शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

वेध गुलाबी थंडीचे/लागे चाहुल थंडीची


शरदाच्या चांदण्यात
वेध गुलाबी थंडीचे
थंड  गारवा तो सांगे
दिन आले   शेकोटीचे

शहारती तृणपाती
दव थेंब चमकती
भासे मोतियांच्या माळा
पुष्प लता बहरती

वेध लागता थंडीचे
ऐकू येतो तो मारवा
प्रेमी युगलांंना वाटे
सदा हवा हा गारवा

 दिन येताची थंडीचे
तरारेल भाजी पाला
मस्त  सेवन करुया
गुणकारी  आरोग्याला

 करी आठवण  थंडी
शोधा कपडे गरम
थंडी दूर सारण्यात
नको प्रकृती नरम

ऋतू प्रीतीचा लोभस
निसर्गाची ती करणी
दिसतील धनधान्ये
केल्या कष्टाची भरणी


वैशाली वर्तक  25/11/2019
:

प्रेमाची अक्षरे स्पर्धेसाठी
आष्टाक्षरी रचना

लागे चाहुल थंडीची
------------------------

लागे चाहूल थंडीची
अंगी भरे हुरहुडी
शोधा गरम कपडे
 ठेवा उबदार कुडी

थंड वारा झोंबे अंगा
दूर सारण्या गारवा
थंडी वाढताच वाटे
चहा हा सदाची हवा

जादु असे ह्या थंडीत
झोंबे गार गार वारा
थंडावली सारी सृष्टी 
अंगी उठे तो शहारा

शहारती तृणपाती
दव थेंब चमकती
भासे मोतियांच्या माळा
पुष्प लता बहरती


शरदाच्या चांदण्यात
वेध गुलाबी थंडीचे
थंड  गारवा तो सांगे
दिन आले   शेकोटीचे

ऋतू प्रीतीचा लोभस
निसर्गाची ती करणी
दिसतील धनधान्ये
केल्या कष्टाची भरणी

वैशाली वर्तक  16/12/2019

आयोजित 
उपक्रमासाठी
विषय - सूर्य  चोरला कोणी

दिन आलेत थंडीचे
दाट धुके दाटलेले
आदित्याचा नाही पत्ता 
 नभ मेघांनी झाकोळले     1

  रवी मेघात दडला
   शलाका काढती वाट
   सूर्य  चोरीला कोणी
   जरी सरली पहाट           2

   धुक्याची  शाल तलम 
   धरेने पांघरली लाजत
   रवी दूर करी किरणांनी
   आली सकाळ हासत        3
  
    
   दवात न्हाली सकाळ
   थंड गार वाहे वारा
   जाणवे गुलाबी थंडी
   अंगी उठतो शहारा          4

     ऋतु थंडीचा लोभस
     फुले फुलली रंगीत
      तृणपाती वर दवबिंदु
      ऐका पक्षांचे संगीत           5

       दिन थंडीचे येताची
        दूर करण्यास थंडी
        लावा अंगणी शेकोटी
        घालूया गरम  बंडी            6


वैशाली वर्तक
अहमदाबाद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...