शनिवार, ९ जुलै, २०२२

हरी नामाचा गजर

सिध्द  साहित्यिक  समूह
आयोजित  उपक्रम क्रमांक ४४६
विषय -नाम गजर


     *हरी नामाचा गजर*

वारी निघाली पंढरी
विठु नाम ओठावरी
हरी भक्तीत न्हाहती
वारकरी निरंतरी

जय घोष विठ्ठलाचा
एकादशी  आषाढीला
नाम गजर करिता
चला जाऊ पंढरीला

विठ्ठलाच्या गजरात
 वारकरी होती गोळा
घेता दर्शन विठुचे
वाहे आनंदाश्रू डोळा

नाम स्मरणात असे
अनामिक दृढ शक्ती 
दूर   होती भवताप
करा मनोभावे भक्ती

झेंडा रोवतील तीरी
हरी नाम गजरात
दुम दुमेल पंढरी
विठ्ठलाच्या भजनात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...