विषय गणेश उत्सव गणेश वंदनागणेश वंदना
स्पर्धे साठी - आठोळी
तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
आधी वंदूया मोरया
तूची आधार विश्वाचा
विद्येचा तू अधिपती
शुभंकर तू जनांचा
स्पर्धे साठी - आठोळी
तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
आधी वंदूया मोरया
तूची आधार विश्वाचा
विद्येचा तू अधिपती
शुभंकर तू जनांचा
सर्व व्यापी गणपती
किती नामे गणेशाला
वक्रतुंड गजानना
बुद्धीदाता दुखःहर्ता
शिवगौरीच्या नंदना
वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर
वैशाली वर्तक 7/9/2019
स्पर्धेसाठी
चित्र काव्य
पितांबर लेवूनिया
हाती मुरली घेऊनी
पाठीमागे मोरपिस
शेला लाल पांघरुनी
श्रीहरीचे रुप भासे
पाहताची चित्ती ठसे
रुप तुझे मोहक ते
मनातूनी भाव वसे
ऐटदार ते बसणे
मोहताती भक्त गण
मूर्ती ती आवडे सदा
येती तुजला शरण
रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत
दिन असे चतुर्थीचा
झाले बघ तव दर्शन
काय उणे राही चित्ती
इडा पिडा जाती टळून
वैशाली वर्तक
गणेशोत्सव महोत्सव महास्पर्धा
*स्पर्धेसाठी*
भव्य राज्य स्तरिय अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा
विषय -- विराजले अधिपती
ओळ काव्य
*आनंद सोहळा*
वेध लागे गणेशाचे
येता भाद्रपद मास
कशी करुया आरास
मनी विचार ते खास 1
स्वागताला खास दारी
रेखाटली ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी 2
ढोल ताशे वाजवित
केले स्वागत आनंदे
*विराजले आधिपती*
मन भरले स्वानंदे 3
रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत 4
विराजले अधीपती
पाहताच चित्ती ठसे
ऐटदार ते बसणे
मना मनातूनी वसे 5
अधिपती आले घरी
भक्त येती दर्शनाला
वाटे अपूर्व सोहळा
येतो हुरुप मनाला 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
किती नामे गणेशाला
वक्रतुंड गजानना
बुद्धीदाता दुखःहर्ता
शिवगौरीच्या नंदना
वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर
वैशाली वर्तक 7/9/2019
स्पर्धेसाठी
चित्र काव्य
पितांबर लेवूनिया
हाती मुरली घेऊनी
पाठीमागे मोरपिस
शेला लाल पांघरुनी
श्रीहरीचे रुप भासे
पाहताची चित्ती ठसे
रुप तुझे मोहक ते
मनातूनी भाव वसे
ऐटदार ते बसणे
मोहताती भक्त गण
मूर्ती ती आवडे सदा
येती तुजला शरण
रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत
दिन असे चतुर्थीचा
झाले बघ तव दर्शन
काय उणे राही चित्ती
इडा पिडा जाती टळून
वैशाली वर्तक
साठी
सुधाकरी विषय -- गणेश वंदना
विनायक तूची ।असशी ज्ञानाचा ।
सकल जनांचा ।ज्ञानदाता ।।
देवांचा ही देव ।विश्वाचा पालक ।
कलेचा जनक ।तुची देवा ।। 1
प्रथम पूजेचा ।असे तुज मान ।
करिती सन्मान सदाकाळ ।।
घेता तव नाम ।दुःख निवारण ।
आनंदी जीवन ।होत असे ।।
गणराया तुची ।आधार विश्वाचा ।
सा-याच जगाचा ।तुची एक ।।
रणांगणावर ।तु ही धुरंधर ।
दुष्टांचा संहार ।करण्यास ।।
तुला विध्नेश्वरा ।आले मी शरण ।
करिते नमन ।रात्रंदिन !
करी कृपा आता ।आम्हासी रक्षावे ।
दुःख हे हरावे ।सकळांचे ।।
आगमन बाप्पाचे
लागलेच डोळे आता
तुझ्या आगमना कडे
मनीं रचिते सदाच
कल्पनांचे आराखडे
तुझ्या आगमना कडे
मनीं रचिते सदाच
कल्पनांचे आराखडे
कशी करावी आरास
याचा करिते विचार
करु काही नाविन्याचा
खास काही तो प्रकार
याचा करिते विचार
करु काही नाविन्याचा
खास काही तो प्रकार
आतुरता दाटे मनी
लवकर या हो घरी
पहा केली सजावट
स्वागताला उभी दारी
लवकर या हो घरी
पहा केली सजावट
स्वागताला उभी दारी
ओवाळण्या तुम्हा दारी
रेखाटली ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी
रेखाटली ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी
झाली हो आगमनाची
मनाजोगी ती तैयारी
दावा रुप मनोहर
तुची आमुचा कैवारी
मनाजोगी ती तैयारी
दावा रुप मनोहर
तुची आमुचा कैवारी
वैशाली वर्तक..... 28/8/
स्पर्धासाठी
अ भा म सा प .मंडणगड शाखा , रत्नागिरी विभाग
आयोजित माघी गणेश जयंती निमित्त राज्य स्तरीय अष्टाक्षरी
काव्य लेखन स्पर्धा
15/2/2021
*गणेश वंदना*
तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
गजानना गणराया 1
शुभंकर तू सर्वांचा
बाप्पा वाटे आपला
तूचीअसे दुःख हर्ता
किती नांवे रे तुजला 2
असे प्रथम पुजेचा
तुजलाची सदा मान
देतो आनंदी जीवन
करी तुझाची सन्मान 3
वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर 4
चौदा विद्या अवगत
तव महिमा अपार
अधिपती स्वामी तूच
कुणी म्हणती मंदार 5
तूची तात तूची माता
ठेव कृपा दृष्टी सदा
हीच विनंती तुजला
नको करु कष्टी कदा 6
........वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात )
शब्द सेतू साहित्य मंच
साहित्य प्रकार -- सहाक्षरी
विषय -- देव गणपती
*गणपती बाप्पा*
कार्यारंभी तुझे
प्रथम पूजन
तूची विघ्नहर्ता
तुलाची वंदन 1
घेता तव नाम
दुःख निवारण
मिळे सदाकाळ
आनंदी जीवन 2
विनायका तूची
असशी ज्ञानाचा
आहे बुध्दीदाता
सकळ जनांचा 3
गणराया तूची
आधार विश्वाचा
वाटे तू आपल्या
सा-याची जगाचा 4
तूच शुभंकर
बाप्पा तू आपुला
असे दुःख हर्ता
किती नावे तुला 5
देवांचा ही देव,
विश्वाचा पालक
तूची गणराया
कलेचा जनक 6
कशी वर्णू तुझ्या
नामाची महती
शब्दची तोकडे
मजला भासती 7
सा-याची जनांची
होता मन कष्टी
धाव तुज पाशी
दावा कृपा दृष्टी 8
वैशाली वर्तक
?
आले भक्त जन
उत्सवाला सारे
पुजनाला यारे
गणेशाच्या 3
करू आनंदाने
उत्सव साजरा
चेहरा हासरा
समाधानी 4
बाल गणेशाला
दुर्वा फुले वाहू
रुप त्याचे पाहू
भक्तीभावे 5
रणांगणावर
तोची धुरंधर
दुष्टांचा संहार
करण्यास 6
माघी चतुर्थीला
गणेश जयंती
करितो विनंती
गणेशाला 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय बाप्पा बाप्पा माझा मार्गदर्शक
विषय - बाप्पा माझा मार्गदर्शक
शीर्षक - *कृपावंत व्हावे बाप्पा*कृपावंत व्हावे बाप्पा
***************************&&&&&&&
देवा गणराया गजानना
व्हावे कृपावंत मजवरी
*बाप्पा माझा मार्गदर्शक*
स्मरते तुजला निरंतरी
तूची पालक या विश्वाचा
तुझ्या कृपेने चाले सृष्टी
हवी माया तुझी जगतावरी
नको करू कोणास कष्टी'
चौदा विद्याही तुज अवगत
बुध्दीमान न् देवांचा देव
गणराया तूची ज्ञानदाता
प्रसाद रुपे द्यावी ज्ञानाची ठेव
कार्यारंभी प्रथम पुजिते
तुलाच स्मरते गणराया
यावे घावूनी कष्ट सारण्या
देण्या विश्वा कृपेची छाया
भवतापाने पिडलो आम्ही
तुम्ही व्हावे दिशा सूचक
वंदन करोनी मागते तुजला
गजानना तुची अमुचा पालक
वैशाली वर्तक
अहमदाबाद
आभा म सा प शब्दभाव
आयोजित
उपक्रम
विषय - गणपतीच्या सान्निध्यात
******************************
दिन आनंदाचे
आले आले गणराज
केले आनंदे स्वागत
झांज ढोल वाजवित
फेर धरूनी नाचत
पितांबर लेवुनिया
हाती मोदक घेऊनी
गळा मौल्यवान माळा
लाल शेला पांघरूनी
ऐटदार ते बसणे
मोहताती सारे जन
वाटे रूप मनोहर
आलो तुजला शरण
लागे तव सान्निध्याचा
लळा पहा रे आगळा
पाहुणाच घरोघरी
जीव लावितो सकळा
किती आनंदी सुखाचे
दिन भासती आम्हाला
विसरूनी मोठे सान
आले उधाण मोदाला
दिन जाती भरभर
खेद दुःख विसरुन
करी भजन कीर्तन
देहभान हरपून
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मान प्रथम पुजेचा
कार्यारंभी तुला बाप्पा
पूजताती मनो भावे
तुझे नाम घेता ओठी
यश मिळे सर्वा ठावे
तव नामाचा महिमा
किती गाऊ गणराया
रणांगणी तू धुरंधर
राहो सदा कृपा छाया
गजानना गणेशाला
अंगी लावूनी चंदन
मान प्रथम पूजेचा
तुला करीते वंदन
वेद सिध्द एकदंत
रणांगणी धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर
असे प्रथम पूजेचा
तुजलाची सदा मान
देतो जीवनी आनंद
करी तुझाच सन्मान
तूची तात तुची माता
ठेव कृपादृष्टी सदा
हीच विनंती गणेशा
नको करु कष्टी कदा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा