्य लेखन 
विषय - आदर्श 


जीवनात दिले संस्कार 
सांगून गोष्टीच्या  चार
करण्या वर्तन जीवनात
थोर व्यक्तीचे ऐका विचार 

बोल मातेचे असती सदा
बनविण्या जीवन आदर्श 
अनुसरता विचार  तियेचे
जीवनात होतो उत्कर्ष

निसर्गाचा पहा आदर्श  
सूर्य चंद्र तारे येती नेमाने  
प्रकाशतात म्हणूनच
ऋतुचक्र घडती क्रमाने

 स्वातंत्र्य वीरांच्या आदर्शाने
भारतभूला शोभवू विश्वात 
आत्मनिर्भयाने करु प्रगती 
हाच रुजवू विचार  मनात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

भूक

भरारी प्रीमियर लीग पर्व ४
फेरी क्रमांक ६ 
सुवर्णसंधी फेरी
प्रकार - मुक्त छंद
विषय - भूक


भूक  ही आंतरिक जाणीव.. मनाची.
नसते ती जाणीव  फक्तनी फक्त
रसनेची वा जीभेची
पोटात उठता आगीचा डोंब
रसना  दाविते इच्छा अन्नाची.
भूक असते ईच्छांची जाणीव
आंतरिक मनाची   आशा
मिळण्याची प्रबळ कामना.
ती असते शाररिक ,मानसिक
कधी आध्यात्मिक  तर कधी बौध्दिक .
भूक असते वाचनाची
होता जाणीव वा प्रबळ कामना
पाय वळतात वाचनालयाकडे
जेथे मिळते खाद्य  वाचनाचे
मन होते प्रसन्न  आनंदित.
भूक असते मायेची
प्रेमाने डोक्यावरून  
हात फिरवावा या जाणीवेची,
माहेरीआलेल्या लेकीला
आईच्या प्रेमळ कुशीची.
भूक असते कानांना पण,
बाळाचे बोबडे बोल ऐकण्याची
तशीच भूक संगीत प्रेमींना
आवडते संगीत स्वर
ऐकण्यास अधीर झालेल्या कानांना सूरांची.  
एवढेच नव्हे  भूक असते 
धरेला  पण,तप्त मातीला
मृग जलधारांची
आसुसलेली भेगाळलेली  तिची काया
जलधारा पडताच 
काळी माय तृप्त होऊनी
मृदगंध पसरवूनी
देते  समाधानाची पावती.
भूक असते  सर्वांना लक्ष्मी प्राप्तीची
एक दोन तीन  गाड्या,तसेच
 घरे मिळवण्याची
भूक आहे अनादी काळापासून.
कधी भूक बनविते 
माणसास अमानुष
भूक वासनेच्या बळी नेणारी.
मानव होतो महत्वाकांक्षी
प्राप्त करण्या भूकेला
अशी ही भूक आहे नितांत.

कोड क्रमांक 5181

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

आठवण येता तुझी. \फक्त आभास आभास हा

अभा मसा परिषद शब्दभाव साहित्य 
आयोजित 
उपक्रमसाठी
आष्टाक्षरी काव्य लेखन
विषय - आठवण येता तुझी
  तुझ्या  आठवणीत

आठवण तुझी येता
दुःख  दाटते अंतरी
काही सुचेना मजला
काय करु सांग तरी

जाणे तुझे गरजेचे
घेण्या जीवनी भरारी
समजून सांगी मना
देत   मनास उभारी

आठवण येता तुझी
सारे जाते विसरून
वाट पहाते क्षणाची
 वाटे यावे परतून 

वाटे आलाची समीप
पण असेची तो भास
आठवण येता तुझी 
लागे  भेटण्याची आस

जीव होई वेडा पिसा
  मनी तुझाची  तो ध्यास
आठवांच्या कल्पनेत
  उरी अडकतो श्वास.

आठवण येता तुझी
नेत्र  पहा पाणावले
अश्रू सदा लपवित
जीणे प्राप्तची  जाहले

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


आभास हा 

मन धावे तुज पाशी
जरी तू गेलास दूर
नसता तू जरी जवळी
भासाने  भरे  मनी ऊर


जसे राधेला दिसे शाम
क्षणभर  चैन  नसे मनाला
जळी स्थळी दिसे तिजला
भासे जवळी तूची   आला 

 किती समजावू मनाला
 आहे  हा आभास सारा
 तरी   पाहे वळूनी वळूनी
  दिन रात खेळ चाले न्यारा

नको वाटे जीणे आभासाचे
येऊन दाखव तव मुख
तुज भेटीस मन आतुरले
मिळू दे मनाला सुख

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

स्वपरिचय काव्यातून


भारतीय  साहित्य  व सांस्कृतिक  मंच
आयोजित  उपक्रमासाठी
काव्य लेखन  स्व परिचय

     परिचय काव्य

नाव माझे वैशाली  वर्तक 
  जन्म भुमी कर्मभुमीचा मान
अहमदाबाद च्या गुजरातला तरी,
मराठी  भाषेचा मजला अभिमान

राहीले गुजरात मधे तरी
  मराठी माध्यम होते शिक्षणाचे
घरा बाहेर भाषा  गुजराथी 
तरी संस्कार जपले  माय भाषेचे

खेळाडू वृत्ती  आहे स्वभावी
 तरण पटू  शाळा काॕलेज पासून 
आंतरराष्ट्रीय व नॕशनल ची सहभागी
वरिष्ठ नागरिकमधे प्राविण्य अजून

अखिल भारतीय मराठी  सम्मेलनात
कवि कट्टयावर केले काव्यसादरीकरण
अंतर्मन काव्य संग्रह आहेची माझा
ब-याच मासिकात झाले साहित्याचे  प्रकाशन

छंद लेखनाचा बँकेच्या निवृत्तीकाळात
परीक्षणाचे काम पण केले आहे बरेचदा
बरीच प्रमाणपत्र प्राप्ती , साहित्य  समूहात
 सेवा भाषेची घडावी,  मनीच्छा सर्वदा.




लेखनाचा छंद जडला निवृत्तीकाळात
प्रशस्तिपत्रे मिळविली  अनेक स्पर्धेतून
 केलेय समूहात  परीक्षण काम साहित्याचे 
सेवा  घडो  मायभाषेची ही ईच्छा मनातून




वैशाली अविनाश वर्तक 
अहमदाबाद 
फोटो👇🏼

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे

 KAमराठी प्रेरणा समूह

आयोजित 

उपक्रमासाठी

कविता लेखन

विषय - वृक्ष  वल्ली आम्हा सोयरे


होते  बसले उपवनी

 विसावण्या  आले पक्षी

बसले   वृक्ष फांदीवरी

उडता  दिसली नभात नक्षी


बहरलेले हरित पर्णांनी

वृक्ष अनेक होती बहरदार

पक्षी, किटकांना देती निवारा

झाडे दिसती डौलदार 


साहूनी उष्ण झळा 

पशुंना देतसे छाया

पथिकास देई गारवा

जणू करी प्रेमळ माया


वृक्ष  असे सत् पुरुषा सम

देई फळ फुल छाया

जरी करिता तया आघात

करी सदैव  प्रेमाची माया


थांबवी मातीची धूप

मदत रूप पावसास

फुला  फळांनी बहरूनी

आनंददायी असते मनास

 

 वृक्ष करीती सांगोपन

 जणु मायबापा परि

वदती संत सोयरे तयांना

काय उणे  सांगा तरी





वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

साधना..... ध्येय वेडा |. अशक्य ते शक्य करु

अभा म सा प समूह 2
आयोजित  उपक्रम नं 515
विषय - साधना


जगतात सारेची जीवन 
जीवनाला  ध्येय हवे
मिळालेल्या जीवनाचे
  दाखवावे साध्य नवे

हवी मनात प्रबळ ईच्छा
 पण करावी लागे साधना
अंगी बाळगावी  सातत्यता
तेव्हा देव ऐकतो करुणा

कोणतीहीअसो कला 
 लागते करावी महेनत
एकलव्यने केली साधना
धनूर्विद्या केली अवगत

मान मिळाला तेनसिंगला
 जिंकण्याचा एवरेस्ट शिखर
होती तयामागे साधना
नाव मिळविले जगभर

असे महत्त्व  साधनेचे
मिळवण्या  उज्वल यश 
तेव्हा प्राप्त होते विद्या
आड येत नाही अपयश

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम
10/1/23
विषय ...ध्येय वेडा.       सायबर क्राईम     


आलो जन्माला जीवनी
जगणार हे तर  खचीत 
पण , मानव जन्मा सार्थक  
करण्याचे ध्येय हवे उचित.   


 प्राप्त करणे काही विशेष
असे ठरवावे  सदैव मनात
ध्येय पूर्ती साठी  मात्र
साधना  हवी जीवनात 

ध्यास स्वातंत्र प्राप्तीचा 
 स्वातंत्र्य वीरांच्या जीवाला
झाले सारेची ध्येय वेडे
करण्या पारतंत्र मुक्त भारताला

तेनसिंगने केली साधना
चढणे  एवरेस्ट शिखरी
हौते वेड  ध्येय प्राप्ती चे
झाला आनंद मनी अंतरी

ध्येय वेडया मानवास
होते जीवनात साध्य
करीता  प्रयत्नांची पराकाष्ठा
नसते काहीच असाध्य

वैशाली वर्तक
 अहमदाबाद


कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम
विषय ..अशक्य ते शक्य करू

असा दृढनिश्चय असता सदा
नक्कीच साध्य होते जीवनी
*अशक्य ते शक्य करू* 
देते मनाला  बळ मनी


प्रयत्ना अंती परमेश्वर
म्हण आहेची उचित
करिता परिकाष्ठा श्रमाने
यश मिळतेच खचित

दिधले देवाने शरीर.        करिता दिनरात एक
करता प्रयत्न खडतर.    शास्त्रज्ञांनी केले प्रयत्न खडतर
मिळाले यश तेनसिंगला.  चंद्रयान उतरले चंद्रावर 
सर केले  एवरेस्ट शिखर    सर केले यशाचे शिखर 


साधा किटक कोळ्याला
 असे  जवळी प्रयत्नाची ठेव
परिकाष्ठे पूर्ण  करी जाळे
मानवास  दिसे प्रयत्ने रुपी देव

झटून अभ्यास करिता
 देतो ईश्वर सुयश उज्वल 
मनाजोगा येतो  परिणाम 
प्रयत्ने मिळे हे मत प्रांजल

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...