मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

जेव्हा निसर्ग कोपतो


विषय --जेव्हा निसर्ग कोपतो        12/8/2019

निसर्गाचे किती , गावे गुण गान
असे  सदा तोचि , ईश्वर समान

तयाच्या कृपेने , सजे सारी सृष्टी
भरलेली त्यात , सुखकारी दृष्टी    

निसर्गाचा  राहो,  सदा सम-तोल
कधीच  न व्हावा, तो अ-समतोल

अती वृष्टी होता , ओला  तो दुष्काळ
हरवते सुख ,  न दिसे सुकाळ

अवकाळी धारा , बरसल्या अशा
सर्वस्व बुडाले,  झाली अवदशा

नको कधी कोप ,  तूच रे तारक
नको बनू असा , सृष्टी चा मारक

भुकंप ,प्रलय , निसर्ग  कोपाचे
होतसे घातक , सृष्टी च्या नाशाचे

नसे सृष्टी कोप , मानवाचा लोभ
प्रगती नावाचा, थांबवावा क्षोभ

वैशाली वर्तक.
निसर्ग
निसर्गाचे किती  गावे गुण गान        
असे  सदा तोचि  ईश्वर समान  
       
तुझ्या  कृपा दाने सजे सारी सृष्टी    
भरलेली त्यात  सुखकारी दृष्टी    

निसर्गाचा  राहो सदा सम-तोल
व्हावा न कधीच तो अ-समतोल

अती वृष्टी होता ओला तो दुष्काळ
हरवते सुख  न दिसे सुकाळ

अवकाळी धारा बरसल्या अशा
सर्व ते  बुडाले झाली अवदशा  

नको कधी कोप तूच रे तारक
नको बनू असा  सृष्टी चा मारक

भूमी कंप पूर  निसर्ग  कोपाचे  
असे  ते घातक सृष्टी च्या नाशाचे

नसे सृष्टी कोप मानवाचा लोभ
प्रगतीच्या नावे थांबवावा क्षोभ

वैशाली वर्तक.

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

श्रावण

स्पर्धे क्रमांक 20
विषय--श्रावण                                  10/8/2019
पाचोळा उडला सभोवती
वाहे वारा सोसायट्याचा
फेर धरुनी नाचली पाने
बरसल्या सरी  श्रावणाच्या 

धरणी झाली तृप्त भिजूनी
श्रावणात  आली बहरुनी.
सर्वत्र एकच रंग  दिसे धरेचा
श्रावण सरी येता बरसूनी.

श्रावणात चाले  रोजच
ऊन पावसाचा  सदाच खेळ
इंद्रधनु तोरण शोभे नभी
सौंदर्य पहाण्यास हवा वेळ
  
श्रावण मास  सणवारांचा
येती लेकी बाळी माहेरासी
चाले पूजन मंगळागौरीचे
वाहूनी बल्व पत्र शंकरासी
   
बांधूनीया झुले अंगणात
लावुनिया मेहंदी हातावरी
मुली झुलती झोके घेउनी
पूजती नागराजाला घरोघरी

असे सा महिना नव सृजनाचा
तोचि मास   असे श्रावण
येई आनंदाला उधाण
सर्वांचा असे मन भावन

वैशाली वर्तक
      
                                                       

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

आस दर्शनाची निशु शब्दिका

आस मनीची
निशु शब्दिका

विठुराया सावळा
तुलसी माळा
भक्ती भावाचा
सदा दाटे उमाळा

नाम  तयाचे घेता
जीवा विसावा
लागे जिव्हाळा
नामात ची गोडवा

उठता नि बसता
स्मरू तुजला
तुझीच सेवा
ही तारण्या मजला

राहो सदाची  मुखी
तुझेच  नाम
प्रसन्न करी
असावे कर्म काम

पाहता रुप तुझे
वाटे आनंद
जीवा लागला
तव दर्शन  छंद

हेची मागणे विठू
दावा चरण
विनंती तुज
आले तुजशी शरण

वैशाली वर्तक

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

चाराक्षरी सुर्योदय / भाज्या/ देद देवता /चित्र काव्य/पाऊसअती

सुर्योदय        भाज्या ची           देवदेवता        चित्र काव्य         चित्र काव्य

रवी पहा       बटाट्याचा         आद्य पूजा       जगी आम्हा       नको आता
गगनात         सदा मान         करी जन          कोणी नाही        असा पडू
येता झाली    तया विना          तोचि असे        नाही दया          पाहुनिया
सुप्रभात.     रिते पान           गजानन            कोणालाही        येते रडू

उजळली       कांदा मुळा       राम दूत          आई बाप           बरसला
पूर्व दिशा      असे जोडी        हनुमान           न रहाता            नियमित
उठा आता    जेवणात           सदा उभा         झालो मीच       मन होते
सरे निशा      आणी गोडी       बलवंत            हीची माता        प्रफुल्लित

रवी येता      आरोग्याची        गिरीधर          लागे भुक          रस्त्यावर
पुष्प फूले    निगा राखा         योगेश्वर         रोज तिला          पाणी पाणी
वा-यावरी    पाले भाज्या       जगताचा       न समजे           परिस्थिती
पर्ण डुले      सदा चाखा         तू ईश्वर        काही तिला         दीन वाणी

देवा तूच      फूल कोबी        सरस्वती        दया भाव          जरा थांब
असशी तो    आवडीची        तू शारदा       कोणी  करी        थोडा वेळ
चित्रकार      नसेजरी           कर कृपा      मिळे तेव्हा         नको दावू
महान तो     सात्त्विक ती      तू ज्ञानदा       अन्न  तरी           तुझा खेळ

रवी प्रभा    असे कांदा        रधूवंंशी        देतो मीच          पावसाची
पसरली      सदाभारी         तू श्रीराम      तान्हुल्यास        अती वृष्टी
वसुंधरा       गरिबांचा         तोचि हारी     आई सम         नाश करी
उजळली     तो कैवारी        क्रोध काम   दोन घास          सारी सृष्टी

वाटे धरा    आले हवे            दत्त  गुरु     असे दुःख        बरसता
जाता थेट   चहा साठी          दिगंबर        नको देवा        जोरदार
क्षितीजाला  न असता          घेऊ नाम     काय करु       ठप्प केला
घेई भेट      भाळी आठी        निरंतर        सांग सेवा       व्यवहार

प्रकाशली      भाज्या खाणे     देव असे     संभाळतो      बस मधे
दरी खोरी       गमे ज्याला      अंतरात      दिनभर          येता पाणी
काळोखाची    कधी व्याधी     नका शोधू   नसे शांति       सुरु झाली
झाली चोरी     नसे त्याला      देवळात       पळभर        आणिबाणी

संथ वाहे        काय भाजी                        करु नको      रोजगार
नदी सदा       नका पुसु                           कोणा दीन     दुःखावले
न स्वस्थता     भाजी साठी                       हे मागणे       धंदा विना
जीवा कदा    नका रुसु                            प्रतिदिन        वैतागले
  1. Sent via iBall Slide

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

छत्तीस गुण मिलन जीवन गाणे. .... नको निराशाओळी



 
छत्तीस गुण मिलन
विषय- जीवन गाणे


मानव जन्म हा लाभला
करुया सोने सर्वस्वाने
जगु जीवन आनंदाने
दिधले आयु ते देवाने

निशेत दडली पहाट
नसे तिमीर सदाकाळ
का बाळगी भिती मनात
नको खंतची कदाकाळ

गाणे देई मना आनंद
भरु सप्त स्वर मनात
होता संगीतमय जीव
व्यथा जाती दूर क्षणात

ठेवा सकारात्मक भाव
चाले सुखदुःखाचा खेळ
सुख उद्या येईल दारी
आनंदाचा जमेल मेळ

नदी धावे जीवन देण्या
मग का रडत बसणे
करिते का खंत सरिता
काट्यात फुलाचे हसणे.

वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजराथ )
8141427430
  जीवन गाणे                    29/7/19


मानव जन्म मिळाला आपणा
करुया तयाचे सोने सर्वस्वाने
जगुया जीवन सदा   आनंदाने
दिधले सुंदर  आयुष्य देवाने.

निशे नंतर येते  रम्य पहाट
तिमीर कधीच नसे सदा काळ
का बाळगायची तमा जीवनात
नकोच  खंत जीवनी कदाकाळ.

गाणे करी मनाला पुलकित
भरता सप्त स्वर साज तयात
होते संगीत मय   हे जीवन
व्यथा जाती पळूनी क्षणात

भाव सदा सकारात्मक मनी
 जीवन हे ऊन पावसाचा खेळ
बनवा जीवन मोदाचे गाणे
जमवावा तयात आनंदाचा मेळ

आक्रमित मार्ग  सरिता धावे
अपुले जीवन नसावे रडगाणे
कधी न करिता खंत ती वाहे
 फुलही उमले जाणूनी कोमेजणे.


वैशाली वर्तक


नको निराशाच्या ओळी


नको करु खंत मनी

आली  सुखाला भरती
आला रवी राज नभी
उधळीत मोती भवती

पक्षी गाती सुस्वरे
शोध मोल त्यातूनही
आनंदच्या दारी उभा
सोड खेद  मनातूनी

संपल्याची पानगळ
ऋतु फुलेल  वसंत
पानोपान बहरेल
नको कशाचीच खंत

दिन सुखाचे येतील
करु साजरी दिवाळी
मोदी भरे जगताना
नको निराशाच्या ओळी


















बुधवार, ३१ जुलै, २०१९

वाढदिनाची चाराक्षरी

जन्मदिनी  चाराक्षरी
स्पर्धेसाठी

सदिच्छांच्या
वर्षावांनी
न्हाऊ घालू
शुभेच्छांनी

घडो नवा
अविष्कार
मिळो तया
पुरस्कार

घडो सेवा
मराठीची
हीच ईच्छा
प्रणालीची

चाराक्षरी  
प्रसविली  
सर्वांनी ती
प्रशंसिली    

चाराक्षरी
ही मानाची
आवडती
लिखाणाची

 शब्द  अल्प
असे जरी
भावना त्या
व्यक्त  करी

छंद तुझे
असे खास
जोपासणे
हीच आस

रूची असे
साहित्याची
जोड तिला
संगीताची

होवो पूर्ण
सा-या ईच्छा
 वैशालीच्या
ह्या शुभेच्छा.

