गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

आस दर्शनाची निशु शब्दिका

आस मनीची
निशु शब्दिका

विठुराया सावळा
तुलसी माळा
भक्ती भावाचा
सदा दाटे उमाळा

नाम  तयाचे घेता
जीवा विसावा
लागे जिव्हाळा
नामात ची गोडवा

उठता नि बसता
स्मरू तुजला
तुझीच सेवा
ही तारण्या मजला

राहो सदाची  मुखी
तुझेच  नाम
प्रसन्न करी
असावे कर्म काम

पाहता रुप तुझे
वाटे आनंद
जीवा लागला
तव दर्शन  छंद

हेची मागणे विठू
दावा चरण
विनंती तुज
आले तुजशी शरण

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...