उपक्रम ललित लेखन
विषय.... तुझे असणे
विविध रंगी फुले उमलेली , कोणते पाहू कोणते खूडू..असे झाले होते मनात.
सारीच नयनरम्य जणू स्मित हास्ये स्वागत करीत होती . तयात वसंताचे आगमन झालेले मग काय विचारता?.सृष्टीला जराही उसंत नव्हता उमलण्यात... बहरण्यात.
हे सारे विचार मनातले बरं का .....मी बागेत फिरत असता आलेले..
खरच काय विविधता फुलांची.... त्यांच्या रंगाची आणि गंध तर विचारुच नका.
मधुनच झुळुक तर खोडकर वारा. माझ्या बटांना. तसेच पदराला उडवत खट्याळ पणे
वहात होता. सर्वत्र निसर्ग फुललेला नटलेला.
मी निवांत एका बाकावर बसले... तर रंगी बेरंगी फुल पाखरे. या फुलावरून त्या फुलांवर स्वच्छंदे भिरभिरत होते.हे सारे पाहून मला त्या विश्वेश्वराची मनोमनी सय झाली व सहज ओळी ओठी आल्यात
तुझ्या अस्तित्वाचा खेळ
आहे या जगती न्यारा
तूची घडवीशी तोडीशी
जगातील पसारा सारा
खरय तुझे असणे हेच या सा-या गोष्टी घडवित आहे. तुझे असणे ....तुझ्या अस्तित्वाची जाण मानावीच लागते सर्वदा. कारण तूच हे नभीचे चंद्र ,सूर्य. तारे .निर्मित केलेस . तुझ्या निर्मित सूर्याने दिन चक्र अविरत चालत असते. ऋतू चक्र चालते न थांबता ...सृष्टी उजळते प्रकाशित होते.व नवनित बदल होतात.
तुझ्या असण्यानेच व तुझ्याच कडून मिळणाऱ्या सहज शिकवणीने. मानव प्रगत होत आहे. आणि हे देखील तितकेच खरे की तुझ्या संमती शिवाय हा निसर्गाचा खेळ चालणार नाही,व मानवाच्या अस्तित्वाचा मेळ जमणे अशक्य. किती ही प्रगती केली तरी तुझ्या असण्याची जाणीव सर्वांना आहेच.
अथांग सागर व त्याच्या उचंबळून येणाऱ्या लाटा... तर.कुठे द-या खो-या ,तर कुठे उत्तुंग शिखरे, तर कुठे वालुकामय जमिनी, सारे सारे तुझ्या असण्याची जाण करविते.
उगा का म्हणतात. तुच कर्ता आहेस.
वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा