गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

चित्र ...मिठाई चारोळी

मिठाई चारोळी

1 माहिम चा हलवा

हलवा तो माहिमचा
दिसे रुपाने गोजीरा
सर्व  मिठाईत शोभे
रुपाने तो साजीरा

2   लाडू
सर्व मिठाईत  गोंडस
भासे लाडवाचे रुप
पहाताच तोंड माझे
बसू देत नाही चूप

3  पेढा
   आनंदाची ऐकताच बातमी
    ध्यानात येतो तो पेढा
     सर्वांच्याच आवडीचा
      खाण्यासाठी जीव होतो वेडा

4     खोब-याची वडी

     साधी सरळ सोपी
     असे खोब-याची वडी
     येता जाता आई बनविते
     नका करु खाण्या पडा पडी

5 सुका मेवा बर्फी

  दिन आले थंडीचे
   शरीरास हवा सुका मेवा
   मिठाई सुक्या मेव्याची
   खावी भरपूर न करता हेवा

वैशाली वर्तक

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

तुझा स्पर्श

शब्द निशुका
 विषय - तुझा स्पर्श
स्पर्धे साठी

पहिलाच तो स्पर्श
असे मातेचा
जिव्हाळा देतो
जीवास  जो मायेचा

तव स्पर्श  देतो ग
मज उभारी
सदा जीवनी
घेण्या उंच भरारी

अजूनही स्मरतो
सख्याचा स्पर्श
केले बेधुंद
मनी जाहला हर्ष

स्पर्शण्या मृग धारा
भुमी   अतृप्त
मेघ वर्षता
होई वसुधा तृप्त

मनी ओढ लाटेला
भेट तीराशी
लाजूनी चूर
स्पर्शता किना-याशी

विठूच्या दर्शनाची
चोख्याची आस
चरण स्पर्श
करण्या मनी ध्यास

वैशाली वर्तक

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

चाराक्षरी

उपक्रम
सहा ऋतु

वसंत हा
ऋतू  राजा
आनंदित
होई प्रजा

ग्रीष्म देई
त्रास सदा
नको वाटे
येणे कदा

वर्षा येता
अंकुरली
धरा पहा
नटलेली

शरदाच्या
चांदण्यात
मजा येते
फिरण्यात

हेमंत हा
ऋतू  खास
आवडतो
हमखास

शिशीरात
पानगळ
वृक्षानाही
मरगळ

सृष्टी  दावी
अनुरुप
ऋतूतून
तिचे रुप

वैशाली वर्तक


बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

अष्टाक्षरी महागाई....सहाक्षरी.. महागाई थांब



षहाक्षरी
महागाई थांब

कुठे ती स्वस्ताई
महागाई मात्र
सर्वत्र ची दिसे
तीच एकमात्र

कोठे गेले दीन
इतिहासी जमा
कुणा कोठे आहे
तयाची  हो जमा

मीठ ते भाकर
सर्वची महाग
कसे हो जगावे
येतोच ना राग

किती पैसे आणा
महागाई  फार
नाही होत पुरे
नुसता विचार

असा हाची काळ
धान्य मुठभर
द्यावे लागे सदा
पैसे पोतेभर

आहे फक्त स्वस्त
येथे तो मानव
पैशाच्या  खातर
झाला तो दानव

अन्न  वस्त्र जल
महत्त्वाचे खांब
महागाई बाई
  आता तरी थांब

वैशाली वर्तक 28/11/2019



सिद्ध साहित्का समूह आयोजित  अष्टाक्षरी काव्य लेखन
विषय - महागाई
12/3/2021
शीर्षक - *महागाई  थांब*


होती म्हणे एकेकाळी     
खूप  सारी ती स्वताई
 आता दिसे एकमात्र
सगळ्यात महागाई 

कोठे हरपले दिन
इतिहासी  झाले जमा
कोठे  कुणालाही त्याची
आहे का जराही तमा

 साधे मीठ  ते भाकर
 असे सर्वची महाग
काय कसे जगणार
मनी येतोच ना राग

पैसे कितीही कमवा
महागाई   तर फार
वाढतेच सदोदित
नाही पुरत पगार

पहा सध्याच्या काळात
मिळे धान्य मुठभर
पण द्यावे लागतात
पैसे मात्र  पोतेभर


आहे  जगी स्वस्त फक्त 
 काय तो  येथे मानव
 त्याच  पैशाच्या कारणे
झाला  आहे  तो दानव

अन्न  वस्त्र  व निवारा  
हुकूमाचे असे खांब
 बाई  महागाई  तूची
आता   कुठे तरी थांब

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



डॉ बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र आयोजित उपक्रम
कविता लेखन
विषय.. महागाईचा राक्षस. काव्य वाचन साठी
      *महागाई  थांब*


होती म्हणे एकेकाळी     
खूप  सारी ती स्वताई
आता दिसे महागाईचा राक्षस
सगळी कडीच महागाई 

कोठे हरपले दिन
इतिहासी  झाले जमा
कोठे  कुणालाही त्याची
आहे का जराही तमा

 साधे मीठ  ते भाकर
 असे सर्वची महाग
काय कसे जगणार
मनी येतोच ना राग

पैसे कितीही कमवा
महागाई   तर फार
वाढतेच सदोदित
नाही पुरत पगार

पहा सध्याच्या काळात
मिळे धान्य मुठभर
पण द्यावे लागतात
पैसे मात्र  पोतेभर


आहे  जगी स्वस्त फक्त 
 काय तो  येथे मानव
 त्याच  पैशाच्या कारणे
झाला  आहे  तो दानव

अन्न  वस्त्र  व निवारा  
हुकूमाचे असे खांब
 बाई  महागाई  तूची
आता   कुठे तरी थांब

कसे जगावे काय खावे
दिन कंठणे झाले कठीण
महागाई नाकबूल करण्या 
शोधूया उपाय नवीन 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

पंचाक्षरी --- दिवे लागण/ भास मनाचा

रोही पंचाक्षरी
स्पर्धेसाठी---
विषय---दिवे लागण

 दिवे लागण
शोभे आंगण
धनी येण्याची
वाट पाहण

घरे भरली
न् उजळली
सायंकाळी ची
वेळ जाहली

देव घरात
घरा दारात
शुभ विचार
आणा मनात

दिवे लावता
पाढे  म्हणता
शुभं करोती
ओठी स्मरता

दिवे लागण
देवा स्मरण
लक्ष्मीचे घरी
ते आगमन

चंद्र  चांदणी
दिवा अंगणी
सायंकाळला
लावे गृहिणी

वैशाली वर्तक





यारिया साहित्य  कला
रोही पंचाक्षरी                                       

*भास मनाचा**

काय करावे
मन गुंतावे
या भासाने ते
किती छळावे

दिसे स्वप्नात
वसे मनात
पहावे  तर
नसे सत्यात


सदा चिंतन
मनी मंथन
भास मनाचा
व्हावे दर्शन

वेड जीवाला
छळे मनाला
काय करावे
अशा वेडाला

सोड हा ध्यास
न उरे भास
उगा विचार 
नको मनास

उभे ठाकले
डोळा देखले
भास मनाचा
आता नुरले







शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

वेध गुलाबी थंडीचे/लागे चाहुल थंडीची


शरदाच्या चांदण्यात
वेध गुलाबी थंडीचे
थंड  गारवा तो सांगे
दिन आले   शेकोटीचे

शहारती तृणपाती
दव थेंब चमकती
भासे मोतियांच्या माळा
पुष्प लता बहरती

वेध लागता थंडीचे
ऐकू येतो तो मारवा
प्रेमी युगलांंना वाटे
सदा हवा हा गारवा

 दिन येताची थंडीचे
तरारेल भाजी पाला
मस्त  सेवन करुया
गुणकारी  आरोग्याला

 करी आठवण  थंडी
शोधा कपडे गरम
थंडी दूर सारण्यात
नको प्रकृती नरम

ऋतू प्रीतीचा लोभस
निसर्गाची ती करणी
दिसतील धनधान्ये
केल्या कष्टाची भरणी


वैशाली वर्तक  25/11/2019
:

प्रेमाची अक्षरे स्पर्धेसाठी
आष्टाक्षरी रचना

लागे चाहुल थंडीची
------------------------

लागे चाहूल थंडीची
अंगी भरे हुरहुडी
शोधा गरम कपडे
 ठेवा उबदार कुडी

थंड वारा झोंबे अंगा
दूर सारण्या गारवा
थंडी वाढताच वाटे
चहा हा सदाची हवा

जादु असे ह्या थंडीत
झोंबे गार गार वारा
थंडावली सारी सृष्टी 
अंगी उठे तो शहारा

शहारती तृणपाती
दव थेंब चमकती
भासे मोतियांच्या माळा
पुष्प लता बहरती


शरदाच्या चांदण्यात
वेध गुलाबी थंडीचे
थंड  गारवा तो सांगे
दिन आले   शेकोटीचे

ऋतू प्रीतीचा लोभस
निसर्गाची ती करणी
दिसतील धनधान्ये
केल्या कष्टाची भरणी

वैशाली वर्तक  16/12/2019

आयोजित 
उपक्रमासाठी
विषय - सूर्य  चोरला कोणी

दिन आलेत थंडीचे
दाट धुके दाटलेले
आदित्याचा नाही पत्ता 
 नभ मेघांनी झाकोळले     1

  रवी मेघात दडला
   शलाका काढती वाट
   सूर्य  चोरीला कोणी
   जरी सरली पहाट           2

   धुक्याची  शाल तलम 
   धरेने पांघरली लाजत
   रवी दूर करी किरणांनी
   आली सकाळ हासत        3
  
    
   दवात न्हाली सकाळ
   थंड गार वाहे वारा
   जाणवे गुलाबी थंडी
   अंगी उठतो शहारा          4

     ऋतु थंडीचा लोभस
     फुले फुलली रंगीत
      तृणपाती वर दवबिंदु
      ऐका पक्षांचे संगीत           5

       दिन थंडीचे येताची
        दूर करण्यास थंडी
        लावा अंगणी शेकोटी
        घालूया गरम  बंडी            6


वैशाली वर्तक
अहमदाबाद


.     वर्ल्ड व्हिजन टाईम्स प्रकाशित 



शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

धुंद झाली आज प्रीत

सिध्द लेखिका
समुह आयोजित
स्पर्धेसाठी अष्टाक्षरी
विषय प्रीत गुलाबी गुलाबी

शिर्षक - गुज प्रीतीचे

किती वाट रे पाहू मी
तुज कळेना कधीच
वाट पाहूनी शिणले
माझे नयन आधीच

बघ फुलला मोगरा
धुंद भ्रमर गुंगतो
गंध तयाचा मजला
तुझी आठव करितो

ओढ लागली जीवाला
 सदा तुझ्याच भेटीची
  वेडे झाले मन माझे
रीत अशीच प्रीतीची

सांजवेळी बहरली
पहा धुंद रातराणी
हात हातात घेउनी
गाउ प्रीतीची ती गाणी

तव प्रेमाची सखया
वाट पहाती लोचने
प्रीत गुलाबी गुलाबी
ऐक माझे तू सांगणे
------------------

वैशाली वर्तक
प्रेमाची अक्षरे राज्य स्तरीय समुह आयोजित
उपक्रम
विषय - प्रेम वेडी
वर्ण- 9

कधी भेटशील सखया
धुंद झाली ती आज प्रीत ..... , धृवपद
         ओढ लागली या जीवाला
         कसे समजवू मनाला
         गाऊ मिळूनी प्रेम गीत
         धुंद झाली ती आज प्रीत 1

         रातराणी ही बहराली
         बघ सांजवेळ जाहली
         वेड्या मनाची हीच रीत
         धुंद झाली ती आज प्रीत 2

         वाट पहाती ही लोचने
         ऐक तूची मम सांगणे
         हात घेऊनी हाती नीत
         धुंद झाली ती आज प्रीत

     कधी भेटशील सखया
     धुंद झाली ती आज प्रीत

        ....... वैशाली वर्तक.6/4/2020



धुंद झाली आज प्रीत                           28/11/2019
अष्टाक्षरी
     
तुला भेटण्याची सदा
ओढ लागली  जीवाला
कधी येशील जवळी
सांग माझिया मनाला

वाट तुझी बघण्याची
वेड्या मनाची ही रीत
बघ सांजवेळ झाली
धुंद  झाली आज प्रीत

शहारते मम काया
स्पर्श  होता अलवार
मोहमयी तव हात
फिरु देना हळुवार

पहा कशी बहरली
धुंद गंध  रातराणी
हात घेउनी हातात
गाऊ दोघे प्रेमगाणी

तव प्रेमाची सखया
वाट पाहती लोचने
धुंद मंद या समयी
ऐक माझे तू सांगणे

......वैशाली वर्तक     28/11/2019


























मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...