सांताक्लाॕज (ललित)
सांताक्लाॕज म्हणजे देवदुत ...बालपणी मुलांना त्याच्या आवडीच्या विविध
गोष्टी आणून देणारा. त्यांच्या इच्छा पु-या करणारा. रात्री सांता येईल व तो बर्फाने अच्छादलेल्या ख्रिसमस ट्री वर त्या वस्तू ठेऊन जाईल अशी गोड कल्पना पालकांनी दिलेली असते.
तसे प्रत्येक पाल्याचे बाबा.... आताच्या काळात आई पण....हो आई पण आॕफीसला जाते .त्यामुळे मुलांसाठी त्या पण सांताक्लाॕज झाल्या आहेत.
हो ..मला तर लहानपणी माझे बाबा सांता च वाटायचे ..काही वस्तू मागा दुस-या दिवशी येतांना अथवा बाहेरून आले की ती हजर असायची.
मला आठवतय मी माझ्या मुलांना विविध स्पर्धेत भाग घ्यावयास लावायची व स्पर्धेला घेउन जातांना वा ते निघाले की म्हणायची ,"नीट भाग घ्या, यशस्वी व्हा. घरी आल्यावर देवबाप्पा पहा तुम्हाला बक्षीस देणार आहे " ..व मग ती मुले गेल्यावर काही तरी वस्तू , मुले घरी येण्या अगोदर देवा जवळ ठेवून द्यायची .पोर त्यांचे ते ,
तर विजेता होऊन यायचेच व घरी आल्यावर बाप्पाने पण गीफ्ट दिलय पाहून मुले खुश व्हायची. घरी बक्षीस मिळाल्याने जर कधी यश नाही मिळाले...... तर ती नाखुष होऊ नये म्हणून या बक्षीसाने खूश व्हायची. की देवाने तर बक्षीस दिले.
तोच पुढे देवावरचा विश्वास म्हणून कामास आला. देवाने महेनत केली तर नक्कीच यश देतो.तेच विचार आज पण रुजले आहेत. की देवाने सुदृढ शरीर दिलेले आहे त्यात सुंदर मन ..जे सकारात्मक भावनांनी ठेवले पाहिजे .व यशासाठी प्रयत्न
केले पाहिजेत.. म्हणजे देवदुत म्हणजेच सांताक्लाॕज तुमच्या इच्छा पूर्ण करतो. कधी वेळ लागतो ...कधी नाही पण मिळत ,...पण हार न मानायची ही इश्वरी गीफ्ट ..इच्छा शक्ती तो सांता देतच असतो.
अशी सांताक्लाॕजची.. देवदूताचे सांताक्लाॕजचे बालपणातील रुप.... आई बाबा चे बदलत जाऊन ...देवा पर्यंत येउन पोहचले आहे . असा सांताक्लाॕज तुमच्या पण मनातील इच्छा पूर्ण करो व बक्षीस रुपी यश सदैव देत राहो. हीच नाताळ बाबाला प्रार्थना .
वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा