स्वराज्य लेखणी मंच आयोजित
कवयित्री सुनीता कपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य लेखन स्पर्धा
उपक्रम १
काव्य प्रकार अष्टाक्षरी
दि १३\४\२५
विषय... ताई...एक वरदान
*स्पर्धेसाठी*
शीर्षक...*ताई तू दुजी आई*
माया तुझी आई सम
तुझी सय सदा राही.
किती केले लाड तूच
विसरणे शक्य नाही 1
होता कधी चूक माझी
तूची घेई सावरून
तुझ्या पदराच्या आड
बसलेला , मी लपून. 2
परीक्षेला पण, जाता
तुझ्या आशीषाचा हात
असे सदा शिरावर
यशासाठी तुझी साथ. 3
आई बाबांची काळजी
किती तू कर्तृत्ववान
झाली तूची आई त्यांची
वाटे ताई मज वरदान 4
*ताई ...एक वरदान*
तिच दुजी असे आई
सदा ऋणी जीवनात
कसा होऊ उतराई. 5
ऋण तुझे जन्म भर
कसा होऊ उतराई.
पूर्ण कर आस देवा
जन्मोजन्मी हीच ताई. 6
वैशाली वर्तक.
अहमदाबाद.
८१४१४२७४३०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा