कल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित
उपक्रमासाठी
विषय ... विलक्षण
झाला *विलक्षण* आनंद
करु कसे वर्णन शब्दांत
मन डोले आनंदाने
लेखणीची किमया लेखनात
जपलीय मनात मी
माझी पहिली कविता
अगणिक जरी रचल्या
तीच ठरली *गर्विता*
केले होते वर्णन तयात
माझ्या बागेतील फुलांचे
एका एका फुलांनी वर्णिले
महत्त्व आपापले स्वतःचे
लिहीली होती कन्येसाठी
भावली तिला अतिशय
सहज केली तिने तोंडपाठ
समजून घेऊन आशय
साध्या सोप्या शब्दात
केली शब्दांची मांडणी
बालभारती पुस्तकासाठी
आली की हो! तिजला मागणी
विलक्षण भारावले मनातून
पहिली रचिली, कविता सहज
रंगवूनी भावना मनीच्या
तिचे गुण गाण्याची नुरली गरज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा