बुधवार, २१ मे, २०२५

कविता शुभेच्छांच्या वाढदिवसाच्या वर्षा अपर्णा पुष्पा. नंदू भावे|माणिक






उषाताई.     आठवणी 
येतात अलवार मृदु शब्द कानी 
दाटलेली मनी सख्यांची  आस
हं,  बोल उषाताई काय म्हणतेस? 
उगाच होतात असे अजूनही भास.


कारण आहेच ती आपल्यात
वसलेली सदैवची बरोबर 
असे भास होणे आहे सहाजिक 
ऊषा, तव स्मृती हृदयी निरंतर 

घेऊन आली अंजली , सोबतीस मजला
पाहू तव कलागुणांचा खजिना जो सजला
रचून ठेवीन सा-या पेंटींग्ज प्रेमभावे
अन् रंगवून टाकू आपल्या सुंदर क्षणाला


माणसे जोडणे अवगत कला तुज
अन् डोळ्यात साठलेले प्रेमळ भाव
मोहक व्यक्तीमत्व विसरू शकेना कोणी 
विविधाच्या सख्यांचा घेतात  ठाव.

आज विविधाचा कार्यक्रम होतो
मंच समजतो , दिवे लागतात 
पण, त्या एका जागी नजर जाते
आणि मन म्हणतं ,ती असती तर.

वैशाली वर्तक
















अनुराधा पिंपळे 

किती शोधक नजरेने
  उभी रम्य निसर्गात 
प्रसन्नता दिसे मुखावरी
 कलेची छटा गवसली मनात 


निसर्ग रंग  भरून नयनी
मनी तयारी कला कृतीची
परिधान वस्त्रावर प्राजक्त 
दावीतो झलक तव कलेची

तव रुपातच दिसती
सोज्वळ  भाव शांत 
जोपासिता छंद पेंटींगचा
 नुरते तुजलाशी भ्रांत

हर एक विविधा कार्यक्रमी
झळकते तव कला कृती
प्रसंगी करून निवेदन 
अलवार दावीते नवी प्रवृत्ती 

  जन्म दिनी सख्या देती
 निरोगी उत्साही आयु कामना
तुझ्या कलेचा सुवास पसरो
 ही माझी देवास प्रार्थना 




वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
१५\१\२६


ज्योती कर्णिक 

तुला पाहून  हे गीत 
सहजची येते ओठांवरी
*सुहास्य तुझे  मनास मोही*
तशीच सोज्वळ तू हासरी

प्रश्न येतोची मनात 
रागे भरतेस का  कधी ?
चिडून बोललेली प्रतिमा 
पाहिली, न कधी मधी

अभिनेत्री हा किताब तुजला
अगणिक नाटके  गाजविली जीवनी
अहिल्या देवी एक पात्री प्रयोग 
राहिला चिरंतन प्रेक्षकां स्मरणी     

आला जवळी तीळगुळाचा सण
 पाहूनी तुज तीळगुळाची  नुरे-गरज
सदा मधाळ असता वाणी
गोड शब्दच तव अधरी सहज

 जन्म दिनी तुजला आज
देते शुभेच्छा आभाळभर
लाभो निरोगी दिर्घायु 
रहा अशीच आनंदी जन्मभर 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद
१३\१\२६


!







!!विजू परांजपे 

  तू तर सखी बालपणीची
काय किती लिहू तुजवर  
 तव नेतृत्व गुणांचे 
आहे स्मरण आजवर
.
मैत्र्य जमविते सहज 
सदा मन मिळावू वृत्ती 
दुजांना करिते आपलेसे  
सहभागी होणे ही मनोवृत्ती.

फार कमी वेळात जाहलीस
लाडकी सखी विविधेची
*सांगते ऐका** समूह गाजविते 
प्रबोधक  भाष्याने सहजची 

  सकारात्मक सदा भाव
   साधी सरळ रहाणी 
 गोड मधाळ वाणी
  पण उच्च विचारसरणी 

आज जन्म दिनी तुला
देती सख्या शुभेच्छा 
मी जरा उशीरा पण
मनोभावे  देते सदिच्छा 

 आजही जन्म दिन तुझा
 प्रार्थना करिते कृष्णास
लाभो निरोगी दिर्घायु
यश किर्ती चा सुवास

विनोदिनी गोडबोले


शुभेच्छा *राधा पागेदार*

   सारे विश्वची करी साजरा
   तव  जन्मदिन आनंदाने 
   मम लेखणी भासे तोकडी 
   तरी मी शुभेच्छा देते उल्हासाने 

    सकारात्मक भाव मुखावर
    जोडीला सुहास्य परिमल मंद
     मधाळ शब्द  सदा गुंजती 
     जे देती सख्यांना आनंद 

   व्यक्तिमत्त्व भरले गुणांनी
   निवेदन, वकृत्व ,गायन
   अभिनयातही प्राविण्य अशी,
   विविधा सखी तू ,गुण संपन्न 

   सहभाग तुझा सर्व क्षेत्री
  तेज दिसे शारदेचे मुखी
   देव राहो कृपावंत देण्या
    तुला निरोगी दिर्घायु सुखी .

   काव्यातून देते  शुभाशिष
   पूर्ण होवोत  मनोकामना 
   जन्म दिनासह नव वर्षाच्या 
   पूर्ण करण्या देवास प्रार्थना .

                वैशाली वर्तक 
             अहमदाबाद
1/1/26



चारुता पिंपळापूरे

कशी उभी धिटुकली
हिरव्यागार   या वनी
काय करतेय संकल्पना 
नव वर्षाची मनोमनी.

 तव कर्तृत्व वर्णू किती 
सर्व क्षेत्रात तुझी गती
सदा राहून आनंदी 
साधतेस तू प्रगती 

 समितीची  खंदी कार्यकर्ती 
मनमिळाऊ उत्तम शिक्षका
 उत्साही मैत्रिणीत गणना
 गुणांनी संपन्न राष्ट्र सेविका

रहा सदा आनंदी हसरी
तुझ्या गुणांची सरिता
वाहू दे सदैव कौतुके
हेच सांगे ही कविता 

जन्मदिन असे तुझा 
करु प्रार्थना देवास
लाभो निरोगी दिर्घायु 
यश किर्तीचा सुवास





मिनल ऋतूजा वर्तक 

शुभेच्छा 

असशी तू हसत मुख 
सुस्वर दैवे लाभला
करूनी साधना देवीची
सोज्वळ व्यक्तीमत्वे शोभला

कितीदा  ऐकावी तव गीते
 तरिही मन अतृप्त राही
पुन्हा पुन्हा ऐकूनही
मनास समाधान नाही

तव स्वरातील गोडवा
ओढ लावितो जिवाला
तुझ्या साधनेचा हा प्रताप 
आनंद देतो  जन मनाला

 जन्म दिनाच्या तुजला
देते  तुजला शुभेच्छा 
पूर्ण होवोत सर्व कामना
ह्याच आमुच्या सदिच्छा 

जन्म दिन असे तुझा 
करू प्रार्थना देवास 
लाभो निरोगी दिर्घायु
यश किर्ती चां सुवास


वैशाली वर्तक 
अहमदाबाद
मंगल गजेंद्रगडकर बाई
################
शब्द सहज  निघती
किती स्वरूपे सोज्वळ  
 घडविले  भवितव्य 
विद्यार्थ्यांचे ते उज्वल

शिक्षकी वृत्ती अंगी 
परोपकारी  स्वभाव 
लेखन वकृत्व निपुण 
शांत संयमी सदा भाव    

पाककला, रांगोळी ,गायन
ह्या कलाही अवगत
तुझ्या पुढे तर मंगला
नाही कुणाची धडगत
       
सर्व क्षेत्रात  होते सहभागी 
तेज वसे शारदेचे मुखी
देव राहो कृपावंत देण्या
निरोगी दिर्घायु सुखी 


पाककला रांगोळी गायन
ह्या कलाही अवगत
तुझ्या पुढे तर मंगला
नाही कुणाची धडगत

आज शुभ दिनी करिते
देवास हीच प्रार्थना 
 मिळो ज्ञानार्जन आम्हा 
पूर्ण होवोत तव कामना

काव्यातून  पाठविते
शुभ अनेक शुभेच्छा 
पूर्ण होवोत सर्व कामना
ह्याच आमुच्या सदिच्छा .

वैशाली वर्तक






    वर्षा 
पाहताच तव छबी 
मनी आनंदाचे झरे
आहेच तू अशी सखी
हेच मात्र सदा खरे

किटी  वा असो विविधा
कामासाठी सदा तयार.   
पूर्णपणे हिंमतीने 
 दावी न कामाचा भार 

आकर्षक व्यक्तिमत्त्व 
हास्य सदा मुखावर
जणु गुलाब फुलले
ऐटदार खरोखर 

अभिनय व गायन 
कला असती खचित 
विविधेची तू असे
कलाकार परिचित 

आज जन्मदिनी तुला 
देते अनेक शुभेच्छा 
 आनंदी जीवन लाभो
ह्याच ईश्वर चरणी ईच्छा 

वैशाली वर्तक 

      अपर्णा 

दिसतेय तितकी नसेची 
तू अपर्णा  कदापी शांत
करितेय  विचार मनात 
वक्तृत्वाची तुजला न भ्रांत 

योग मुद्रांचे ज्ञान अगाध
दूर करण्या  व्याधी 
दावूनी मुद्रा सख्यांना 
सहज पळविशी उपाधी


हिरीरीने घेशी सहभाग 
अभिनय कला अवगत
देई आनंद जनमनास 
कथिले तूजआमुचे मनोगत


कर वक्तव्य सखे झडकरी 
 करु नको आता विचार 
जमल्या जन्म दिनी तुझ्या 
विविधा च्या सख्या हुशार 

देती मिळूनी शुभेच्छा 
पूर्ण होवोत तव मनोकामना 
रहा सदैव आनंदी उत्साही 
 हीच गणेशा चरणी प्रार्थना

===========================

      अंजली
पाहताच तव छबी
शांत भाव सोज्वळ 
विलसती मुखावरी
सांगती,तू आहे प्रेमळ

असशी मृदु मीत भाषी 
आळविते सुस्वरे गीत
जोपासला छंद संगीताचा
गायनावर तुझी प्रीत 

माणसे जोडण्याची कला
आहे तुला अवगत
हृदयी जागा अनुरागाची 
मैत्रीणी वाढतात नकळत

जन्म दिन असे तुझा
करिते प्रार्थना देवास
लाभो निरोगी आरोग्य 
यश किर्तीचा सुवास 

घडो सदा पुण्यकर्म 
राहो आनंद जीवनी 
लाभो सार्थकी आयुष्य 
हीच शुभेच्छा मनोमनी
\\\\\\\\\\\\\\\
छाया द्
!!!!!!!.
करुनिया नट्टापट्टा 
साडी सुंदर परिधान
 लेवुनिया आभुषणे
 मुखी  भाव समाधान .

कोण  काय  विचारता 
 अन्न पूर्णा   सखी छाया
ही तर सखी विविधेची
सर्वांवर करी माया

सणवाराची करे  तरतूद 
देता ऑर्डर जिन्नस तयार
सणवार तिच्या वाचून अडे
घेऊन मेहनत अपार 

आज तिच्या जन्म दिनी
देते अनेक शुभेच्छा 
लाभो सुख समृद्धी निरोगी 
आयु ह्याच मनी ईच्छा

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सोनाली आठवले विविधा 
...................
नाही तुजला भेटली
भाव दिसती सोज्वळ 
हास्य विलसे मुखावर
स्वभावे असशी प्रेमळ

परदेशी जाऊनिया
पवित्र काम विद्यादान 
घडवून विद्यार्थ्यांना 
मिळविला तू सन्मान 

स्वतः चालवून शाळा
 बनलीस तू आत्म निर्भर
विडा उचलला सेवेचा
कत्वृत्व दाविले खरोखर 

सदा  चेहरा हासरा  
आकर्षक व्यक्तीमत्व
साहित्यिक क्षेत्रातून
 आगळेच ते प्रभुत्व 

आनंदाच्या दिनी आज
लाभो सुखाचे चांदणे
होवो ईच्छांची  पूर्तता  
हेच देवाशी मागणे

काव्यातूनी पाठवीते
शुभ आशिष शुभेच्छा
पूर्ण  होवोत कामना
ह्याच आमुच्या सदिच्छा

आनंदाच्या दिनी आज
लाभो सुखाचे चांदणे
होवो ईच्छांची  पूर्तता  
हेच देवाशी मागणे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
१८\६|२५
निरारोप समारंभ. पुष्पा 

बहु गुण संपन्न सखी
मृदु मित मधुर वाणी 
आहे तितकीच लाघवी 
सुस्वरे  गाते गाणी 

वाचन लेखनाचा छंद 
लेखणीला आहे धार
  आहे *हुंकार* नामे पेज
 कविता करीते साकार 

अभिनय, नृत्य ,गायन
कला आहेत अवगत
विविधाचा विविधोत्सव
गाजवितेस  तू नकळत

आठवात आहे तुझे
नख शिखांत सजणे
तितकेच आदराने 
समारंभी लक्ष पुरविणे.

हळदीकुंकू समारंभाच्या
दाटून येतील आठवणी 
भाव आदराचे मुखावरचे
आनंदाचे क्षणोक्षणी 

काव्यातून पाठविते
शुभ आशिष शुभेच्छा 
पूर्ण होवोत सर्व कामना
ह्याच आमुच्या सदिच्छा .

वैशाली वर्तक
वर्षाव शुभेच्छांचा भावे जयश्री 

   सदैव असशी उत्साही 
   हसतमुखे तू तत्पर 
   मदती साठी सख्यांना
   न करीता,  कधीच कुरकर

   नाना कला अंगी असती
   भरत, शिवण ,लेखन
   कलेत  आहे च निपुण 
    अन्  , छंद आहेची वाचन.
   
   हडाची शिक्षिका असता
   विद्यार्थी घडविले विद्यादाने
   आपण एकाच बोटीचे प्रवासी 
    कविता  लेखन माध्यमाने.

    तोंडभर कौतुक करण्यात 
    कधीच न पडे तू मागे
    कसे विणते सख्यांशी 
    अतूट प्रेमाचे धागे

     शुभ दिन असे आज 
     बहरो सुखाचे चांदणे
     तव जीवनात  सदैव ,
     हेच देवास मागणे.

                 वैशाली वर्तक 
                ...अहमदाबाद
                      ३१\७\२५
माणिक 
बोटे वळली टॅबकडे
 शब्द शोधितसे लेखणी 
दिसता विविधा नेटवर
पाहून छबी देखणी

हसरा चेहरा विचारी
 गीत कुठले करू सादर
राखूनी सख्यांचा मान
करीते सर्वांचा आदर

विविध गुण संपन्न 
अभिनय, निवेदन 
वाणी आहेची मधुर 
किती करावे वर्णन

जन्म दिन असे आज
काय विशेष मागणे
सर्व दिधले देवाने
हेच तयाशी सांगणे.

लाभो सृदृढ आरोग्य 
घडो  नित्य गायन सेवा 
 विविधेत तुज मान
वाढो तव संगीताचा ठेवा          

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
नित दिनी शुभेच्छा*. स्वाती जोशी

सदा चेहरा हसरा
आकर्षक व्यक्तिमत्त्व 
बॅक संसार संभाळूनी
दाविले तू तुझे प्रभुत्व 

 भाग घेण्याची आवड
सर्व समारंभी आवर्जुन 
मैत्र्य भाव जपते सदा
सख्यात मिळून मिसळून 

जन्मदिन असे तुझा
करिते प्रार्थना देवास
लाभो निरोगी दिर्घायु
यश किर्तीचा सुवास 

घडो सदैव सत्कार्य 
 राहोआनंद जीवनी
लाभो सार्थकी आयुष्य 
होत शुभेच्छा मनोमनी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

%%%%%वैशाली करंदीकर......
#########$$$$$$$######
कोण ग उभी विविधाच्या दरबारी
सांगा तिजला कुठलीही गाणी
आहेच ती गायिका विविधेची
गाऊन मुग्ध करण्याची तिची वाणी

शांत सोज्वळ मन मिळावू
आहे अगदी कुटुंब वत्सल 
सहभागी होते  समारंभी
मनाने आहे अगदी निश्चल

भगीनी समाजाची ग्रंथपाल
शिवाय अभिनयात प्रविण 
परोपकारी आहे जिवेभावे
वकृत्व क्षेत्र पण,नसे नवीन 

 बहुगुणी वैशाली तुला 
लाभो आनंद जीवनी
घडो सदा पुण्यकर्म 
हीच शुभेच्छा मनोमनी 

जन्म दिन असे तुझा
करिते प्रार्थना देवास
लाभो निरोगी दिर्घायु 
यश किर्तीचा सुवास 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सहज उमजती भाव 
शांत सोज्वळ रूप 
पाहून छबी मोहक 
सांगताती गुण खूप 

मित भाषी असूनी
समाजकार्यी तत्पर
भद्र भगीनी समाजात
नाव भुषविले खरोखर

लेखन निवेदन अभिवाचनी
शारदेच्या तुला वरदहस्त 
तू दिपविले आहेस नाव 
वेळोवेळी खरेची मस्त 


पसरविते शब्दांतूनी
विविधे चा सुगंध 
आपुल्या महाराष्ट्रात 
हा ही तुझा आगळा छंद

किती गाऊ तव गुण
माझे शब्दची तोकडे
राहू दे असेच सदैव
लक्ष सर्व क्षेत्रांकडे

काव्यातून देते तुज
जन्म दिन शुभेच्छा 
पूर्ण होवोत मनकामना
हीच आमुची मनीच्छा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

देवयानी पेंडसे 

काय ? गान कोकिळ देवी  
कोणते गाऊ  सांगा कवन
 हसत मुखे शब्द निघताची
 तृप्त  केलेस आमुचे श्रवण

 विविध गुणांची विविधेची
तू मनमिळाऊ सखी खचित,
हेच रहस्य  तव व्यक्तीमत्वात 
भर करतेची   सदोदित

कुठल्या गुणांना वर्णु ,
किती भावपूर्ण निवेदन.
तितकाची सुंदर अभिनय
सहजची जिंकते प्रेक्षकांचे मन 

असो कुठलाही सोहळा
काम करण्यास तू तत्पर 
मस्त आनंदी निवृत्ती काळात
रममाण   रहातेस खरोखर 

अशीच वाहू दे  सदा जीवनी
तव  गुणांची  अविरत सरिता
जन्मदिनी देत ह्याच शुभेच्छा 
 येथे संपविते मम कविता 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

अनुपमा जोशीपुरा

वा-याच्या झुळूकेसम.    
आलीस आमुच्या गावी
देत  प्रेम भाव  मैत्री 
अजूनही वाटे हवी हवी

असो कुठलाही कार्यक्रम 
येते  सख्यांना आठवण
तुझी अनुपस्थिती सदा
जागे करिते जनांचे मन

जाता इचलकरंजीत 
पण दावीलीस चुणूक 
आहेस तू बहुगुणी नार 
  नाना क्षेत्रात तू  कामास उत्सुक 

   आज जन्मदिन तुझा
देते तुजला शुभेच्छा 
जेजे तुज हवे तेते लाभो
ह्याच या दिनाच्या सदिच्छा 

लाभो उदंड निरोगी आयु
मिळो यश किर्तीचा सुवास 
घडो माय भाषेची सेवा
हीच  प्रार्थना देवास 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



उभी शांत रम्य निसर्गात 
विलसले मुखी भाव सोज्वळ 
घेऊन परिश्रम मेहनत वाचनलयी
केले ग्रंथालय पूर्ववत उज्वल.


देते पाले-भाज्या आवर्जूनी
ज्या मिळत नाहीत सहज
उदार मने करिते वाटप
आठवणीची नसे गरज

लाभो सौख्याचा बहर
मिळो सदा यश किर्ती 
मायभाषा जतन करण्यात 
नामांकित तुझीही मुर्ती 

आनंदाच्या दिनी आज
लाभो सुखाचे चांदणे
होवो ईच्छांची पूर्तता 
हेच देवास मागणे.

काव्यातून पाठविते 
अनेक शुभ  शुभेच्छा 
पूर्ण होवोत सर्व कामना
हयाच सख्यांच्या सदिच्छा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


गुरुवार, ८ मे, २०२५

समस्या पूर्ती



असे  डोके  गोल  जरी टाचणीस 
नसे त्याच्या वर एक ही  केस 

दोन असती   कान  जरी कढईला
ये ना  ऐकावयास  काही  तिला

तीन असती जरी नारळास   डोळे
दिसे ना त्याला कुठे काय चाले

चार असती पाय जरी खुर्चीला
ये ना चालता कुठे ही तिला 

पाच ............

पाच बोटे असून पंजास
प्रत्येकास नाव हमखास

सहा  पायाचे किटक अपार 
चावता रोग राई पसरे फार

सात  सप्तर्षीं असती
 ब्रह्म देवाची पुत्र मानती

आठ पुत्र सौभाग्यवती 
आता आशीष निषेध मानती

नऊ दिवस नव्याचे  खरे
अनुभवाचे बोल खरे ठरे

दहा मुखी बलाढ्य दशानन 
अहंकार असे विनाश कारण

सोमवार, ५ मे, २०२५

गीत. आई तुझ्या कुशीत. महा पंचरत्न काव्य स्प

 काव्य स्पंदन राज्यस्तरीय शब्दसेतू साहित्य मंच पुणे, समाजोन्नती प्रतिष्ठान सूर्य गंध प्रकाशन 

आयोजित 

महा  पंचरत्न काव्य स्पर्धा

 महास्पर्धा फेरी क्रमांक ५

दि ४\५\२५

विषय ....आई

काव्य प्रकार भावगीत 

शीर्षक..आई तुझ्या कुशीत

 १६ वर्ण    यती ८ अक्षरानंतर                  


पाय टाकताच घरी ,तुला भेटण्याची घाई 

मुख दिसता आईचे, मन आनंदूनी जाई.       धृपद 


सारे मिळता जगती, मन हर्षते खुशीत.  

सुख स्वर्गाचे लाभते ,फक्त आईच्या कुशीत 

काय हवे नको पाही. सदा काळ हीच आई.   

मुख दिसता आईचे, मन आनंदूनी जाई.           १



हवे ते  ते मिळण्याची, कुटुंब जनांना ग्वाही.    

करी दुर्लक्षित स्व ला , विचार दुजांचा राही.   

परि पूर्णता करण्या ,  मन  गुंततच जाई

मुख दिसता आईचे, मन आनंदूनी जाई.              २



असता ती मजपाशी   तीर्थे तिच्या चरणाशी

खरच मी भाग्यवान,  नको वाटे  जाणे काशी  

शब्द सुमने गुंफून,   तव गुणगान गाई

मुख दिसता आईचे, मन आनंदून जाई.                   ३

वैशाली वर्तक 

अहमदाबाद

शनिवार, ३ मे, २०२५

काव्य पूर्तता

असे  डोके  गोल  जरी टाचणीस 
नसे त्याच्या वर एक ही  केस 

दोन असती   कान  जरी कढईला
ये ना  ऐकावयास  काही  तिला

तीन असती जरी नारळास   डोळे
दिसे ना त्याला कुठे काय चाले

चार असती पाय जरी खुर्चीला
ये ना चालता कुठे ही तिला 

पाच ............

पाच बोटे असून पंजास
प्रत्येकास नाव हमखास

सहा  पायाचे किटक अपार 
चावता रोग राई पसरे फार

सात  सप्तर्षीं असती
 ब्रह्म देवाची पुत्र मानती

आठ पुत्र सौभाग्यवती 
आता आशीष निषेध मानती

नऊ दिवस नव्याचे  खरे
अनुभवाचे बोल खरे ठरे

दहा मुखी बलाढ्य दशानन 
अहंकार असे विनाश कारण

मंद झाल्या तारका


शब्द रजनी साहित्य समूह 
आयोजित दुहेरी काव्य लेखन 

 विषय .. मंद झाल्या तारका 
    शीर्षक...सरली रे निशा

आली बघ  सांज वेळ समीप
वाट पाहते मी लावूनी दीप

करून  शृंगार तव आवडीचा 
कामात व्यस्त  संदेश  नेहमीचा

यामिनीचा शशी येतो नियमित 
मज वाट पहाणे असे खचित

कुंतली माळलेला गंधित गजरा
किती जणांच्या त्यावरी नजरा

मंद शीतल वा-याची झुळुक 
क्षणात  मनाला करी उत्सुक 

वाट पाहून मनी येते दडपण
रात्रभर तुझीच रे आठवण

मंद झाल्या तारका ,सरली निशा
प्राची उजळेल आता दाही दिशा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

चित्रकाव्य सिंगापूर शब्दगंध



सिंगापूर शब्दगंध चां दिलेले चित्रावर काव्य रचना 


अरे मानवा काय ही 
करून घेतली   तुझी दशा
 स्वच्छंदे फिरतोय आम्ही 
आणि तू बंदिस्त पिंज-यात.

खरच मानवा असा कसा रे तू 
 असूनही हुशार प्राणी मात्रात 
पण, काय केलीस ही दैना
स्वतःच झालाय बंदिस्त, आभासी जगात 

कुठं तर चुकतंय आपलं 
हे तुला कधी उमजणार 
कळतंय पण वळत नाही 
 याचे उत्तर तूज कधी गवसणार?

दिवस नाही ...रात्र नाही 
सदोदित बसला अडकून 
उठ जरा बघ  निसर्ग 
फोन  दे तो भिरकावून 

वृक्षाच्या फांदीवर बसून 
मी देतोय तुजला हाक
निसर्ग बघ खुणावतोय तुला
हातातील मोबाईल दूर टाक.

आम्हाला ठेवता बंदिस्त 
नाही  आम्हा आवडत
गगनी उडते सवंगडी पाहून 
आम्ही बसतो हळहळत

तुम्ही मानव बुद्धीजीवी
 केलाय ना देवे  मेंदू बहाल ?
  म्हणूनच झालाय तू प्रगत
 दाखव   विश्वाला कमाल.


शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

शिकावं

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

आयोजित उपक्रम.काव्य लेखन 

विषय. शिकावं 


 शिकावं शिकावं खरच

 कथन उचित सहज

स्वतः ला घडविण्यास 

शिकण आहे गरज


जीवन संपेल तरीही 

शिकण चालूच राही

शिक्षण शब्दास कधी 

समाप्त शब्द येत नाही 


दिलाय मेंदू देवाने

करा सारासार विचार 

पहा निसर्ग पण देतो

शिकवण सहज अपार 


 पहा अथांग समुद्र 

 लाटा उसळत किनारी 

  उचंबळूनी येता देती

 मनास  सदा उभारी 


 ऐकून नियमित संतवाणी

मिळे मनाला शिकवण 

चांगल्या विचारांची 

होते मनी साठवण


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...