गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

रंग निसर्गाचे

 पहा रवीराज नभी

सोनेरी किरणांनी लाजत

दिसे गगन केशरी  रंगात

मुरडत येते ऊषा हासत


 फुले उमलली गंधित

पानोपानी हळुच डुलत

विविध रंगाची उधळण

सुंदर  निसर्ग खुलवत


जलाशय घेई रंग नभीचा

सुंदर  नभ सुनील रंग

रुप तयाचे पहाण्यात

मन सदैव राही दंग



येता वर्षा अवनी बहरे

 सखा तिज नटवे सजवे

रुप तिचे पार बदले

नववधू सम दिसे बरवे


  दाखवी  रंग नवे नवे

निसर्ग च चित्रकार खरा

ऋतु चक्रा प्रमाणे  दावी

निसर्गाच्या विविध त-हा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...