रविवार, २१ एप्रिल, २०१९

गोष्ट साध्या गाऊनची

   

        गोष्ट साध्या गाउनची
  
     झाले मी  आता 65 ची .   आज पर्यत घरात वा बाहेर कुठेच , साडी शिवाय 
वावरले नाही.  पण आता मात्र  वाटते ...कधी कधी घरात  गाऊन  घालावा.  खर काय  हरकत  आहे ना?  साडी पेक्षा सुटसुटीत राहिल.   असेही ऊन्हाळ्यात फारच उकडत .आणि   आपल्याकडे  गुजराथ  मधे तर  गर्मी  सदाच   "मी"  म्हणत असते.  थंडी चे दोन महिने सोडता ,सदा सर्व काळ एकच ऋतु आणि तो म्हणजे ऊन्हाळा.  आss णि   रात्रीचे  च   घरात घालायला काय हरकत आहे.  ? ...आता ..  आहे  मी तशी थो sडी   जाडी   वा  जाड्यापैकी.....पण त्यात काय  माझ्या  सारख्या लठ्ठ बायका नाही का घालत  गाऊन ?  आणि मला कुठे बाहेर जायचय .? घरातच  तर  घालाचाय.!  
     शेवटी , मी विचार मनी  पक्का केला. म्हटले दर मंगळवारी दारावर च गाऊन आणि  इतर होजीयर मटेरियल घेऊन येतोच तो विक्रेता . अगदी मंगळवार ठरलेला 
असतो त्याचा. 
     जसा मंगळवार उजाडला मी त्याच्या  येण्याची वाट पहातच होते.   तेवढ्यात  विक्रेत्याची
    " नाना  मोटा बाळको माटे  कपडा ,  तेमज काॕटनना गाऊन   " अशी आरोळी ऐकली व  मी  बाहेर ओट्यावर येऊन बसले. म्हटले दाराशी आला की थांबवूया त्याला.  
         तो दाराशी आला .मी त्याला माझ्या  मापाचा गाऊन मागितला. त्याने लगेच  5/6  वेगवेगळ्या रंगात  गाऊन माझ्या  हातात दिले.    बर , दारातच असल्याने त्याने तुम्ही  "द्या  व घालून पहा ."  माप व्यवस्थित  होतोय  ना पाहून घ्या. . मी लगेच रंग  पसंत करुन दोन गाऊन घरात घेऊन गेले व घालून पाहिले.... ठीक वाटले .मग मनाची तयारी करुन एक नक्की  केला. व दुसरा परत दिला. 
    सहजच  समोर  ओट्यावर  भाजी निवडत बसलेल्या  सुनेला पण  विचारले,
"ठीक  वाटतोय ना ग गाऊन ?"
  तर  ती  म्हणाली . , "हो हो"
तिला म्हटले , "अग पैसे दे ना. "
तर  ती चक्क  नाही उत्तरली. असा राग आला मला.
मी विचारले , " का ग?"
तर म्हणे आमच्या जवळ कुठे पैसे आहेत ?
सासरे तुम्हाला  पैसे देतात दर महिन्यात .आम्हाला कोण देत ? "
"नवरा (तुमचा मुलगा) आम्हाला  दुध भाजी इतरचे  पैसे देतो , ते सगळे रोजच्या खर्चात  संपतात. "
   मी उठले... तडक फोन लावला  मुलाला.    मुलगा  व  मीस्टर दोघेही , जवळच आमचे सोन्याचे दुकान आहे . तेथे दुकानात  सकाळी जातात .मुलगा दुपारी जेवण झाल्यावर मार्केट मधे जाऊन पाॕलीश वा रिपेरिंग ला दिलेले दागिने  द्यायला - घ्यायला जातो.  , बsssर झाल  तो  तेव्हा दुकानातच होता. 
       फोनवर  मुलाला  झालेला प्रकार सांगून सूनेची तक्रार  केली. 
मुलगा तावातावाने आला. गाऊन वाला नेहमीचा च   व नेहमी येऊन -येऊन ओळखीचा झालेला. पुढच्या बोळाशी गि-हाईकांच्या घेराव्यात उभा होता . मुलाने आधी  त्याचे गाऊनचे  पैसे देऊन त्यास  मोकळे केले  . आणि .नसते जरी दिले तरी त्याने उधारी ठेवली असती . ....कारण नेहमीचाच असल्याने.
मग घरात येऊन आई शी व आधी बायकोशी बोलला. 
"काय ग तुला पैसे द्यायला काय झाले होते.   ती-न-शे  रु नव्हते  तुझ्या जवळ.?
बायको  म्हणाली , "तुमचे वडील तुमच्या आईला पैसे देतात.  तर , द्यावे ना त्यांनी त्यातूनच. .करावा स्वतःचा खर्च .
  मुलगा बायकोला म्हणाला ," असे  काय करता तुम्ही दोघीजणी  ?
तर बायको रागाने  बोलली  तुम्ही आम्हाला देतात  का वापरावयास पैसे ? 
आम्ही ठरलो गृहीणी. कमवत नाही .नोकरी  तर   करु च दिली नाही. तुम्ही जे पैसे देतात ते रोजच्या दुध भाजीपाला   किरकोळ खर्चात वापरतो. तेव्हा अशा खर्चा साठी  तुम्हीच पैसे दिले पाहिजेत ना.?
    अग, पण तुझ्या  जवळचे   पैसे आता दिले असते तर काय बिघडले असते..?
त्यावर   लगेच सासू  बोलली. हो  ना  आजकाल दोघी सुना कपडे रिपेअरींग
ची  कामे  घरात मशीन वर करतात .तर चार पैसे मिळवितात  तर त्यातून हीने द्यावेत ना ..
  पण    ना ssssही. चक्क  नाही आहेत म्हणतेय .
     मुलाने पण आईच्या वाक्यास दुजारा दिला. व  बायकोला म्हणाला , "अग आता दिले असते तर काय बिघडले असते. .प ss ण  छे.! जरा ही समजून घेण्यास तयार 
नाहीस तू. 
      आणि सासू म्हणाली   
तुम्ही म्हणता पण ,  आमच्या वेळी  कोण  देत होते हातात पैसे .? काय हवे तेवढे सांगायचो.  वस्तू  पुरूष मंडळी  घरात आणून टाकायचे. 
  तसेच मी केले तुमच्या शी फार काही वेगळे नाही केले .
         तर सुन म्हणाली , तुम्हाला तुमच्या सोयी नुसार साडीतून गाऊन मधे बदल  करावासा वाटला. व   मी  तर म्हणेन ,... तो योग्य  पण आहे. .पण  .....तसाच काळानुसार  विचारांचा  पण बदल करा की .   
      हं....  
  .खर काय  झाल .दोघींचा अहं जागा झाला. आज पर्यंत सासूने सुनांना पैसे वापरण्यास दिले नाहीत . नव-याकडून मात्र मागून घेऊन स्वतः साठी खर्चत राहिली . आता सुना दोन पैसे कमवू लागल्या तर त्यांनी वाचविलेले व कमविलेले पैसे सहाजिकच आहे ना, ... त्या स्वतः साठीच ठेवणार. 
    प्रत्येक बाईने सुनांना पण मुली प्रमाणे वागविले पाहिजे. त्या आपल्या घरच्या  लक्ष्मी आहेत .त्यांना घरात नुसते कामासाठी  नव्हे ,  तर घरची आदरणीय व्यक्ती  नात्याने मान दिला पाहिजे. तर ती घरातल्या माणसांना आपले मानते व   घराला घरपण देते. 
   पहिल्या पासून अशी वागणूक  न दिल्याने  त्या सूनांनी  त्यांच्या  सासू मधे " आई" कधीच पाहिली  नाही .त्यांना सासूत  आई कधीच दिसली नाही. असे sssही   सासू आई सारखी होउ शकते, ..,, 
पण आईची जागा घेउच शकत नाही.  आणि अशी वागणूक  दिल्यास.,. .. तर कधीच  शक्य नाही.
      तेव्हा साध्या गाऊन  विकत  घेण्यावरुन  उद्भवलेला हा  प्रसंग.  पण सासूला शिकवण रुप आहे. सासूने  समजून  उमजून आता  तरी स्वभावात बदल करणे  वा 
बदलत्या काळा प्रमाणे   वागली    स्वतःला बदलले   तर  सुना, ...एक गाऊन  काय त्या  सासूसाठी तिच्या  सुना ,जशा आपल्या आईची गरज भागवितात तशा सासूच्या गरजा  पण  स्व खुशीने  भागवतील.
     प ss ण   हे  सारे शेजारच्या  सासूस कसे  व कोण सांगणार .....?
 पण  होईल ... होईल  सासूला  पण  भूतकाळात केलेल्या चूकांची उपरती , असेच   छोटे मोठे  प्रसंग  तिला आपोआप  स्वतः  मधे  बदल करायला लावतील. अनुभवाने ती   पण सावरेल शिकेल. ....

        
 ........  वैशाली वर्तक








.

 


मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

राधा कृष्ण प्रेम

    राधा कृष्ण प्रेम                  3/4/2019
सुधाकरी   ( अभंग )
जळी स्थळी दिसे l तीज एकमात्र l
कृष्ण च सर्वत्र l राधेश्याम ll 1
ध्यानी मनी तोचि l देवकी नंदन l
करिता मंथन l हरीनाम ll 2
अविरत करी l हरिचे चिंतन l
बोलती कंकण l कृष्ण कृष्ण ll 3
सोड ना आक्रुरा l कोसती गोपिका l
विनवी राधिका l क्षणोक्षणी ll 4
नको जाऊ कृष्णा l कैसे कंठु दिन l
जीव होतो क्षीण l तुजवीण ll 5
मुरलीचे वेड l लावीतो मुरारी l
भाळीते बावरी l राधाभोळी ll 6
नाद मुरलीचा l हरपतो भान l
राधिकेचे ध्यान. सदाकाळ ll 7
राधा रमणचे l प्रेमच आगळे l
जगी या वेगळे l सर्वाहून ll 8
मूर्ती मंत प्रेम l भक्तीचे प्रतिक l
प्रेम हे सात्विक l राधेकृष्ण ll 9
रमण राधेचा l आत्मा एकरुप l
प्रगटला दीप l अव्दैताचा ll 10
   
            वैशाली वर्तक

शनिवार, ३० मार्च, २०१९

शेल रचना

शेल
सहजच आला विचार मनीं
मनीं येताच घेतली लेखणी
केली की सुंदर शेल रचना
रचना वाटली मम देखाणी

शेल प्रकार हा मनीं भावला
भावला लेखणीतूनी झरला.
केवळ शब्दांचा करिता खेळ
खेळ खेळता काव्यात रमला.

रचिल्या विविध शेल कविता
कविता शेलची लागता गोडी
मांडणी केली असता शब्दांची
शब्दांची गर्दी मनीं झाली थोडी

पाहता पाहात रचली शेल
शेल कवितेचा जमला मेळ
जीवास लागले एकच वेड
वेड मन म्हणे शब्दांचा खेळ

असती विविध त-हा काव्यात
काव्यात नसे बंधन वर्णांचे
अंत्य शब्द ओळीचा असे तोचि
तोचि असावा आद्य दुस-याचे

.....,,,,       वैशाली वर्तक

मंगळवार, ५ मार्च, २०१९

प्रेम विरह काव्य

उपक्रम
 ओळ-विरहाचे दाट धुके
       **असह्य विरह**

पहा झाल्या धुंद दिशा
पानोपानी प्रीत झुरे
हृदयात शोधुनिया
 सदा मम ऊर भरे

सांगु शके ना कुणाला
गुज माझे हे मनीचे
कसा साहु विरह हा
भाव जाण अंतरीचे

रात वाटे सदा वैरीण
मनी आठवे ती भेट
कशी विसरु मी रात
स्मरणात असे थेट


तव संगे पाहिलीत
 घेउनी हात हातात
रंगविली होती स्वप्ने
सांगितली एकांतात


आठवात त्या भिजले
झाली अंधुकशी वाट
अश्रूं नयनी वाहता
धुके विरहाचे दाट

वैशाली वर्तक

प्रेम- विरह -काव्य -
कविता स्पर्धा स्पर्धा क्रमांक 31  ( शब्द अंतरीचे ग्रूप)
स्पर्धेसाठी कविता प्रेम विरह काव्य ( ९वर्णीय)

कशी मी साहू हा विरह
कैसे कंठू दिन एकेक
जरी असता राजसुख
उदास हा दिन प्रत्येक

नयनी दिसे तव मूर्ती
पहावे, तर कळे भास
वाटे तू आलास समीप
ध्यानी मनी तुझाच ध्यास

अनिल, शशी करवी - ही
कितीदा धाडिला सांगावा
धरिलास का रे अबोला
कर ना , तू दूर रुसवा

वैरीण भासे मज रात्र
जग हे निद्रेच्या खुशीत
रहाते मी तळमळत
तव आठवांच्या कुशीत

राहूनी सेवेत रामाच्या
कृतार्थ पणाने जगला
माझ्या मनीचा मुक भाव
कधी न तुला उमगला

असुनी मी राज मंदिरी
सोशिली दशोत्तरी चार
अंधारातील ज्योती सम
विरह सोशिला अपार. .

..... वैशाली वर्तक





शुक्रवार, १ मार्च, २०१९

मायबोली / मराठी भाषा अष्टाक्षरी/ पंचाक्षरी/मराठी देश माझा/लेख लोप पावत चालली मातृभाषा

माय बोली मराठी  ( बारा वर्ण)

मराठी असे, आमुची मायबोली
 पाईक तिचेच, राहू सदा काळी
 असे ती गोड , अमृताहून - ही
 विसरु नयेत, ऋण कदा काळी.

 कसे ?किती? वर्णू , तिचे गुण गान
 सर्व भाषेत तिची , वेगळी शान
 संपन्न ,समृध्द अन् अलंकारिक
 तिच्या गौरवाने, उंचाविते मान.

 भुपाळी गाऊनी, उठवे सकाळी
 भक्तीरसाची गाई ,उदंड गाणी
वीररसात स्फूरली , पोवाड्यांनी
अभंग -ओवी , जणू गंगेचे पाणी.

नवरस संपन्न ही मायबोली
 वृत्त , छंद ,समासाने नटणारी
 ज्ञानदेव तुकाची अमृत वाणी
 संस्कार ,कला, संस्कृती जपणारी

 सोनियाचा दिन आज उगवला
 करू साजरा गौरवाने जियेचा
 लिहूनी ,बोलूनी , वाचवू भाषेला
 ठेवू मान सर्व ,जगती तियेचा. .

.....वैशाली वर्तक








[2/27, 16:31] Vaishali Vartak: रोही पंचाक्षरी

विषय-माय मराठी

रसाळ वाणी
भक्तीची गाणी
माय मराठी
दाखवी पाणी

मराठी भाषा
अमुची आशा
शिखरी ठेवू
ही आभिलाषा

असे जगती
तिची महती
बोला मराठी
जन वदती

भाषा अनेक
मराठी एक
माय मराठी
सदाची नेक

भाषेला मान
समृद्ध छान
मायबोलीची
वेगळी शान

शब्द सागर
भक्ति आगर
मायभाषेचा
करु जागर

भाषा मधाळ
किती रसाळ
अलंकारिक
बोली मवाळ

जपे संस्कृती
करते कृती
माय मराठी
नाना प्रकृती

भाग्ये बोलतो
धन्य मानतो
माझी मराठी
सदा ऐकतो

वैशाली वर्तक

             माय बोली मराठी
                  भाषा समृद्ध  मराठी 

                अष्टाक्षरी
            मायबोली  ही मराठी 
           करु  तिची नित्य सेवा 
           गोड पहा किती बोली
            जपियला संस्कृती ठेवा

         आहे संपन्न समृद्ध 
          तिची वेगळीच शान
           वाटे  तियेचा गौरव
            किती करु गुण गान

           ऐका भुपाळी सकाळी
            गाते भक्तीरस  गाणी
             स्फुरे शौर्याचे पोवाडे
             अभंगात  गंगापाणी

              नवरसे भरलेली
             वृत्त छंदे नटणारी
            ज्ञानदेव तुक्यातून
             संस्कृतीला जपणारी

         लिहा बोला तिज  वाचा
        सोनियाचा दिन आज
          जगी ठेवू तिचा मान  
           व्हावा साजरा  तो रोज
   










वैशाली वर्तक 
           मराठी भाषा   व संवर्धन  विकास
                         मराठी सौंदर्य 
       बोली मराठी  ही माझी 
        माझ्या मुखात वसते
       सदाकाळ ओठावरी 
       जणु साखर  पेरते
            मायबोली मराठीची
             किती  सांगु  मी  महती
              सर्व  भाषेमधे तिची
               आहे जगतात ख्याती
       द- या खो-यातूनी दिसे 
       शौर्य गीत  गाजवीत
        बाणा मराठीचा पहा
        साहित्यात मिरवीत
                 वीर रस पोवाड्यात
                  ओवी आभंगाची  गाणी
                   भक्तीरस परीपूर्ण
                   जणू गंगेचेच  पाणी
            करु साजरा प्रेमाने
             दिन सोनियाचा आज
             करु लिखाण जोमात
            साहित्यास देवू साज

 मराठी  भाषा सहा अलंकार 
************************-***

अतिशयोक्ती
किती भाषेचा पगडा राज्यात
सहजतेने येते बोली जनात
पशु पक्षी वन्य प्राणी पण
बोलती मराठी बोली वनात

अनुप्रास 
*********
मायबोली मराठी माझी माय
 माझ्या मनात तिचाच  मान
मानीते मी  तिचे  सदा ऋण 
  माझ्या मायबोलीचा  मला  आभिमान
श्लेषालंकार
************
वाचूनी  लिहूनी  बोलूनी करा जतन
नका उधळू  नुसती  शाब्दिक सुमने
नको नुसते  मुखाने भाषेचे  गुणगान
 करा मराठीची सेवा  सु - मनाने
उत्प्रेक्षा
*********
शौर्य रसाचे  ते पोवाडे
ओवी  आभंगाची  गोड गाणी
शुध्द  निर्मळ  पवित्र  भक्तिची ती
जणू वाहे  गंगेचेच पाणी
रूपक
******
नका शोधु कोणती बोली मधूर
जी असे  भाषा  मराठी वाणी
आमृत पाझरे सदा तिच्यातूनी
झुळूझुळू  वाहणारे  गंगेचेच पाणी

उपमा
******

  राष्ट्र भाषेचा मनी आहेच मान
तरी माय मराठी सदाची गोड
न थके जिंव्हा करीता  कौतुक 
जशी हापुस आंब्याची  फोड











         
मराठी वाचवा


मराठी असे, आमुची मायबोली
 पाईक तिचेच, राहू सदा काळी
 असे ती गोड , अमृताहून - ही
 विसरु नयेत, ऋण कदा काळी.

 कसे ?किती? वर्णू , तिचे गुण गान
 सर्व भाषेत तिची , वेगळी शान
 संपन्न ,समृध्द अन् अलंकारिक
 तिच्या गौरवाने, उंचाविते मान


  एकच दिन करूनी साजरा
 करू नका गौरव मराठीचा
  नित्य लिहूनी ,बोलूनी , वाचवा
 ठेवा मान सर्व ,जगी मायबोलीचा.


   भाषा मराठी  घरी दारी बोला 
   मायभाषेची सेवा होईल थोडी
नाटक सिनेमे पहावी  आवर्जून 
   साहित्याची  वाढवा गोडी


   तिचे ऋण फेडणे कर्तव्य जाणा
   मनी ठेवा मायबोलीचा अभिमान
  जिच्या वाणीने झालो महान
 माय भाषेला द्यावा  योग्य तोची मान


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शेतकरी साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्रमांक १११
विषय.. देशमराठी माझा

देश मराठी माझा 
आहे मला अभिमान
बोलतात मराठी भाषा
मराठीची वेगळीच शान

गौरवू मराठी भाषेला
करू तिचे संवर्धन, जतन
बोलून , वाचून लिहून अन 
हेच आहे कर्तव्य पालन

भाषेने दिली आपणास
स्वतः ची ओळख प्रतिष्ठा
देणे लागतो तिचे सदैव
जतन करण्यात बाळगा निष्ठा

नको एकच दिनीचे स्मरण
सदा मनी ठेवूया तिचा मान
आवर्जून बोलू मराठीतच
तरच वाचेल जगी तिची शान


वैशाली वर्तक
 अहमदाबाद

लेख
लोप पावत चालली मातृभाषा


आहे खरी भिती प्रत्येकाच्या मनात. पण भिती बाळगून काय होणार?. ज्या भाषेत आपण वाढलो- मोठे झालो. जिने आपणास ज्ञानी केले .ती आई समान मातृभाषा 
तिला जपणं  -संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे. आपल्या आईचा आपल्याला विसर पडतो का? नाही ना? तसेच ज्या भाषेने आपणास आपली ओळख दिली. मोठे केले तिच्या बद्दल अशी उदासिनता का?. 
      आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून तिला शिका. राष्ट़ भाषेचा अभिमान ठेवा. पण या सर्व 
भाषा शिकलात तेंव्हा पाया आपल्या मराठी मातृभाषेचाच होता हे कसे विसरून चालेल. याचा विचार करा. 
       मराठी भाषेचे गुणगान करण्यास शब्द तोकडे पडतील. आहेच ती अमृताहून 
गोड.  साहित्यात्याने वाङमयाने ती उच्च पराकोटीची आहेच. 
      काय १५० वर्षे ब्रिटिशांनी राज्य केले तर आपण ते गेले तरी मातेला आईला
गोड प्रेमळ शब्द आई सोडून मम्मी म्हणून हाक मारत आहेत. अगदी ओ का ठो
इंग्रजी येत नाही ., पण *आई व बाबा* सोडून *मम्मी डॅडी* बोलवित  आहोत. अगदी
झोपड पट्टीत पण. अलिशान घराची तर गोष्टच सोडा. त्यांना तर मराठी सोडून
इतर भाषेत बोलणे भूषण वाटतंय. पाच मिनीटे ...अहो पण मिनिटं फार झाली!
१० वाक्यं  फक्त केवळ मराठी भाषेत बोला म्हटले तर शक्य होत नाही. 
 अशी परिस्थिती मातृभाषेची आहे. व नाही येत याची मनी खंत पण वाटत नाही.
उलट फूशारकी मानतात. त्यात मोठेपणा समजतात. 
    अशी स्थिती सर्व मातृभाषेची आहे. पण तिला वाढविण्यासाठी तिचे जतन करणे
प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे तिचे ऋण फेडण्यासाठी सातत्याने प्रयत्न
केला पाहिजे. मातृभाषा लोप पावत आहे ह्याचा विचार केला पाहिजे व योग्य ती पावले
उचलली पाहिजेत. वरीष्ठांनी आवर्जून नातवंडांकडून त्यांच्याशी मातृभाषेतून बोलून,
वाचून दाखवून, नाटक गाणी अभंगातून भाषा कशी वाचलं यांची काळजी घेतली पाहिजे. तरुण पिढीने पण त्यांना हातभार लावला पाहिजे. त्यांचे बालपण आठवून
मातृभाषेची मनी जाण. जिच्या ओघात वाढलो यांचे स्मरण केले पाहिजे. तर 
मातृभाषा टिकेल.
मातृभाषा मराठी अजरामर राहो. जो पर्यंत सूर्य तारे आहेत तोवर मातृभाषा राहो

वैशाली वर्तक
अहमदाबाद



अष्टाक्षरी
            मायबोली  ही मराठी 
           करु  तिची नित्य सेवा 
           गोड पहा किती बोली
            जपियला संस्कृती ठेवा

         आहे संपन्न समृद्ध 
          तिची वेगळीच शान
           वाटे  तियेचा गौरव
            किती करु गुण गान

           ऐका भुपाळी सकाळी
            गाते भक्तीरस  गाणी
             स्फुरे शौर्याचे पोवाडे
             अभंगात  गंगापाणी

              नवरसे भरलेली
             वृत्त छंदे नटणारी
            ज्ञानदेव तुक्यातून
             संस्कृतीला जपणारी

         लिहा बोला तिज  वाचा
        सोनियाचा दिन आज
          जगी ठेवू तिचा मान  
           व्हावा साजरा  तो रोज

...............................................................................................................................,..................
मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित
*स्पर्धेसाठी*
*काव्य बत्तीशी*
विषय.   माझी माय मराठी
      मायबोली मराठी 
.
    मायबोली   मराठी .       
    करु  तियेची नित्य सेवा . 
    गोडी आहे वाणीत 
   जपते संस्कृतीचा ठेवा. 


     संपन्न  समृद्धीत
     तियेची वेगळीच शान
     वाटे  तिचा गौरव
     किती वर्णावे गुणगान 


      सकाळीची भुपाळी 
      तशीच भक्तीरस  गाणी.  
     शौर्य -रस पोवाडे 
     अभंग जणु गंगापाणी

      नवरसे भरलेली
      वृत्त छंदात नटणारी
      ज्ञानदेव तुकाचे
      साहित्य सदा जपणारी


      लिहू बोलू वाचुया
      सोनियाचा दिन आज
      जगी ठेवू तिचा मान  
      चढवून आगळा ताज
  
      वैशाली वर्तक
       अहमदाबाद


@लळा माय मराठीचा "@

लोकनायक प्रकाशन , सोलापूर व साप्ताहिक साहित्य भरारी यांच्या संयुक्त विद्यमाने 
आयोजित 
प्रथम काव्य स्पर्धा 2026
स्पर्धा क्रमांक 1
काव्यप्रकार अष्टाक्षरी
स्पर्धा विषय ...लळा माय मराठीचा 
 स्पर्धा दिनांक. 27/2/26
      शीर्षक..भाषा समृद्ध  मराठी 
         
      मायबोली  ही मराठी 
      करु  तिची नित्य सेवा 
      *लळा माय मराठीचा*
      जपिला संस्कृती ठेवा

    आहे संपन्न समृद्ध 
   तिची वेगळीच शान
   अभिजात तिज मान
   किती करु गुण गान

   ऐका भुपाळी सकाळी
   गाते भक्तीरस  गाणी
   स्फुरे शौर्याचे पोवाडे
  अभंगात  गंगापाणी

 नवरसे भरलेली
 वृत्त ,छंदे, नटणारी
 ज्ञानदेव तुक्यातून
 संस्कृतीला जपणारी

लिहा ,बोला, तिज  वाचा
लळा माय मराठीचा
जगी ठेवू तिचा मान  
दिन आहे सोनियाचा.

वैशाली अविनाश वर्तक 
अहमदाबाद (गुजरात)
8141427430


रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

धागा धागा अखंड विणूया

धागा धागा अखंड विणूया              24/2/2019

तळे जमते, थेंब थेंब पाण्याने
वस्त्रासाठी जोडावे , धागे धाग्याने

विणण्यास वस्त्र , येती धागे कामी
जरा न करता , जोडण्यात खामी

विणकर दावी , त्याची कुशलता
धागा -धाग्याने, विणता सहजता

तंतू तंतूने , विणतो कोळी जाळी
अती प्रयत्ने , तया मिळते टाळी

अवनीचे हे , अक्षांश रेखांशाचे
वाटे रेखांकन , विणले रेषांचे

काही मऊ ,रेशमी धागे प्रेमाचे
मजबूत न् , शिस्तीचे मातृत्वाचे

वस्त्र विणले ,कबीराचे रामाने
भक्तासाठी देव ही ,धावे प्रेमाने

धागे विणावे , प्रेमाचे जीवनात
जेणे मानव , जुडसी जगतात

धागा धागा प्रेमाचा विणू अखंड
सा-या विश्वात शांती नांदो उदंड

वैशाली वर्तक.

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

राहून गेले

आयुष्य म्हणजे जीवनाचा प्रवास . जसे आपण मोठे होत जातो तसे मेंदू च्या विकासाने आपले मन इथे तिथे धावू लागते. ब-याच कल्पना आपण करीत असतो. मनांत स्वन्प रंगवित असतो. अगदी बालपणा पासून आपल्या काही ईच्छा आकांक्षा मनात तयार होत असतात . आपण त्या बालपणीच्या गोष्टी, आई वडील वा मोठ्यांकडून पूर्ण करुन घेत असतो. तेव्हा एखादी इच्छा होणे ती पूर्णत्वाला आणणे अशी क्रिया चालूच असते. जसे बालपणी पोलीस पाहून ,त्याचा दरारा , त्या वेळच्या वयास आकर्षक वाटून , मी पण शूर शिपाई होईन .वा आईने, आजीने शूर लढवैय्यांच्या सांगितलेल्या गोष्टी तून त्या वेळी बाल मनात तशा ईच्छा तयार होतात. . रेलगाडीच्या आकर्षणाने रेल्वे गाडी चालविन वगैरे वगैरे .या सा-या बाल मनातील बाल कल्पना . पण मोठे झाल्यावर क्रिकेट मॕच पाहून आपण पण sports मधे निपूणता मिळवावी. एखादा गेम शिकावा व नाव कमवावे. वा एखादी कला शिकून त्यात नाव मिळवावे . संगीत - गाणे शिकून , अगदी लता, आशा ,ऊषा नाही पण चार लोकांत , "वा छान गाते हं ,"असे उद्गार निघतील इतपत गाणे शिकावे . तर गाणे शिकणे अशी गोष्ट इच्छा मनात येते. आपल्या वेळी सध्या सारखे मुलांना विविध classes ला घालण्याचे वेड नव्हते , पण लहान /मोठे class मधे आई वडील पाठवायचे. तर प्रत्येकाच्या मनात कांही ना काही गोष्ट असतेच .तसे च मोठे झाले की एखादा छोटा व्यवसाय करावा तसेच विदेश प्रवास करावा. अरे हो! ..आता तर प्रवास ही गोष्ट पण सहज शक्य होत आहे .त्यामुळे , एखादी गोष्ट राहून .........गेली असे कमीच दिसते. कारण सध्या वरिष्ठ नागरिक सधन म्हणा वा आर्थिक दृष्टीने स्वतंत्र आहे वा परावलंबी नाहीत. मला पण बहुतांशी गोष्टी मिळाल्या तशी मी समाधानी वृत्तीचीच आहे हं. हो ! खरच सांंगते .आजीची बालपणाची शिकवणच तशी. तर ,त्यामुळे म्हणा वा इच्छाच कमी आहेत म्हणा. आणि आता वाढत्या वयाला आकांक्षा पण कमी होतात. तरी आजकालच्या युगाकडे पहाता "वेहीकल चालविणे" राहून गेले. असे म्हणायला हरकत नाही, त्याच काय आहे .पहिली गोष्ट ,अगदी बालमंदीरा पासून ते शाळे पर्यत सर्वच ठिकाणे घराच्या दोन मीनीट अंतरावर .त्यामुळे सायकलची पण गरज भासायची नाही. कारण सायकल पहिले वाहन शिकण्याचे. पुढे काॕलेजमधे गेले तर बस स्थानक घराच्या 2/4 मिनीटाच्या अंतरावर . तिथे पण वेहीकलची गरज भासली नाही .पोहणे मात्र शिकले,.. ....अगदी निपुणता मिळविली .थेट नॕशनल लेव्हल पर्यंत पोहचले .व अजुन ही या वयात पण वरिष्ठ नागरिक मधे सुवर्ण पदक नॕशनल लेव्हलला मिळवत आहे. पण तो swimming pool तेव्हा घरापासून सहज खेळत जाऊ येऊ शकेल अशा अंतरावर . पुढे , बँकेत सर्वीस लागली. ती पण इतकी जवळ की आई ने फोडणी घातली तर घमघमाट बँकेत पोहचायचा. ...इतकी जवळ. तेव्हा सांगायचे हे की, घराच्या आजुबाजुलाच माझा सतत वावर राहिला .त्या मुळे वेहीकल शिकणे जरुरी भासले नाही .त ssसे नाही म्हणायला भावाकडून सायकल शिकण्याचा प्रयत्न केला .पण दोन्ही गुडघे घासले गेले त्यावर मलम पट्टीत करणे व swimming ला न जाणे. घरी रहाणे हे शक्य नव्हते. कारण swimming competition सतत असत. त्या साठी पोहणे रोजचे करावे लागे. शेवटी सायकल शिकणे लांबले. ते इतके लांबले की , .....राहूनच गेले. त्यामुळे सायकल नाही म्हणजे balancing करणे जे दुचाकी वेहीकल ला जमलेच पाहिजे. ते आलेच नाही. कारण एकदा का व्यवस्थित balancing आले तर मग two wheeler वाहन चालविण्यास पटकन जमते .पण तेही नाही . तरी देखील मुलीने मोठे पणी टू व्हिलर शिकविली .रात्री घराजवळच्या ओपन मैदानात नेऊन शिकविण्याचा प्रयत्न केला .व मी शिकले पण . नाही म्हणायला 3/4दा जवळच्या दुकानात वस्तू आणावयास गेले .पण समोरून वहान येताच जीव घाबरायचा . भिती वाटायची. त्यामुळे भर रहदारीत स्कूटी चालविणे शक्यच झाले नाही. त्यामुळे टू व्हीलर चालविली नाही. तसेच मिस्टरांनी फियाट घेतली तर शिकविण्याचा प्रयत्न केला. चांगले 7/8 दिवस जात होतो. जातांना हे दहा वेळा clutch break एक्सलेटर चे सांगून ही चूक व्हायचीच. तसेच करत ५/६ दिवस गेले मी गाडी चालवायला. एकदा तर भर रहदारीत सर्व रहदारी माझ्या मुळे आडली . लोक horn देत होती.. मला काहीच सुचेना .मी गाडी कशी सुरु करु समजेना. लाजून खाली उतरले व मिस्टरांना म्हटले तुम्ही च पहा मला जमतच नाही. त्यावर त्यांची बोलणी तर खाल्ली च.... पण तोवर लोक ओरडत होती, ते वेगळच ... ती बोलत होती, " ओ ताई काय येत नाही आणि निघाल्या गाडी चालवायला. आम्हाला उशीर होतोय .या बायकांना काय ? उचलतात वेहीकल निघाल्या . उगाचच खोटा हव्यास .ओ ! ताई किती खोळंबा करताय " मी गांगरून गेले. त्यानंतर दुस-या दिवशी नीट गाडी चालवित घरा पर्यंत आले. ..university च्या मैदानावर मी आठचा आकडा चालविला . ब्रीजवरुन पण न घाबरत गाडी चालविली .व आता घरा जवळ आले. .. तर मेन गेट मधे आत शिरणार तर गेटशी पुरूष मंडळी गप्पा मारत उभी होती. त्यातून ओळखीचे पहात आहेत हे पाहून अजून बावरले . आधीच confidence नाही , घाबरत वळवून गाडी आत तर घेतली ... पण बाजूला उभ्या असलेल्या गाडीस ठोकून दिले. बरे कोणा लोकांना ठोकर दिली नाही पण बाजूला उभी असलेल्या गाडीचा व माझ्या गाडीच्या अंतराचा माझा अंदाज चुकला . व त्या गाडीला टक्कर दिली .... झाले....त्याच्या व आमच्या गाडीला खर्चाची भर झाली . तरी .मग गाडी दुरुस्त होऊन येऊ दे .मग चालवू .पण, मग .... ते ..मगच... राहिले .पुन्हा काही गाडी चालविण्याची हिंमत केली नाही. त्या मुळे गाडी शिकण्याची ईच्छा तेथेच राहिली. त्यामुळे गाडी वा टूव्हीलर चालविलेच नाही असे नाही .पण सध्याच्या बायका कशा बिनधास्त वाहन चालवितात. मुलांना सोडायला वा भिशीला कशा ऐटीत गाड्या घेऊन जातात, अथवा कधी नवरा म्हणतो बायकोला ,"आज तूच गाडी चालव .मी बसतो आरामात ."असे सुख मी त्यांना कधी च दिले नाही. अथवा आमची " ही गाडी घेउन आली होती मला सोडायला. "असे यांनी माझ्यासाठी काढलेले शब्द ऐकायला मला कधीच मिळाले नाहीत . उलट एवढी swimmer पण वेहीकल कसे चालवण्यास नाही शिकली हे मात्र वारंवार ऐकण्यास मिळाले. पण खर सांगू मला त्यात जराही वावगे वाटले नाही. कदाचित भिती वा आवड कमी दोन्ही कारणे असावीत . तरी पण काही ही म्हणा, वाहन स्वतंत्र बिनधास्त चालविणे.... राहूनच गेले. हे मात्र खर . .बर आहे माझ्या मुलांना आताच्या मुलांप्रमाणे आई गाडी चालविते वा आईने गाडी चालवावी असे तेव्हा फार कौतुक नव्हते. हल्ली, आपल्या नातवंडाना आईने गाडी चालविणे आवडीचे ,कौतुकाचे वाटते. काळा काळातील फरक दुसरे काय! आता माझे तरी या जन्मी तरी शक्य नाही.. "वेहीकल चालविणे" ही गोष्ट राहिलीच वैशाली वर्तक ( अहमदाबाद )

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...