शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

धुंद झाली आज प्रीत

सिध्द लेखिका
समुह आयोजित
स्पर्धेसाठी अष्टाक्षरी
विषय प्रीत गुलाबी गुलाबी

शिर्षक - गुज प्रीतीचे

किती वाट रे पाहू मी
तुज कळेना कधीच
वाट पाहूनी शिणले
माझे नयन आधीच

बघ फुलला मोगरा
धुंद भ्रमर गुंगतो
गंध तयाचा मजला
तुझी आठव करितो

ओढ लागली जीवाला
 सदा तुझ्याच भेटीची
  वेडे झाले मन माझे
रीत अशीच प्रीतीची

सांजवेळी बहरली
पहा धुंद रातराणी
हात हातात घेउनी
गाउ प्रीतीची ती गाणी

तव प्रेमाची सखया
वाट पहाती लोचने
प्रीत गुलाबी गुलाबी
ऐक माझे तू सांगणे
------------------

वैशाली वर्तक
प्रेमाची अक्षरे राज्य स्तरीय समुह आयोजित
उपक्रम
विषय - प्रेम वेडी
वर्ण- 9

कधी भेटशील सखया
धुंद झाली ती आज प्रीत ..... , धृवपद
         ओढ लागली या जीवाला
         कसे समजवू मनाला
         गाऊ मिळूनी प्रेम गीत
         धुंद झाली ती आज प्रीत 1

         रातराणी ही बहराली
         बघ सांजवेळ जाहली
         वेड्या मनाची हीच रीत
         धुंद झाली ती आज प्रीत 2

         वाट पहाती ही लोचने
         ऐक तूची मम सांगणे
         हात घेऊनी हाती नीत
         धुंद झाली ती आज प्रीत

     कधी भेटशील सखया
     धुंद झाली ती आज प्रीत

        ....... वैशाली वर्तक.6/4/2020



धुंद झाली आज प्रीत                           28/11/2019
अष्टाक्षरी
     
तुला भेटण्याची सदा
ओढ लागली  जीवाला
कधी येशील जवळी
सांग माझिया मनाला

वाट तुझी बघण्याची
वेड्या मनाची ही रीत
बघ सांजवेळ झाली
धुंद  झाली आज प्रीत

शहारते मम काया
स्पर्श  होता अलवार
मोहमयी तव हात
फिरु देना हळुवार

पहा कशी बहरली
धुंद गंध  रातराणी
हात घेउनी हातात
गाऊ दोघे प्रेमगाणी

तव प्रेमाची सखया
वाट पाहती लोचने
धुंद मंद या समयी
ऐक माझे तू सांगणे

......वैशाली वर्तक     28/11/2019


























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...