भरारी प्रीमियर लीग पर्व ४
फेरी क्रमांक ६
सुवर्णसंधी फेरी
प्रकार - मुक्त छंद
विषय - भूक
भूक ही आंतरिक जाणीव.. मनाची.
नसते ती जाणीव फक्तनी फक्त
रसनेची वा जीभेची
पोटात उठता आगीचा डोंब
रसना दाविते इच्छा अन्नाची.
भूक असते ईच्छांची जाणीव
आंतरिक मनाची आशा
मिळण्याची प्रबळ कामना.
ती असते शाररिक ,मानसिक
कधी आध्यात्मिक तर कधी बौध्दिक .
भूक असते वाचनाची
होता जाणीव वा प्रबळ कामना
पाय वळतात वाचनालयाकडे
जेथे मिळते खाद्य वाचनाचे
मन होते प्रसन्न आनंदित.
भूक असते मायेची
प्रेमाने डोक्यावरून
हात फिरवावा या जाणीवेची,
माहेरीआलेल्या लेकीला
आईच्या प्रेमळ कुशीची.
भूक असते कानांना पण,
बाळाचे बोबडे बोल ऐकण्याची
तशीच भूक संगीत प्रेमींना
आवडते संगीत स्वर
ऐकण्यास अधीर झालेल्या कानांना सूरांची.
एवढेच नव्हे भूक असते
धरेला पण,तप्त मातीला
मृग जलधारांची
आसुसलेली भेगाळलेली तिची काया
जलधारा पडताच
काळी माय तृप्त होऊनी
मृदगंध पसरवूनी
देते समाधानाची पावती.
भूक असते सर्वांना लक्ष्मी प्राप्तीची
एक दोन तीन गाड्या,तसेच
घरे मिळवण्याची
भूक आहे अनादी काळापासून.
कधी भूक बनविते
माणसास अमानुष
भूक वासनेच्या बळी नेणारी.
मानव होतो महत्वाकांक्षी
प्राप्त करण्या भूकेला
अशी ही भूक आहे नितांत.
कोड क्रमांक 5181
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा