शुक्रवार, २७ मार्च, २०२०

गुढी प्रेमाची

काव्यपुष्प साहित्य  मंच राज्यस्तरिय
     काव्य लेखन स्पर्धेसाठी
     विषय - गुढी उभारु प्रेमाची


   **गुढी प्रेमाची**
  आला सण पाडव्याचा
  लावू गुढी समतेची
  दूर सारु जाती भेद
  **गुढी उभारु प्रेमाची**

   विसरुनी राग द्वेष
  मनी भरु प्रेम भाव
  जसे होते रामराज्यी
   नसे सुखाचा अभाव

   स्वच्छ ठेवण्या भारत
   करु निर्धार मनाचा
  पळवून कोरोनाला
   क्षण आणू आनंदाचा

  बांधू  तोरण आंब्याचे
  दारी रेखुया रांगोळी
  सौख्य नांदो घरोघरी
  काढू शुभेच्छांच्या ओळी.

  जग सुखी सारे होवो
  हेच मागणे देवास
 पूर्ण  होवोत कामना
  दूर कर कोरोनास

  ध्येय ठेवू सदा उंच
  मुखी ठेवूनी गोडवा
  जपू संस्कार संस्कृती 
  आला सण हा पाडवा

 ......वैशाली वर्तक.....23/3/2020
       अहमदाबाद
  8141427430

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...