मज जडली सवय
सदा लेखन करण्याची
मिळता पुरस्कार एकदा
मन गुंतले सदाची
करीता लिखाण रोजची
धार चढली लिखाणास
होत गेली खैरात आता
रांग लागली पुरस्कारास
देती समूह प्रशासक
वाढावे लिखाण म्हणून
वेळोवेळी न चुकता
पुरस्कार आवर्जून
होतेय आता समुहावर
खैरात पुरस्कारांची
तरी पाहून पुरस्कार
ओढ लागे लिखाणाची
नसावे लेखन पुरस्कारासाठी
होते वाढ आपल्या साहित्यात
मिळते विचारांस गती
निपुणता वाढे लेखनात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा