सोमवार, २ सप्टेंबर, २०१९

हायकू1 सागर .2थेंब मोत्याचे 3 माळरान 4पाण्याची रूपे5तुझे हासणे


हायकू
विषय -- सागर

सागर  लाटा
विरतात किनारी
दुःख  निवारी

सागरतीरी
विचारांची भरारी
मना उभारी

सागर तटी
आली मुलांची फौज
पहाती मौज

सागर तीरी
अनिल वाहे मंद
जीवाला छंद

जलअब्धीत
भरले रत्न मोती
वेचूया किती

सागराच्या त्या
उफाळलेल्या लाटा
भितीचा काटा

रत्नाकराचे
अस्तित्व  हे अफाट
रूप अचाट

वैशाली वर्तक   27/8/2019





काव्यस्पंदन राज्य स्तरीय 02
13/6/22
हायकू
विषय - थेंब मोत्याचे

थेंब जलाचा
शिंपल्यात पडला
मोती  जाहला

थेंब मृगाचे
पडण्या  काय  थाट
  पहाती   वाट


खुश जाहला
गाली मोती सरला
बळी हसला

पाने सजली
थेंब मोतीच्या ओळी
जणु रांगोळी 

थेंब मोत्याचे
पर्जन्याने ओवले
 क्षणी विरले

वैशाली वर्तक 
अहमदाबाद








यारिया साहित्य कला समुह आयोजित महास्पर्धा
महास्पर्धा क्र 5
विषय- माळरान       माळरान
हायकू रचना

    **जमला मेळ**

आवडे मज
हिंडणे माळरानी
म्हणत गाणी

ऐकता गाणी
फिरली सा-या रानी
मी अनवाणी

होते काटेरी
झाडे झुडपे फार
काटे अपार

फुले रंगीत
रानफुले सुंदर
ती मनोहर

फुले वेचली
ओंजळ ही भरली
माथी माळली

वृक्षची वृक्ष
 शीतल मोठी छाया
निसर्ग माया


जमला खेळ
माळरानात वेळ
सुंदर मेळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद



स्वप्नगंध साहित्य  समूह  स्पर्धा
हायकू  लेखन

पाण्याची रुपे नदी ...झरा...समुद्र 
विषय -- सागर

सागर  लाटा
विरतात किनारी
दुःख  निवारी

सागरतीरी
विचारांची भरारी
मना उभारी

सागर तटी
आली मुलांची फौज
पहाती मौज

सागर तीरी
अनिल वाहे मंद
जीवाला छंद

जलअब्धीत
भरले रत्न मोती
वेचूया किती

सागराच्या त्या
उफाळलेल्या लाटा
भितीचा काटा

रत्नाकराचे
अस्तित्व  हे अफाट
रूप अचाट

वैशाली वर्तक  
अहमदाबाद

अभा म प सा धुळे जिल्हा
चित्र  काव्य
हायकु लेखन
हायकु



 तुझे हसणे
 भासे चित्ता  मोहक 
 मना वेधक   १

  लोभस हास्य
 जणु चांदणे  फिदा
मोहीत अदा २

नको अडवू
हास तू मुक्त पणे
भासे  चांदणे ३

हसतमुख
चेहराची हासरा
पहा नखरा       ४


 मनी हासणे
 शीतलता भासणे
रूप पहाणे

वैशाली वर्तक




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...