अभा म सा प ठाणे जिल्हा
उपक्रमासाठी
क्र 87
विषय - दुपारच्या पारी
*विरंगुळा*
दुपारच्या पारी
वेळ विश्रांतीची
सवय जडली
ती वामकुक्षीची 1
दारात उभ्याने
गप्पाच रंगती
कधी गंमतीच्या
मैत्रिणी संगती 2
मग सय येई
दुपाराच्या पारी
गप्पा फार झाल्या
झोप आली भारी 3
तरी न संपती
फड तो गप्पांचा
खेद वाटे मना
झोप चुकल्याचा 4
कधी ऐकायला
मौज वाटे गाणी
दुपारच्या पारी
जुनी ती पुराणी 5
कधी गमे मज
घेऊन लेखणी
कविता रचावी
असेल देखणी 6
म्हणूनच आज
दुपारच्या पारी
रचिली पहा मी
सहाक्षरी भारी 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित उपक्रम
२९\७\२३
विषय प्रीत मैत्रीतली
प्रीत मैत्रीतली
दोनही जीवात
वाहे प्रेम झरा
सदैव मनात
नसे दुजाभाव
मदतीस साथ
प्रेमळची भावे
घेत हाती हात
प्रीत मैत्रीतली
दावीती महती
कृष्ण सुदाम्याची
सारेची जाणती
नातेच मैत्रीचे
असतेच गोड
कदा दोन मनी
दिसेनाची खोड
सर्वां मिळो सखा
द्रौपदीचा हरी
प्रीत मैत्रीतली
मोद जग भरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विश्व लेखकांचे
उपक्रम
सहाक्षरी काव्यलेखन
विषय .. बेचैन मन
शीर्षक...बावरे हे मन
कसे सांगू तुला
मन हे बावरे
येना तू सख्या
भेटण्या धावरे
वाट पाहूनीया
लक्ष न कशात
न उमजे काही
वेडे मी तुझ्यात
वा-याची झुळूक
स्पर्शूनीया जाता
मिळाला सांगावा
येणार तू आता
चंद्रास नभीच्या
आहे रे जाणीव
मनीची माझिया
कळली उणीव
वाट पहाण्याची
माझ्या मनी रीत
सांजवेळ झाली
धुंद मनी प्रीत
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा