उपक्रम --चित्र काव्य
चार रस्यावर विकून झेंडे
शोधिली ध्वज रोहणास काठी
रोवून झेंडा झाडा खाली बसली
ठेवले होते ध्वज स्वतःसाठी
न मिळता ध्वज तीसरीस
अंगी लेवून झगा हिरवा
केसरी कपडा पांढरा खोका
तयार झाला तिरंगा बरवा
अंगावरती वस्त्र फाटके
ध्वज तिरंगा हाती शोभे
न जाणिती मोल स्वातंत्र्याचे
पण स्वानंदाने वंदनास उभे
घेऊन हाती तिरंगा देशाचा
झाडा खाली झाली गोळा
नारा लावूनी भारत मातेचा
झाला स्वातंत्र्य दिन सोहळा
वैशाली वर्तक
अभामसाप पुणे शहर आयोजित भव्य
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
१५-८-२३
स्पर्धेसाठी
विषय..प्रणाम माझा भारत देशा
शीर्षक... किती गाऊ थोरवी
प्रणाम माझा भारत देशा
सदा मनी तुझा अभिमान
प्राणाहूनी असे मज प्रिय
तुला गौरविण्यात माझी शान
असुनिया जाती धर्म अनेक
वसे समतेचा भाव जनात
रहाती एकोप्याने देशवासी
असा देश नसे , कुठे जगात
एकता नांदे माझ्या देशात
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखुनिया मान शब्दांचा
घडविला अखंड भारत एक.
अशी नांदे विविधतेत एकता
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल ,बाल ,पालांची स्मृती जागता
नागरिकांचा उंचावतो माथा
अभिमान वाटे शास्त्रज्ञांचा
नव्या युगाचा बदल घडविण्यात
प्रगतीशील भारत देश माझा
टाकिले त्याने पाऊल अंतरिक्षात
असा संपन्न समृद्ध भारत
थोर संत वीरांची असे खाण
कला संस्कृतीचे करी जतन
विश्वात शोभता ,मिळे बहुमान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच रत्नागिरी
आयोजित
विषय ...जपू राष्ट्राची एकता
जिथे दिसे समता भाव सर्वत्र
असुनिया जाती न् धर्म अनेक
न करी कधी भेद भाव तयात
तोचि असे असे भारतीय एक.
अभिमान हा , आपणा संस्कृतिचा
बाळकडू प्यायलेला संस्काराचा
परोपकारी जीव सदा तयाचा
भाव वसे सदा विश्व बंधुत्वाचा.
रक्ताचा एक ,थेंबही न सांडिता
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखूनिया केवळ शब्दांचा मान
घडविला अखंड भारत एक.
अशी नांदे विविधतेत एकता
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल -बाळ-पालांची स्मृती जगता
भारतीयांची जी , उंचाविते माथा
घडविण्या बदल नव्या युगाचा
पाऊल भारतीयांचे पुढे सदा
आली कितीही परकीय संकटे
न डगमगे मन , तयांचे कदा. .
अशी आहे संस्कृतीची शिकवण
तिचेच करु सदा जतन
जपू राष्टाची एकात्मता
घेउ सारे नागरिक मिळूनी वचन
वैशाली वर्तक
अहमदाबाद
..
अभाम हा प ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम क्रमांक 518
काव्य लेखन
विषय..स्वातंत्र्य दिन
शीर्षक..मोल जाणा स्वातंत्र्य दिनाचे
गौरवास्पद दिन आजचा
स्वातंत्र्य दिन भारताचा
दिन भासे सोनियाचा
आनंद सोहळा करण्याचा
बराच झालाय प्रगत
देश आपला भारत जगात
नव्या युगाचा नव्या जोमाने
शोभून दिसतोय भारत विश्वात
झाले उदार जीवावर स्वातंत्र्यासाठी
दिन असे तयांना स्मरणाचा
दिले बलिदान वीर क्रांतीकारींनी
मोल स्वातंत्र्याचे जाणण्याचा
घेत काळजी पर्यावरणची
राखण्या स्वच्छ सुंदर भारत
दावू भाव समानतेचा बनविण्या
आत्मनिर्भर करु प्रयत्न अविरत
वैशाली वर्तक
अहमदाबाद
देशभक्त गीत
सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
विषय ... देशभक्ती गीत
माझ्या भारत देशाचा, मला सदा अभिमान
प्राणाहून असे प्रिय, तयाच्या गौरवात शान
भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक
नसे भेद- भाव जना ,असा देश जगी एक
काय असे किती वर्णू , भारताचे गुणगान
प्राणाहून असे प्रिय , तयाच्या गौरवात शान
पहा किती एकात्मता, होती संस्थाने अनेक
मान ठेवून शब्दांचा ,अखंडित झाली एक
वल्लभभाईंच्या शब्दांचा, दिधला जगी मान
प्राणाहून असे प्रिय तयाच्या गौरवात शान
देश हा आत्म निर्भर, येता प्रसंग तो बाका
स्वावलंबी होती जन, येता मदतीच्या हाका
विश्वात शोभून दिसता, उंचावते अभिमाने मान
प्राणाहून असे प्रिय तयाच्या गौरवात शान
माझ्या भारत देशाचा मला सदा अभिमान
प्राणाहून असे प्रिय तयाच्या गौरवात शान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा