सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

बाल कथा. निश्चय

निश्चय

 "   ए आई ,उद्या हरतालिका ना? आम्ही मुली  उद्याच्या पूजेची पत्री आणावयास जाऊ का.?
   हो जा .एक पिशवी घेऊन जा.
   आणि दुर्वा ..पण आणा बर का!
  तसेच आघाडा पण आणा ..कसा ओळखायचा माहीत आहेना ?
  हो आई माहित  आहे .पाने वरील भाग हिरवा व खालचा पांढरट ...ठीक आहे तर
  आई, आम्ही जातो ग म्हणत तनया व तिच्या जोडीच्या मैत्रिणी  बरोबर निघाल्या
      तनया 5/6 वर्षाची . बरोबरीच्या पण 6/7वर्षाच्या.
    आधी सोसायटीच्या बंगल्या बाहेर डोकवत असलेली काही फूल झाडांची पाने एक एक करुन तोडली.  पुढे  सोसायटी च्या बागेत गेल्या .तेथे दुर्वा दिसताच .सा-या जणी दुर्वा खूडायला बसल्या.....थोड्या नीट खुडल्या  ..मग एक जण म्हणाली
 अग, असा किती वेळ जाईल ...मी तर उपटून च घेते ...घरी जाऊन तीन तीन दल वेगळे करीन ..मग सर्वच जणींनी तसेच   केले ..
  जमिनी तून दुर्वा उपटल्या मुळा सकट.   ...किती त्या उपटाव्यात ..त्याला काही सीमा.. .हवरटा सारख्या.उपटल्यात आणि   घातल्या पिशवीत .
     पुढे फूले झाडे दिसली ....सदा फूलीची रोपे बहरली होती .आधी एक एक फूल घेता घेता..  मग  दांडी सकट फूलांचे गुच्छ च तोडले...व टाकलेत पिशवीत .असे   करत मग कण्हेर.. जाई.. शोभेची फूले.. सर्व फुल झाडांची तशीच फूले गोळा केली. .. तिच गत  पानांची ..म्हणजे पत्रीची..  चला झाली ग पत्री गोळा करणे..पत्री घेऊन घरी आल्या. आई समोर पिशवी रिकामी केली.
    आईने  पहिले व लगेच बोलली
    " अग, तनया ही पत्री आणली का  झाडेच उपटलीत?"
    अग,आई किती वेळ घालवायचा  ..पटकन काम करण्यासाठी आम्ही पाना फूला सकट च तोडली.तूच म्हणतेस ना चेंगट सारखे काम नको करु.
  "अग पण अशाने त्या रोपाचे ..झाडाचे काय?"
    "पहा तू  मुळा सकट गवत उपटले आता उद्या तेथे दुर्वा कशा येतील "
  "आणि फूले घेतांना  किती कळ्या पण तोडल्या.. ..ह्या कळ्या उद्या ची फूले ...तुम्ही त्यांना पण उमलू दिले नाही ... हे असे बरोबर नाही .."
 " अशाने आपल्या निसर्ग  संपत्तीचा  नाश होतो.   सुंदर  पर्यावरण बिघडते.    आणि  महत्वाचे झाडात पण जीव असतो ..तुम्हा ला विज्ञानात पुढे शिकावयास येईल ..त्यांना पण जीव असल्याने दुखापत होते. ..ती पण आपल्या सारखी श्वास घेतात.  .आपणास प्राणवायू देतात.. झाडे रोपे यांचे  निसर्ग  सृष्टी त फार महत्त्व  आहे. "
   "तुझा हात पिरगळला तर दुखतो ना .?.तसेच झाडाचे रोपांचे असते."
     तनया आईचे   लक्ष देऊन ऐकत बसली होती.
     "ठीक आहे आई ,आता मला समजले .आता मी मनाशी पक्की गाठ बांधते.  तू म्हणते तशी ,मी कधीच रोपे अशी उपटणार नाही ...फूल झाडांना.. प्रेमाने  एक एक करुन घेईन.आजच्या ह्या तून मी निश्चय  करते यापुढे  मी झाडांची रोपांची काळजी घेईन.
   खर आहे ग बाई .तूझा निश्चय अगदी योग्य आहे

वैशाली वर्तक.


रविवार, १५ डिसेंबर, २०१९

1गणेशाची काव्ये. वंदना अष्टाक्षरी 2) चित्र काव्य/ 3सहाक्षरी /4अभंग/5 आगमन

विषय  गणेश उत्सव   गणेश वंदनागणेश वंदना
स्पर्धे साठी - आठोळी

तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
आधी  वंदूया मोरया

तूची आधार विश्वाचा
विद्येचा तू  अधिपती
शुभंकर  तू जनांचा
सर्व  व्यापी गणपती

किती नामे  गणेशाला
  वक्रतुंड गजानना
  बुद्धीदाता दुखःहर्ता
  शिवगौरीच्या नंदना

वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी  धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर

वैशाली वर्तक 7/9/2019





स्पर्धेसाठी
 चित्र  काव्य 

पितांबर लेवूनिया
हाती मुरली घेऊनी
पाठीमागे  मोरपिस
शेला लाल पांघरुनी

श्रीहरीचे रुप भासे
पाहताची चित्ती ठसे
रुप तुझे मोहक ते
मनातूनी भाव वसे

ऐटदार ते बसणे
मोहताती भक्त गण
मूर्ती ती आवडे सदा
येती तुजला शरण

रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत

दिन असे चतुर्थीचा
झाले बघ तव दर्शन
काय उणे राही चित्ती
इडा पिडा जाती टळून

वैशाली वर्तक

साठी 

सुधाकरी  विषय -- गणेश वंदना

विनायक तूची   ।असशी ज्ञानाचा   ।
सकल जनांचा     ।ज्ञानदाता    ।।
देवांचा ही देव  ।विश्वाचा पालक  ।
कलेचा जनक  ।तुची देवा   ।।        1

प्रथम पूजेचा   ।असे तुज मान  ।
करिती सन्मान  सदाकाळ   ।।
घेता तव नाम  ।दुःख  निवारण  ।
आनंदी जीवन  ।होत असे  ।।

गणराया तुची  ।आधार विश्वाचा  ।
सा-याच जगाचा  ।तुची एक  ।।
रणांगणावर  ।तु ही धुरंधर  ।
दुष्टांचा  संहार  ।करण्यास  ।।

तुला विध्नेश्वरा  ।आले मी शरण  ।
करिते नमन  ।रात्रंदिन  !
करी कृपा आता ।आम्हासी रक्षावे ।
दुःख हे हरावे  ।सकळांचे ।।



आगमन बाप्पाचे

लागलेच डोळे आता
तुझ्या  आगमना कडे
मनीं रचिते सदाच
कल्पनांचे आराखडे

कशी करावी आरास
याचा करिते विचार 
करु काही नाविन्याचा
खास काही तो प्रकार

आतुरता दाटे मनी
लवकर  या हो घरी
पहा केली सजावट
स्वागताला उभी दारी

ओवाळण्या तुम्हा दारी
रेखाटली  ही रांगोळी 
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी

झाली हो आगमनाची
मनाजोगी ती तैयारी
दावा रुप मनोहर
तुची आमुचा कैवारी

वैशाली वर्तक.....   28/8/




स्पर्धासाठी
अ भा  म सा प .मंडणगड शाखा , रत्नागिरी  विभाग
आयोजित  माघी  गणेश जयंती निमित्त  राज्य स्तरीय अष्टाक्षरी
काव्य लेखन स्पर्धा
  15/2/2021

       *गणेश वंदना* 

तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
गजानना  गणराया         1

शुभंकर तू सर्वांचा
बाप्पा वाटे आपला
तूचीअसे दुःख हर्ता  
किती नांवे रे तुजला        2


असे प्रथम पुजेचा 
तुजलाची  सदा मान
देतो आनंदी जीवन
करी  तुझाची  सन्मान          3


वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी  धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर                 4

चौदा विद्या अवगत
तव महिमा अपार
अधिपती स्वामी तूच
कुणी म्हणती मंदार               5

 तूची तात तूची माता
ठेव कृपा दृष्टी सदा
हीच विनंती तुजला
नको करु कष्टी कदा            6



........वैशाली वर्तक 
अहमदाबाद  (गुजरात )
 
शब्द सेतू साहित्य  मंच
साहित्य  प्रकार -- सहाक्षरी 
विषय -- देव गणपती
   
     *गणपती बाप्पा*

कार्यारंभी तुझे
प्रथम पूजन
तूची विघ्नहर्ता
तुलाची वंदन           1

घेता तव नाम
दुःख  निवारण
मिळे सदाकाळ 
आनंदी जीवन         2

विनायका तूची
असशी ज्ञानाचा
आहे  बुध्दीदाता
सकळ जनांचा          3

गणराया तूची
आधार विश्वाचा
वाटे तू आपल्या 
सा-याची जगाचा          4

तूच शुभंकर 
बाप्पा तू आपुला
असे दुःख  हर्ता
किती नावे तुला            5

देवांचा ही देव,
विश्वाचा पालक
तूची गणराया
कलेचा जनक             6

कशी वर्णू तुझ्या 
नामाची महती
शब्दची तोकडे
 मजला  भासती          7

सा-याची जनांची
होता मन कष्टी
धाव तुज पाशी
दावा कृपा दृष्टी             8

वैशाली वर्तक
    

आले भक्त जन
उत्सवाला सारे
पुजनाला यारे
गणेशाच्या                   3
           
करू आनंदाने 
उत्सव साजरा
चेहरा हासरा
समाधानी                     4

बाल गणेशाला
दुर्वा फुले वाहू
रुप त्याचे पाहू
भक्तीभावे                       5

रणांगणावर  
तोची धुरंधर  
दुष्टांचा  संहार  
करण्यास                          6
         
माघी चतुर्थीला 
गणेश जयंती 
करितो विनंती 
गणेशाला                        7          

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


गणेशोत्सव महोत्सव महास्पर्धा *स्पर्धेसाठी* भव्य राज्य स्तरिय अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा विषय -- विराजले अधिपती ओळ काव्य *आनंद सोहळा* वेध लागे गणेशाचे येता भाद्रपद मास कशी करुया आरास मनी विचार ते खास 1 स्वागताला खास दारी रेखाटली  ही रांगोळी फुले तोरणे लावुनी लावियल्या दीप ओळी 2 ढोल ताशे वाजवित केले स्वागत आनंदे *विराजले आधिपती* मन भरले स्वानंदे 3 रुप तुझे पाहुनिया मन माझे झाले शांत तूची आहे सुखकर्ता कसलीच नसे भ्रांत 4 विराजले अधीपती पाहताच चित्ती ठसे ऐटदार ते बसणे मना मनातूनी वसे 5 अधिपती आले घरी भक्त येती दर्शनाला वाटे अपूर्व सोहळा येतो हुरुप मनाला 6 वैशाली वर्तक अहमदाबाद
विषय  बाप्पा  बाप्पा माझा मार्गदर्शक 
विषय - बाप्पा माझा मार्गदर्शक
शीर्षक -   *कृपावंत व्हावे बाप्पा*कृपावंत व्हावे बाप्पा
***************************&&&&&&&
देवा गणराया गजानना  
व्हावे कृपावंत मजवरी
*बाप्पा माझा मार्गदर्शक*
स्मरते तुजला  निरंतरी

तूची पालक  या विश्वाचा
तुझ्या कृपेने  चाले सृष्टी 
हवी माया तुझी जगतावरी
नको करू कोणास कष्टी' 

चौदा विद्याही तुज अवगत
बुध्दीमान न्  देवांचा देव 
गणराया तूची ज्ञानदाता
प्रसाद रुपे द्यावी ज्ञानाची  ठेव

कार्यारंभी  प्रथम पुजिते
तुलाच स्मरते   गणराया
यावे घावूनी  कष्ट सारण्या
देण्या विश्वा कृपेची छाया

भवतापाने पिडलो आम्ही
तुम्ही व्हावे दिशा  सूचक 
वंदन करोनी मागते तुजला
गजानना तुची अमुचा पालक

   वैशाली वर्तक
   अहमदाबाद

आभा म सा प शब्दभाव
आयोजित 
उपक्रम
विषय - गणपतीच्या सान्निध्यात 
******************************

    दिन आनंदाचे

आले आले गणराज
केले आनंदे स्वागत
झांज ढोल वाजवित
 फेर धरूनी नाचत

पितांबर लेवुनिया
हाती मोदक घेऊनी
गळा मौल्यवान माळा
लाल शेला पांघरूनी

ऐटदार ते बसणे
मोहताती सारे जन
वाटे रूप मनोहर
आलो तुजला शरण

 लागे तव सान्निध्याचा
लळा पहा रे आगळा
 पाहुणाच घरोघरी 
जीव लावितो सकळा

किती आनंदी सुखाचे
दिन भासती आम्हाला
विसरूनी मोठे सान
आले उधाण मोदाला

दिन जाती भरभर
खेद दुःख  विसरुन
करी भजन कीर्तन‌
देहभान हरपून

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





मान प्रथम पुजेचा



कार्यारंभी तुला बाप्पा
पूजताती मनो भावे
तुझे नाम  घेता ओठी 
यश मिळे सर्वा ठावे

तव नामाचा महिमा
किती गाऊ गणराया
रणांगणी तू धुरंधर 
राहो  सदा कृपा छाया

गजानना गणेशाला
अंगी लावूनी चंदन 
मान प्रथम पूजेचा
तुला करीते वंदन


वेद  सिध्द एकदंत
रणांगणी धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर

असे प्रथम पूजेचा
तुजलाची  सदा मान
देतो जीवनी आनंद
करी तुझाच सन्मान

तूची तात तुची माता
ठेव कृपादृष्टी सदा
हीच विनंती गणेशा
नको करु कष्टी कदा






अनेक ...चाराक्षरी..... कृष्णा ची नांव


गणराया, प्रतिक्षा, औषध , चित्रआधारित   क्षण निवृत्तीचा
 रक्त वर्णी   वाटकिती   जंतासाठी     रम्य रुप    आला क्षण
शोभे कटी  पहायाची    असे खास     निसर्गाने   शेवटचा
चंदनाची     वेळ कधी    वावडींग     दाखविले    नोकरीत
अंगी उटी   पाळायाची   हमखास     वर्षावाने      निवृत्तीचा
 महतीत     थकले रे     त्रिफळा हा    राने वने    किती वर्षे
 तू अपार    डोळे माझे    नसे दवा     घनदाट        दिली सेवा
लंबोदर      कधी होई     घरा मघे     पहा कशी      आज त्याचा
 तूओंकार     येणे तुझे    सदा हवा    पायवाट      मिळे ठेवा
  तु पिता   भेटण्यास     शेवग्याची     वाट दिसे     स्मरताच
जगताचा    इच्छा मनी    शेंग खावी    नाग मोडी    जुने क्षण
 ज्ञानदाता   तुझे येणे     पाय दुखी       दोन्ही बाजू   आनंदते
 तू बुध्दीचा   कर क्षणी   दूर व्हावी     उंच झाडी        माझे मन
 दाखवावे    कधी येऊ    केसासाठी    काही मुळ्या     सहकारी
 तू चरण     झाले असे     शिकाकाई    औषधाच्या     आले आता
आले तूज    क्षण पण     आणण्याची   आजीलाच       हात हाती
मी शरण     नसे           करा घाई          ओळखीच्या    घेई जाता
 बाप्पा वाटे   आतुरता   सदा गुणी         रान फुले          गुणगान
तू मजला      मनी दाटे   पित्त हारी        उमलती           सुरु झाले
 किती नांवे    तू भेटावे   आवळाच      रान मेवा          डोळा माझ्या
 ही तुजला     सदा वाटे     गुणकारी    सभोवती            पाणी आले
 गजानना      रविवार      जेष्ठीमध       ही वनश्री            सहवास
 तू मोरया     दिवस तो     ठेवा मुखी     नका नासू          मंडळींचा
आधी वंदू     भेटी साठी    खोकल्याने    नाहीतर        आता नाही
 गणराया     आतुरतो        नको दुःखी   डोळा आसू     मिळायचा
                                     पान फूटी     सर्वत्र च          उभी झाले                                                                                       गुणकारी     हिरवळ          बोलण्यास
                                      मुतखडा     पानातून          मी निःशब्द
                                      दूर करी      सळसळ          वदण्यास
                                        संधी वात                         पूर्ण झाला
                                       बरा करे                            तो सोहळा
                                      मेथी खाणे                       
 नाही आता
                                      हेच खरे                            गोतावळा




स्पर्धेसाठी 
स्वराज्य लेखणी मंच
गणपती महोत्सव महा स्पर्धा
उपक्रम क्रमांक 1
दि 19-9-23
काव्य प्रकार चाराक्षरी
विषय ..अधिपती
 विषय ... गणपती      


रक्त वर्णी       
शोभे कटी    
चंदनाची      
अंगी उटी     1


महतीत      
तू अपार     
लंबोदर        
तू ओंकार     2


तुची पिता     
जगताचा     
 ज्ञान दाता
सकळांचा        3

दाखवावे       
तू चरण         
आले तूज      
मी शरण         4


बाप्पा वाटे      
तू मजला        
किती नांवे       
ही तुजला        5


गजानना          
तू मोरया         
आधी वंदू         
गणराया     6

तू गणेशा
अधिपती
वदतात
गणपती.  7

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सूर्यौदय 



उठा उठा 
रवी आला
सूर्यौदय 
पहा झाला 

किती छान 
दिसे प्रभा
पाहण्यास
सदा ऊभा

वसुंधरा 
प्रकाशली
शलाकांनी
तेजाळली

तृणपाती
चमकती 
प्रकाशाने
उजळणी

रवी आणखी
नव आशा
दूर सारी
त्या निराशा

रान फुले 
उमलली 
हसूनिया
ती डौलली

दृश्य पहा
मनोहर 
सृष्टी दिसे
ती सुंदर











प्रणु चाराक्षरी साहित्य आयोजित आजचा उपक्रम चित्र निरक्षण करून चाराक्षरी
९\७\२६
संवाद दोघीतला


चिव चिव
आवाजाने. 
कन्या आली 
आनंदाने   १

चिऊताई 
खिडकीशी 
कन्या होई
वेडपिशी.    २

नवलाई
मुखावरी 
कुठेहोती  
आजवरी

येत रहा
नियमित 
नको येउ 
अवचित     ४

तुझ्या विणा  
झाले घर  
सुने सुने 
आजवर
 

आज आली
देते खाऊ
खाल्या विण
नको जाऊ.   ६

बांध एक
येथे घर
येत रहा
निरंतर.       ७


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

बेरोजगारी

वाढती बेरोजगारी  गुन्हेगारीला प्रोत्साहन  देते का?

      प्रश्न रास्त  आहे. कारण सध्या शिक्षीत वर्ग वाढत आहे. जो तो कमीत कमी पदवीधर होत आहे. त्या मुळे पदवीधर  झाल्यावर लगेच त्याप्रमाणे नोकरीची अपेक्षा  करत असतात. पण ज्या प्रमाणात पदवीधर तयार होतात त्या प्रमाणात नोक-या नाहीत.  आणि मिळाली तरी वेतन कमी ......वेतन पेक्षा खर्च  जास्त  ..जमाखर्चाचा मेळ बसत नाही.
   तरी आजकाल बरीच नोकरीची ठिकाणे  उपलब्ध  होतात. पण प्रत्येकाला  पोषाखी नोकरी हवी असते.   कोणास हात काळे करणे आवडत नाही .त्यामुळे नोकरी शिवाय रहातात. तरी आता ब-याच प्रमाणात  परदेशा प्रमाणे dignity of work ची कल्पना समाजात रुजत आहे. त्यामुळे  fast food च्या कंपन्यातून डीलीवरी बाॕय म्हणून
बरेच पदवीधर कामे करत आहे.
   तसेच आजकाल कुरीअर सर्वीस पण वाढल्या आहेत तर पदवीधर होऊन तशी कामे स्विकारतात . पण कुठे  अंग महेनत करुन ,कपडे काळे होणारी कामे नको असतात. आणि मिळणा-या वेतन मधे रहाणीमान पुरे करता येत नाही . आणि ...वयच ते प्रलोभनाला बळी पडण्याचे असते . ....सहजिक पटकन पैसा कसा मिळेल या कडे लक्ष वेधले जाते. व हातून कळत नकळत पण गुन्हा  करण्याकडे पावले वळतात.   आजुबाजूची प्रलोभने गुन्हा  करण्यास मनास प्रवृत्त  करतात. आधी छोटा गुन्हा  करता, ...त्यात यशस्वी झाला तर पुढे  पुन्हा  दुसरा गुन्हा करण्यास मन सरसावते. हे आतंकवादी पण कित्येक जण  शिकून सवरून नोकरी न मिळाल्याने पटकन पैसे दार होण्याच्या मोहात वश झाल्याने अट्टल गुन्हेगार  बनतात .  आईवडील जरी उत्तम
संस्कार  देतात तरी परिस्थिती ला वश होऊन चुकूचा मार्ग  अपनवतात.
       ........वैशाली वर्तक

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

चित्र ...मिठाई चारोळी

मिठाई चारोळी

1 माहिम चा हलवा

हलवा तो माहिमचा
दिसे रुपाने गोजीरा
सर्व  मिठाईत शोभे
रुपाने तो साजीरा

2   लाडू
सर्व मिठाईत  गोंडस
भासे लाडवाचे रुप
पहाताच तोंड माझे
बसू देत नाही चूप

3  पेढा
   आनंदाची ऐकताच बातमी
    ध्यानात येतो तो पेढा
     सर्वांच्याच आवडीचा
      खाण्यासाठी जीव होतो वेडा

4     खोब-याची वडी

     साधी सरळ सोपी
     असे खोब-याची वडी
     येता जाता आई बनविते
     नका करु खाण्या पडा पडी

5 सुका मेवा बर्फी

  दिन आले थंडीचे
   शरीरास हवा सुका मेवा
   मिठाई सुक्या मेव्याची
   खावी भरपूर न करता हेवा

वैशाली वर्तक

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

तुझा स्पर्श

शब्द निशुका
 विषय - तुझा स्पर्श
स्पर्धे साठी

पहिलाच तो स्पर्श
असे मातेचा
जिव्हाळा देतो
जीवास  जो मायेचा

तव स्पर्श  देतो ग
मज उभारी
सदा जीवनी
घेण्या उंच भरारी

अजूनही स्मरतो
सख्याचा स्पर्श
केले बेधुंद
मनी जाहला हर्ष

स्पर्शण्या मृग धारा
भुमी   अतृप्त
मेघ वर्षता
होई वसुधा तृप्त

मनी ओढ लाटेला
भेट तीराशी
लाजूनी चूर
स्पर्शता किना-याशी

विठूच्या दर्शनाची
चोख्याची आस
चरण स्पर्श
करण्या मनी ध्यास

वैशाली वर्तक

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

चाराक्षरी

उपक्रम
सहा ऋतु

वसंत हा
ऋतू  राजा
आनंदित
होई प्रजा

ग्रीष्म देई
त्रास सदा
नको वाटे
येणे कदा

वर्षा येता
अंकुरली
धरा पहा
नटलेली

शरदाच्या
चांदण्यात
मजा येते
फिरण्यात

हेमंत हा
ऋतू  खास
आवडतो
हमखास

शिशीरात
पानगळ
वृक्षानाही
मरगळ

सृष्टी  दावी
अनुरुप
ऋतूतून
तिचे रुप

वैशाली वर्तक


गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...