मंगळवार, ९ जुलै, २०१९
सोमवार, ८ जुलै, २०१९
वारी पंढरीची (सुधाकरी)
चला विठूकडे ।
दर्शन घेण्यास ।
जाऊया वारीस ।
पंढरीला । ।
वारीत जाण्याची ।
मजाच आगळी ।
जगात वेगळी ।
सर्वाहूनी । ।
रमतो भजनी ।
वारकरी मेळा ।
दाटतो उमाळा ।
अंतरात । ।
विठ्ठल सावळा ।
ऊभा विटेवरी ।
कर कटावरी ।
सदाकाळ । ।
ज्ञानोबा तुकाचा ।
होतसे गजर ।
दुःखाचा विसर ।
पडतसे । ।
गोजीरे ते रुप ।
भावे अंतरात ।
दिसे मंदिरात ।
मनोहर । ।
विठ्ठल नामाचा ।
करिती गजर ।
वारीत हजर ।
आनंदाने । ।
वारीत दिसतो ।
"मी " " तू "चा अभाव ।
समतेचा भाव ।
चोहीकडे । ।
मनी एक आस ।
दर्शन घेण्याची ।
वारीत जाण्याची ।
पुरवावी । ।
वैशाली वर्तक
आठवणीतला पाऊस
वर्षा धारा अवनी बरसती
गर्दी दाटे कृष्ण मेघांची
ऋतू हिरवा जन म्हणती
उडे पाचोळा दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गर्जते दामिनी अंबरात
टप टप धारा बरसती अवनी
अवनी मोर दावी नृत्य मनोहर
झेलती पक्षी थेंब, पंख पसरुनी
तृप्त झाली पाणी पिऊनी
टप टप पागोळ्या पडती दारी
गंध मातीचा दरवळे दिशातूनी
वर्षा ऋतुची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची चवच आगळी.
जून्या आठवणींना आणितो पूर
घडले असूनी जरी गतकाळात
आठवांनी भरुन येतो ऊर
गुरुवार, ४ जुलै, २०१९
मी का लिहीते
मी का लिहीते ?
लिहीणे म्हणजे स्वतः व्यक्त होणे. लिहीण्यात स्वतः चे विचार व्यक्त केल्याचे समाधान मिळते. मला काय वाटते. ? एखादा प्रसंग पाहून, वा ऐकून ,वाचून त्या प्रसंगाचे तंतोतंत वर्णन करणे व ते दुस-यास वाचायला देणे .व दुस-याने ते वाचून
त्या लिखाणाचा आनंद घेणे .यात दोघांना समाधान मिळते.
आपण बरेच वाचतो. त्यातील आवडलेल्या वाचनाचा आनंद घेतो. तसेच बरेच विचार मनात घोळत असतात. तर त्या विचारांना शब्दात बांधणे व सुसंबिधत करणे याला म्हणतात लेखन करणे . काही जण कुंचला घेऊन आपले विचार चित्रातून दाखवितात. तर बरेच जण लेखणीतून आपले विचार प्रगट करतात. काही वत्कव्य करुन संवाद साधून वा भाषण देऊन विचार मांडतात.
देवाने मेंदू बहाल केल्याने विचार शक्ती दिली आहे .मेंदू त्याचे काम अविरत करत असतो. तर मेंदू च्या योगाने तयार झालेली विचार मालिका कागदावर उतरविलीच पाहिजे ना.
मला पण लिखाण माध्यमातून आपले विचार इतरांना पोहचविण्यात आनंद वाटतो. मुले लहान होती .अथवा आजपासून 40 वर्षापूर्वी टेलीफोन इतके सर्वत्र नव्हते निदान माझ्या कडे तरी नव्हता. .तेव्हा मुलांची प्रगती , पत्र लिहूनच सासूबाईंना मी कळवायची. अगदी inland चा पुरेपुरा उपयोग करुन लिहून कळवायची. व त्यांना पण सविस्तर खुशाली कळल्याचा आनंद मिळायचा. आता पत्र लेखन बंद च झाले.
पण लिहीणे केव्हाही चांगले . कित्येक जण डायरी दैनंदिनी लिहीतात .त्यात पण आपण आपल्याशी व्यक्त होतो.
