बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

गणेश वंंदना (आठोळी)

विषय  गणेश उत्सव  गणेश वंदना
गणेश वंदना   7/9/2019
स्पर्धे साठी -
तव नामाच्या महिम्यात
शब्द न उरे गुण गाया
तुची असशी सुखकर्ता
आधी  वंदू  तुज मोरया
तूची आधार या विश्वाचा
चौदा विद्यांचा तू अधिपती
शुभंकर  सा-या जगाचा
सर्व  व्यापी तू गणपती
किती नामे तुज श्री गणेशा
तव रुप मनोहर गजानना
  बुद्धी प्रदाता तूची दुखःहर्ता
  शिवसुता तू गौरी नंदना
वेद सिद्ध तूची एकदंत
रणांगणावर तू  धुरंधर
करण्यास दुष्टांचा संहार
ठेव  सदा कृपा वसुधेवर








स्पर्धे साठी - आठोळी 

तव नामाचा महिमा
शब्द नसे गुण गाया
तुची असे सुखकर्ता
आधी  वंदूया मोरया

तूची आधार विश्वाचा
विद्येचा तू  अधिपती
शुभंकर  तू जनांचा
सर्व  व्यापी गणपती

किती नामे  गणेशाला
 मनोहर गजानना
  बुद्धीदाता दुखःहर्ता
  शिवगौरी चा नंदना

वेद सिद्ध , एकदंत
रणांगणी  धुरंधर
करी दुष्टांचा संहार
ठेव कृपा निरंतर

वैशाली वर्तक   16/12/2019




वैशाली वर्तक 7/9/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...