वैशाली वर्तक

शुक्रवार, २६ जुलै, २०१९

नसतोस घरी तू जेंव्हा



                           नसतोस घरी तू जेव्हा
   "  खर म्हणजे एक वेळ होती की जेव्हा नजरे आड झालेेला तू आवडायचा नाहीस .वाटे सदान् कदा तू माझ्या अवती भवती असावा. .जराही दोघांनी एकमेकान पासून क्षणभर पण दूर होऊ नये .
     अर्थात हे कसे शक्य असणार .नोकरी... धंदा पाणी तर केलेच पाहिजेना .नाहीतर खाणार काय ? .... नुसते प्रेम... का  आकर्षण ?
   हो ..आता त्याला गोंडस नाव देतेय " आकर्षण " म्हणून
   पण तेव्हा काही नाही हं . तेव्हा  ते निव्वssळ प्रेमच वाटायचे. 
 एवढच  काय  ..तेव्हा एकमेकास 
 ... "मन" वगैरे  म्हणून काय म्हणायचे वा .. संबोधायचे.
   तर असे होते ते दिवस. ह्यांना  ऑफिस कामाने सतत बाहेर गावी जावे लागे. मग टूरला जायचे आले की ...आले ना पुन्हा विरहाचे दिवस.
   खर सांगू ,"त्यावेळीं   हे  ऑफिस  मधून आल्या आल्या , " चला उद्या पासून 3 मला दिवस टूरवर जायचे आहे ."असे यांनी म्हटले की . "तेव्हा क्षणभर मला रामायणातील सीता पण माझ्या पेक्षा सुखी वाटायची.
" निरोप कसला घेता माझा जेथे राधव तेथे सीता " म्हणून ती रामा बरोबर वनवासात पण गेली . पण मला मात्र घर सोडून, नोकरी सोडून, आणि त्यात मुलांच्या शाळा कोण पहाणार ? असो.
  तर सांगायचे हे की त्या वेळी नसतोस घरी तू जेव्हा... खरच संदीप खरेच्या गाण्या सारsssखंच   वाटायचे.
  पण आता गेले ते दिवस .आता दोघे रिटायर्ड जीवन... अगदी सुखाने व्यतीत करत आहोत . कुठे जाण्याची घाई नाही ..सतत मस्त एकत्र असतो.दिमतीला वर कामास . बाई पण असते.त्यामुळे तसेही कामाचे परिश्रम नाहीत .जोडीला तोंडी लावयला म्हणा ...वा विरंगुळा म्हणून नातवंडे... त्यामुळे सुखी जीवन जगत आहोत .मला सांगा.......  अजून काय पाहिजे सुखी जीवनाला.त्यामुळे 
 " हे " यांचे वाचनालय.. .. बागेत वरिष्ठ नागरिकात जाऊन बसणे, गप्पा मारणे... तसेच सोसायटी चे कमिटी मेंबर्स ... नुसतेच  मेम्बर  नव्हे तर  तारक मेहताच्या सिरीयल मधील आत्माराम भिडे  सारखे एकमेव सेक्रेटरी   .त्यामुळे ..सोसायटीच्या मंडळीत बसणे ..वगैरे निमित्याने बाहेर जातात .
  पण खर सांगू ..... आता त्याचे हे थोडे फार .बाहेर जाणे फार आवडते. "नसता घरी तुम्ही जेव्हा" ची ,.. ती पूर्वी ची हळहळ आता वाटत नाही.
   या असल्या विचाराने कधी कधी वाटते आपले प्रेम तर कमी झाले नाही ना. ! पण छे sss छे मुळीच नाही , प्रेम तितकेच आहे . हे बाहेर गेले असता ठराविक वेळेच्या पेक्षा जरा उशीर झाला तर लगेच काळजी वाटते. हात मोबाईलकडे धाव घेतात. का बरे उशीर झाला असेल. ?...पण आता ते पहीले आकर्षण उरले नाही .. कारण , आता हे नसले की , ..मी व मोबाईल यांचे छा sन नाते जुळते. फेस बूकच्या व whatsapp च्या विविध समुहावर हजरी लावता येते. सतत चालणा-या स्पर्धेत भाग घेता येतो. व मनास एक अनामिक आनंद मिळतो. या विविध समुहाने किती ज्ञानात भर करिता येते. व चालू जगाशी जवळीक साधता येते.
     हे घरी असले तर करता येत नाही असे नव्हे ..पण प्रत्येकाला स्पेस हवीच ना. आपापले छंद आवडी... विरंगुळा जोपायाला. तर, सांगायचे की , ते त्यांचे व मी माझे ...छंद जोपासत असतो. त्यामुळे "नसतोस घरी तू जेव्हा " तीळ तीळ तुटतो सारखी स्थिती नसते .जरा आपापले विचार करण्यास मस्त वेळ मिळतो .उलट एखाद दिवशी जर घरात हे असले तर फेस बूक सुटतय असे वाटते. कारण सहाजिकच थोडे फार इतर कारणाने , बोलण्याने वा विषयातंर होते .व अनाहुत पणे लिखाणात व्यत्यय होतो. मग उगीच चीड चीड होते. कधी विचारांची लिंक तुटते तर कधी whatsapp चे साहित्य ..म्हणा वा मित्र मैत्रिणीच्या गप्पात उगाच खंड पडतो.
   आणि मधेच जे सर्वत्र whatdapp वर फिरत असलेले msg " हे "ऐकवत बसतात. मला त्यात जराही रस नसतो . कारण ते सर्वच ग्रुप मधून फिरत असतात.पण मी मात्र लिहीलेले ,वाचलेले ,यांनी ऐकावे असे वाटते .मग पुन्हा वाद. असो.
    पण धरून ठेवले तरी त्रास ,सोडले तरी त्रास .पण डोळ्या समोर असावा सतत नजरेत असावा असे सतत वाटते. छान काही केले  बनविले की लगेच आठवण येते. बर.... , छान गोष्टीचा, लिखाणाचा ,मनापासून नक्की केलेल्या व पूर्ण झालेल्या कामाचा, आनंद शेअर करण्यास "हे "च तर हक्काचे माणुस असतात ना.   तर नसतोच घरी तू जेव्हांची  उणीव सदा जाणवणार च ना.!
वैशाली वर्तक( अहमदाबाद )

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...