रविवार, २२ मार्च, २०२०

सुगी

सुगी

सोनियाचे आले दिन
दिसे सुख शिवारात
धान्य  आले बहरुन
बळी हसतो गालात

 येता पीक  भरघोस
मोल जाहले कष्टाचे
दिसे दारी धान्य  रास
दिन दाविले सुगीचे

कणसात दाणे भार
जणु भासे  मोती-मोती     
पाखरांची झुंड फार
हवी  गोफणच  हाती

आली कणसे खळ्यात
बैल फिरती जोमाने
सुरु मळणी झोडणी
गाणी गाती आनंदाने

 झाली चंगळ चा-याची
  बळी खुश  मनोमनी
  हंबरती गाई गुरे 
 मोद दिसे  क्षणो क्षणी                       

देवाजीने केली कृपा
स्वप्न पहा साकारले
राजा राणी पोर बाळे
घर सारे आनंदले

वैशाली  वर्तक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...