आता मी का लिहीते तर मनात येणा-या विचारांना , कल्पनांना मी कागदावर मांडल्या शिवाय मन स्वस्थ बसू देत नाही .वा मन ते विचार (मनात आलेले) मला, माझ्या लेखणीला प्रेरित करतात व हात नकळत लेखणी कडे जातो . कधी गद्यात तर कधी पद्यात .शब्द लेखणीतून कागदावर उमटतात. मग कधी फूले पाहून ,निसर्ग पाहून तर कधी विचारांच्या गुंत्यात आडकून कधी ललित लिखाण होते. तर कधी चित्र काव्य . आणि फेस बूकच्या विविध समुहातील दिलेल्या विषयांवर सतत लिखाण चालू असते.
आताच पहा ना सहज विचार आला की, "मी का लिहीते "?. तर सहजपणे ....
लेखणी झरली.
वैशाली वर्तक.
रविवार, २३ जून, २०१९
कचरा
कचरा 23/6/2019
सकाळ पासून दिवस भरात
तयार होत असतो , तो कचरा
वस्तूंचे जे निरुपयोगी रुप
करावा तयाचा नित्य निचरा
कशाला करिता उगाच गवगवा
सतत कचरा कचरा वदूनी
असता उभी कोप-यात केरसूणी
करेल क्षणात तयासी, दूर सारूनी
झाडूनी काढिता स्वच्छ सदन
म्हणती वसे, लक्ष्मी सदाकाळ
नसता कचरा ,लाभे निरोगी जीवन
दिसे न व्याधीची बाधा , कदाकाळ
हा तर झाला भौतिक कचरा
खरा कचरा वसे, मना मनात
तयास, दूर सारण्यास मात्र
सद् विचार येती , कामास क्षणात
करा दूर मनातील षडरिपूंना
मोह माया मद मत्सर न् लोभ
तोचि असे वैचारिक कचरा
थांबवावा तयांचा आधी क्षोभ
वैशाली वर्तक
शुक्रवार, २१ जून, २०१९
वडा भात
यामिनीने वडा भाताचा प्रोग्राम नक्की केला. व-हाडी वा आम्हा नागपूरकरांचा वडा भात फार आवडीचा .अगदी चवीने खातोत.आपण एक दिवस माझ्या कडे वडा भाताचा प्रोग्राम करु या ना .! सर्व सख्या एक सुरात म्हणाल्या होss करु की . सर्व जणी संसारातून थोड्या फार मोकळ्या झालेल्या आणि महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांच्या wave lines जुळलेल्या, त्यामुळे कुठलाही प्रोग्राम यशस्वी होतोच . ठरल्या दिवशी सा-या जणी यामिनी कडे जमल्या .तिने भात करुन ठेवला होता. मग सख्यांनी वडे तळण्यास मदत केली .यामिनीने हिंग पाणी तयार करून ठेवले होते. भात व वडे पानात कुस्करुन त्यावर फोडणीचे गरम तेल , मीठ , चटणी , व महत्त्वाचे हिंग पाणी जे तयार केले होते .ते टाकले जेणे करून वडे बाधू नयेत . सर्वांनी आवडीने वडा भात व आजू बाजूचे पण पदार्थ खाल्ले .माझ्या मनात वडा भात खाता खाता भात व त्याचे विविध प्रकार बद्दल सहज विचार चक्र फिरू लागले खरच भारतीयांचे मुख्य धान्य गहू व भात .त्यातून भाताचे अगदी बालपणी पासूनचे म्हणजे अगदी infant अवस्थे पासून चे वा बाल्यावस्थेपासून चे नाते असते. अगदी सुरुवातीस भाताची पेज , भाताचे पाणी वा काही जण कांजीं म्हणतात . ती पण या भाताचीच असते, पुढे आपल्यात तर उष्टावण करतांना याच भाताला पहिला मान मिळतो..पुढे मऊ भात तूप वरण मीठ घालून आजी अथवा आईने कालविलेला भात खाऊन मुले गुटगुटीत होतात. त्या गुटगुटीत शब्दावरून आठविले .तो म्हणजे गुरगुट्या भात. गुरगुट्या भाताची चवच न्यारी असते. त्या भातावर साईचे दही , थोडे तूप मीठ टाकून खाणे म्हणजे आहाहा पंचपक्वान्ने त्या समोर फिकी वाटतात. त्यातून पावसाळ्यात रिमझीम ,वा झिरमीर पाऊस पडत असता गरम गुरगुट्या भात व त्यात मेतकूट लिंबू मीठ म्हणजे तर अप्रतिम तसेच पचनास पण हलका . साऊथ कडे गेलो की भात तर त्यांचे मुख्य अन्न .रसम् सापड्म , लेमन भात , टाॕमेटो भात , किती तरी प्रकार आढळतात. ऐवढेच काय कालचा राहिलेला भात दुस-या दिवशी जीरे , हींग , कढीपत्ता ,उडीद डाळ व त्यात कांदा टाॕमेटो टाकून फोडणीचा भात तर सकाळी न्याहरीची मजा वाढवितो. नारळी पौर्णिमेचा नारळी भात , तसेच केशर भात , पाईनेपल भात , वगैरे गोड भाताचे प्रकार पण आवडीचे असतात . पंक्तीत तर मसाले भात बरोबर बाजूला केसर भाताची मुद जेवणाची लज्जत वाढवित असते. तसेच चित्रांन (भाताचाच प्रकार ) चण्याची डाळ भिजवून , शेंगदाणे टाकून केलेला चित्रांन भात फार रुजकर लागतो. कर्नाटकातील बुत्ती भात प्रसिध्द आहेच .कित्येक ठिकाणी कर्नाटकात रेल्वे स्टेशनवर पण केळ्याच्या पूडीत बांधून मिळतो. प्रवासा जातांना मऊ भातात भरपूरदूध घालून उगीच विरजणा पुरते दही घालून तूप जी-याची हींग उडीद डाळ लाल सुकी वा सांडगी मिरची फोडणीस टाकून कालविलेला भात फारच रुचकर तर लागतोच पण प्रवासातील अबर जबर येत असालेले खाल्ला वर हा भात पोटाला व मनाला थंडक पोहाचवतो. उत्तर प्रदेशात लांब सडक सुगंधी बासमती भाताचा पुलाव सर्व देशभर प्रसिध्द आहेच. त्याचे पण किती तरी प्रकार आहेत .तसेच ओले वाटाणे भात , बिरयाणी जीरा भात हे सारे भाताचे प्रकार प्रचलित आहेतच. सध्या जसे पहेरवेशात बदल होत चालला आहे तसेच खाद्य पदार्थाचे पण अनुकरण होत आहे .चाईनीज फूड जसे लोक प्रिय होत गेले .तसे शेजवान राईस पण फार प्रचलित झाला आहे. लाल चुटूक शेजवान राईस मंचुरियन बरोबर मुले आवडीने खातात.त्यांना घरचे पदार्थ तिखट लागतात. ते चालत नाही. पण तो तिखट शेजवान भात आवडीने खातात. तर असे आजून पण अनेक भाताचे प्रकार माझ्या मनात डोकावून गेलेत. व अजूनही प्रकार आहेत .तेव्हा थोडक्यात काय खाणा-यांना काय बहाणा पाहिजे. तेव्हा वडा भात खायला घालणा-या यामिनीचे व नागपूरच्या वडा भाताचे शतदा आभार की ज्याने येवढी विचार मालिका दिली. Sent from Yahoo Mail on Android
सोमवार, १७ जून, २०१९
राधा कृष्ण प्रेम ( पंचाक्षरी)
राधा कृष्ण प्रेम
असे निराळे
जगा आगळे
राधा कृष्णाचे
प्रेम वेगळे
राधा गौळण
करी मंथन
कृष्ण कृष्णची
बोले कंकण
वेणु वाजवी
गीत लाघवी
कृष्ण मुरारी
जीवा मोहवी
हरपे ध्यान
राधेचे भान
ऐकून पावा
तृप्त ची कान
काढितो खोडी
घागर फोडी
खट्याळ भारी
लावितो गोडी
कोसी गोपिका
कष्टी राधिका
सोड आक्रूरा
बोले प्रेमिका
भक्ती प्रतिक
असे सात्त्विक
प्रेम तयांचे
सदा आत्मिक
हरीचे रूप
हे आत्मरूप
अव्दैताचे ते
उजळे दीप.
वैशाली वर्तक
अलिप्तता व दुर्लक्षता
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...


