सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

वृत्त बध्द कविता पाऊस. आनंद वृत्त

गागालगा लगागा 


विषय ...पाऊस 

केला सहन उन्हाळा 
कोमेजली शिवारे
केव्हा पडेल पाणी 
वाहील थंड वारे

आले भरून अंबर
आनंदले मनाने
येतील थेंब आता
पाऊस तो क्षणाने

आलाच तो पहाना
आतुर मना जरासा
पाहून मेघ गगनी 
जीवास तो दिलासा 

तृप्त धरा बहरली
माती पहा अंकुरली 
रानफुल हसून फुलले
तृणांकुरे पसरली.

का रे अतीच येतो
तू थांब ना जरासा
काहीच का कळेना
झालाय तू नकोसा

तुझ्या वरी बळी तो
लावून आस राही
आहेच तू खट्याळच
वेळेत येत नाही 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

लढा तरी किती द्यावा

लढा तरी किती द्यावा

मर्यादा त्यास का नसावी

करा मर्यादित लढा मग

उत्कर्षाची कास न धरावी


जीवनच  असे एक लढा

हे तर आहेची सदा खरे

 होते , लढा दिल्यावरच 

प्रगती जीवनी हेच सत्य खरे


पहा आयुष्य श्री कृष्णाचे

जन्मा पासून लढा सुरू 

पण आयुष्य जगलेच ना!

अखेरीस ठरले जगतगुरु .


थांबला तो संपला  म्हण

आहेची सदासाठी उचित 

मर्यादित करिता लढा

प्रगती खुंटते हे खचित


साधे फुल गुलाबाचे

किती  साहू लढारुपी काटे

 मान फुलांच्या राजांचे मिळे

नको लढा तया , मनी न वाटे


दगडाला पण मिळविण्या देवत्व

साहितो टाकीच्या लढ्यांचा संघर्ष 

 जीवनात येणारे लढयासाठी

सहजच ध्यानात ठेवावा निष्कर्ष 


पहा आपले पंतप्रधानजी

 लढे झेलीत  संघर्षांने

प्रेरणा देती सर्व जगाला 

कसे जगावे सहर्षाने


वैशाली वर्तक

लढा तरी किती द्यावा

मर्यादा त्यास का नसावी

करा मर्यादित लढा मग

उत्कर्षाची कास न धरावी

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

मनोरमा वृत्त ..... आनंद वृत्त अभ्यास

गा  ल गा  गा  गा ल  गा  ग समूह आयोजित 
स्वतंत्र्य दिनी विशेष  वृत्त बध्द चारोळी लेखन स्पर्धा 
स्पर्धा क्रमांक 44
विषय.   स्वातंत्र्यदिन 
वृत्त.   मनोरमा 
लगावली.... गालगागा गालगागा 

गा ल  गा  गा   गा  ल  गा  गा 

आज स्वातंत्र्यास आता 
 आगळी ती शान आहे 
भारताच्या गौरवाचा  
वेगळाची मान आहे

वैशाली वर्तक 
गालगागा गालगागा

रोज काही सांगते ना
दोन गोष्टी जीवनाच्या
 सवय झाली नित्य नेमे. 
बोध घेण्या जीवनाच्या


####################################
खेळ थोडा वेळ देना
.  काळ जातो  चालताना. 
 बोलणे ते राहिलेना 
थांब थोडा बोलताना 

अंतरीचे शब्द माझे 
सांगणे ची  होत नाही
शांत  समयी    कोण जाणे 
  सांगण्याची वाट पाही

वाट पाहूनी पहा ना
रात सारी सरत आली
पण तुलाची   खंत नाही 
परतण्याची वेळ झाली 

 पूर येता भावनांना
प्रेम माझे  मीत झाले
चांदण्यांची  रात होती 
 सूर.     गीत आले

###################
[19/08, 10:35 am] Vaishali Vartak: गालगागा गालगागा 

माळरानी चालताना 
मौज वाटे आपल्याला 
खूप सारी  पुष्प  होती 
 डौलणारी  स्वागताला
वैशाली वर्तक
[19/08, 10:43 am] Vaishali Vartak: गालगागा गालगागा 

धून चाले रामनामे 
दर्शनाची आस आहे 
राघवाचे नाव ओठी
राम माझा श्वास आहे

गालगागा गालगागा 

देव आहे सर्व जागी
नाम घेता देव येतो
भक्ती गीते गात जाता
जीवनाचे सार देतो
वैशाली



[18/08, 11:01 pm] Vaishali Vartak: देव 
मनोरमा 
गालगागा गालगागा 

देव असता संगतीला 
कोण मजला  मारणारा 
सांगतो मी आज सर्वा
देव आहे तारणारा

 : देव कर्ता करविताची
तोच   वाहे भार साहे
आपुल्या या जीवनाची
शान तोची जपत  आहे

: देव कृपेने जगी या
रात्र ऊषा होत आहे 
निसर्गाची जादु त्याची
आपणाला दिसत आहे
[: गालगागा गालगागा 

माळरानी चालताना 
मौज वाटे आपल्याला 
खूप सारी  पुष्प  होती 
 डौलणारी  स्वागताला
वैशाली वर्तक
[19/08, 10:43 am] Vaishali Vartak: गालगागा गालगागा 

धून चाले रामनामे 
दर्शनाची आस आहे 
राघवाचे नाव ओठी
राम माझा श्वास आहे

गालगागा गालगागा 

देव आहे सर्व जागी
नाम घेता देव येतो
भाव पूर्ण गात जाता
जीवनाचे सार देतो
वैशाली








#####################################
आनंद वृत्त 
: वृत्त. आनंद 

गा गा ल गा.  ल गा गा
विषय पाऊस 

झाले पहा कसे ते
आकाश दाटलेले
काळ्या नभी शशीचे
मुख पार झाकलेले

वृत आनंद 
विषय पाऊस 

गागा लगा लगागा
नाही नभांगणी त्या
नावास चांदण्याही
काळीच रात्र आहे 
  पाऊस  मात्र नाही 

वृत्त.  आनंद 
विषय पाऊस 
गागालगा लगागा

आले पहा जलाचे   
बिंदू टपोर मोठे   
पाऊस आज आला 
जाऊ नकाच कोठे
 
गागालगा लगागा 
विषय पाऊस 
गागालगा लगागा 

केला सहन उन्हाळा हे
कोमेजली शिवारे
केव्हा पडेल पाणी 
येतील थंड वारे
वैशाली वर्तक

बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

वृत्त बध्द कविता लेखन. वृत्त मनोरमा


विषय मन
मनोरमा वृत्त 
गालगागा गालगागा 
काय वर्णू    मन कसे ते
सांगणेची  कळत नाही.   
दु:ख होते    सहजतेने
कारणेही    पटत नाही

होत आहे त्रास जीवा
कष्ट होता  मन उदासी
 देवपूजे.   शांति लाभे
साथ  देण्या   पुण्य राशी

झाल काही मोददायी
लाभते की सौख्य मना
बोलवित होते सुखांना
आज पाही त्याच क्षणा 

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

चित्र काव्य. महिमा बचतीचा

थेंबे थेंबे तळे साचे 
ठेवा सदा ध्यानात 
रोज  रूपया बचत करिता 
मोठी रक्कम होईल भविष्यात.


लहानपणीच अंगिकारावी 
बचतीची  सवय नित्य
 भविष्यात मोठ्या खर्चसाठी 
कामास येते हेच सत्य 

अशीच लागते सवय
फालतु खर्च टाळणे
उद्याच्या खर्चाची  सहज
 बचतीने तरतूद करणे .

बचत येता कामास 
किती वाटते हायसे
आजची केलेली बचत
 खर्च  रक्कम काढते अनायसे


 मुंग्या पहा ना कशा 
अन्न कण करतात गोळा
पावसाळ्यात पाणी सर्वत्र 
अन्न कोठारात करी सोहळा

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

ठेव. सिंगापूर शब्दगंध

ठेव 




 बालपणी पुस्तकातील 
मोरपीस, पिंपळपान 
चॉकलेटच्या चांदयाची
आगळीच ठेवेची शान

थेंबे थेंबे तळे साचे 
बचत करून ठेव पैका
भविष्यात येतो कामी 
बचतीचा महिमा ऐका

आई बाबांचे संस्कार
दुसरी अमुल्य ठेव
जीवनात येते कामी 
ज्याचे कौतुक एकमेव 

 बालपणीची संस्काराची  
  पूंजी मानितो मी ठेवी समान
   तिच्या बळावर सदा जीवनी
  मिळविला मान सन्मान 

संस्काराने सुसंस्कृत 
होतो आपण विद्यावान 
नसे चोरी भय विद्या ठेवीस
 खर्चताही  वृध्दी वेगवान 
 
ठेव वाढवावी नित्य
सत्कर्माची   जीवनात 
पुण्य  संचित कर्माने
 जाते आयुष्य आनंदात 


 आठवणींची पूंजी
अतिशय महत्त्वाची
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायची


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...