छत्तीस गुण मिलन
विषय- जीवन गाणे
मानव जन्म हा लाभला
करुया सोने सर्वस्वाने
जगु जीवन आनंदाने
दिधले आयु ते देवाने
निशेत दडली पहाट
नसे तिमीर सदाकाळ
का बाळगी भिती मनात
नको खंतची कदाकाळ
गाणे देई मना आनंद
भरु सप्त स्वर मनात
होता संगीतमय जीव
व्यथा जाती दूर क्षणात
ठेवा सकारात्मक भाव
चाले सुखदुःखाचा खेळ
सुख उद्या येईल दारी
आनंदाचा जमेल मेळ
नदी धावे जीवन देण्या
मग का रडत बसणे
करिते का खंत सरिता
काट्यात फुलाचे हसणे.
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजराथ )
8141427430
जीवन गाणे 29/7/19
मानव जन्म मिळाला आपणा
करुया तयाचे सोने सर्वस्वाने
जगुया जीवन सदा आनंदाने
दिधले सुंदर आयुष्य देवाने.
निशे नंतर येते रम्य पहाट
तिमीर कधीच नसे सदा काळ
का बाळगायची तमा जीवनात
नकोच खंत जीवनी कदाकाळ.
गाणे करी मनाला पुलकित
भरता सप्त स्वर साज तयात
होते संगीत मय हे जीवन
व्यथा जाती पळूनी क्षणात
भाव सदा सकारात्मक मनी
जीवन हे ऊन पावसाचा खेळ
बनवा जीवन मोदाचे गाणे
जमवावा तयात आनंदाचा मेळ
आक्रमित मार्ग सरिता धावे
अपुले जीवन नसावे रडगाणे
कधी न करिता खंत ती वाहे
फुलही उमले जाणूनी कोमेजणे.
वैशाली वर्तक
नको निराशाच्या ओळी
नको करु खंत मनी
आली सुखाला भरती
आला रवी राज नभी
उधळीत मोती भवती
पक्षी गाती सुस्वरे
शोध मोल त्यातूनही
आनंदच्या दारी उभा
सोड खेद मनातूनी
संपल्याची पानगळ
ऋतु फुलेल वसंत
पानोपान बहरेल
नको कशाचीच खंत
दिन सुखाचे येतील
करु साजरी दिवाळी
मोदी भरे जगताना
नको निराशाच्या ओळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा