मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

लेकी कन्या सुन सर्मपित

सिध्द  लेखिका
कन्या सुन सर्मपित काव्य

अनघा अनुजा मुग्धा
तीन असती मम कन्या
दोन पहिल्या  असती स्नुषा
मुग्धा माझी कन्या जणु अनन्या

        स्नुषांनी ही सहज घेतली
        घरची जवाबदारी स्वखुशीने
        मुक्त केले मला जीवनात
        जगण्या माझ्या  आवडीने
दोघी सुना झाल्या मुली घरच्या
कौतुक करण्यात मज देती सुख
कन्या तर आहेच गुणाची माझी
कधीच न देते  ती कोणास दुख        
         अशी मी भाग्यवान   गृहिणी
         वसंत फुलविला त्यांनी सदनी
         सदा सौख्य लाभो त्या तिघींना
         ह्याच शुभेच्छा तयांना जीवनी
अशा कन्या लाभता मला
लाभले स्वर्ग  सुख मजला     
सदा मी राहीन ऋणी तयांची
मम घर संसार त्यांनीच सजला.

वैशाली  वर्तक  23/9/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...