*निखील ..*
मग दोघे खेळली आणि शेवटी त्या दोघांनी खेळता खेळता खेळणी भरली.दुसरा खेळ खेळायला लागले.पण निखीलच्या मनास त्या सुगंधी रबराने भुरळ पाडली होती.त्याने ते रबर हळूच आपल्या हातात ठेवले.त्याच्या मित्राला नकळत त्याने खिशात ठेवले.त्याची आई व मैत्रीणीच्या गप्पा झाल्या. थोड्या वेळाने मग आई व तो आपल्या घरी आले.निखीलने रबर हळूच स्वतःच्या दप्तरात ठेवले.
.. दोन तीन दिवसांनी आई निखीलचा अभ्यास घेत असता सहज तिचे लक्ष त्या रबराकडे गेले.आई म्हणाली,
" अरे, निखील, हे रबर कुठून आणलेस ? आपल्याकडे तर असे नव्हते. "
तो गप्प राहिला.आईने पुन्हा विचारले,
" सांग ना .. "
खोटे बोलणे पाप असते म्हणून खोटे कधी बोलू नये,ही आईची शिकवण त्याला आठवली. म्हणून याने खरे सांगून दिले .
आई म्हणाली ,
" अरे , दुस-यांची वस्तू न विचारता घेणे , याला चोरी म्हणतात.तुला त्या रबराचा मोह झाला व तू ते रबर घेतलेस ? आणि त्यालाच मोह म्हणतात.मोह होऊन तुला ते रबर घेण्याची , जे आपले नाही तरी ते घेणे, यालाच तर ती चोरी म्हणतात.तू त्याला विचारुन घेतले असते तरी चालले असते पण न विचारता घेणे,हे पाप आहे ."
निखील घाबरा घुबरा झाला.रडू लागला .
आई म्हणाली,
" घाबरु नको बेटा.देवाजवळ जा,देवाला नमस्कार कर व त्याला सांग, की देवा माझे चुकले.मी त्याचे रबर न विचारता घेतले.मला क्षमा कर .आता मी कधी अशी चुक करणार नाही. उद्या माझ्याबरोबर चल व ते रबर त्याला परत कर. "
निखीलने मान हलवली.
दुसऱ्या दिवशी त्याने आई बरोबर जाऊन रबर परत केले.
.. काही दिवसांनी तो बाजारात असताना त्याला कोणातरी माणसाचे पैसे खिशात टाकत असता खाली पडलेले दिसले. ते पैसे एक माणूस उचलत होता. निखीलने जाउन त्या माणसास आडविले व म्हणाला ,
" थांबा , हे पैसे या काकांचे आहेत.तुम्ही त्यांचे पैसे पडतांना पाहिले म्हणून त्यांना द्यावेत. "
तो दुसरा इसम थांबला आणि शरमला .त्याने ते पैसे ज्याचे होते त्याला दिले.ते दोघे इसम एकमेकांकडे पहात राहिले.
निखील म्हणाला ,
" जी वस्तू आपली नाही, ती घेणे हीदेखील एक चोरीच असते. "तो बोलतच राहिला आणि त्याचे शहाणपणाचे बोलणे ऐकून ते दोघे त्याच्याकडे अवाक् होऊन पाहतच राहिले .....
निखील ..*
.. निखील गोड मुलगा. दिसायचाही गोड. बोलायचा पण गोड.एकदा सहज आईबरोबर तिच्या मैत्रीणीकडे गेला होता. तिचाही त्याच्याच वयाचा मुलगा होता.ते दोघे एकत्र खेळले.खेळता खेळता त्या मुलाने त्याची खेळणी काढली. त्यात एक सुंदर रंगीत रबर होते. सहज निखीलचे लक्ष त्या रबराकडे गेले. त्याने ते हातात घेताच तो मित्र म्हणाला ,

" अरे, बघ त्या रबरास किती सुरेख सुगंध आहे ." निखीलने ते रबर हाती घेतले.त्याने त्याचा सुगंध घेतला.निखील म्हणाला ,
"खरच की रे! छान सुगंध येत आहे. "मग दोघे खेळली आणि शेवटी त्या दोघांनी खेळता खेळता खेळणी भरली.दुसरा खेळ खेळायला लागले.पण निखीलच्या मनास त्या सुगंधी रबराने भुरळ पाडली होती.त्याने ते रबर हळूच आपल्या हातात ठेवले.त्याच्या मित्राला नकळत त्याने खिशात ठेवले.त्याची आई व मैत्रीणीच्या गप्पा झाल्या. थोड्या वेळाने मग आई व तो आपल्या घरी आले.निखीलने रबर हळूच स्वतःच्या दप्तरात ठेवले.
.. दोन तीन दिवसांनी आई निखीलचा अभ्यास घेत असता सहज तिचे लक्ष त्या रबराकडे गेले.आई म्हणाली,
" अरे, निखील, हे रबर कुठून आणलेस ? आपल्याकडे तर असे नव्हते. "
तो गप्प राहिला.आईने पुन्हा विचारले,
" सांग ना .. "
खोटे बोलणे पाप असते म्हणून खोटे कधी बोलू नये,ही आईची शिकवण त्याला आठवली. म्हणून याने खरे सांगून दिले .
आई म्हणाली ,
" अरे , दुस-यांची वस्तू न विचारता घेणे , याला चोरी म्हणतात.तुला त्या रबराचा मोह झाला व तू ते रबर घेतलेस ? आणि त्यालाच मोह म्हणतात.मोह होऊन तुला ते रबर घेण्याची , जे आपले नाही तरी ते घेणे, यालाच तर ती चोरी म्हणतात.तू त्याला विचारुन घेतले असते तरी चालले असते पण न विचारता घेणे,हे पाप आहे ."
निखील घाबरा घुबरा झाला.रडू लागला .
आई म्हणाली,
" घाबरु नको बेटा.देवाजवळ जा,देवाला नमस्कार कर व त्याला सांग, की देवा माझे चुकले.मी त्याचे रबर न विचारता घेतले.मला क्षमा कर .आता मी कधी अशी चुक करणार नाही. उद्या माझ्याबरोबर चल व ते रबर त्याला परत कर. "
निखीलने मान हलवली.
दुसऱ्या दिवशी त्याने आई बरोबर जाऊन रबर परत केले.
.. काही दिवसांनी तो बाजारात असताना त्याला कोणातरी माणसाचे पैसे खिशात टाकत असता खाली पडलेले दिसले. ते पैसे एक माणूस उचलत होता. निखीलने जाउन त्या माणसास आडविले व म्हणाला ,
" थांबा , हे पैसे या काकांचे आहेत.तुम्ही त्यांचे पैसे पडतांना पाहिले म्हणून त्यांना द्यावेत. "
तो दुसरा इसम थांबला आणि शरमला .त्याने ते पैसे ज्याचे होते त्याला दिले.ते दोघे इसम एकमेकांकडे पहात राहिले.
निखील म्हणाला ,
" जी वस्तू आपली नाही, ती घेणे हीदेखील एक चोरीच असते. "तो बोलतच राहिला आणि त्याचे शहाणपणाचे बोलणे ऐकून ते दोघे त्याच्याकडे अवाक् होऊन पाहतच राहिले .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा