रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

धागा धागा अखंड विणूया

धागा धागा अखंड विणूया              24/2/2019

तळे जमते, थेंब थेंब पाण्याने
वस्त्रासाठी जोडावे , धागे धाग्याने

विणण्यास वस्त्र , येती धागे कामी
जरा न करता , जोडण्यात खामी

विणकर दावी , त्याची कुशलता
धागा -धाग्याने, विणता सहजता

तंतू तंतूने , विणतो कोळी जाळी
अती प्रयत्ने , तया मिळते टाळी

अवनीचे हे , अक्षांश रेखांशाचे
वाटे रेखांकन , विणले रेषांचे

काही मऊ ,रेशमी धागे प्रेमाचे
मजबूत न् , शिस्तीचे मातृत्वाचे

वस्त्र विणले ,कबीराचे रामाने
भक्तासाठी देव ही ,धावे प्रेमाने

धागे विणावे , प्रेमाचे जीवनात
जेणे मानव , जुडसी जगतात

धागा धागा प्रेमाचा विणू अखंड
सा-या विश्वात शांती नांदो उदंड

वैशाली वर्तक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...