गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

पाहुण्यांची रेलचेल

विश्व लेखकांचे 
आयोजित उपक्रम 
लेख लेखन
विषय ...पाहुण्यांची रेलचेल व मनात पडलेले प्रश्न 


    काही म्हणा पाहूणे येणार म्हणताच एक उत्साह अंगात संचारतो
मला पहिल्या पासून लोकांचे येणे जाणे मनापासून आवडते. आईकडे पण असेच होते व येथे सासरी पण तसेच वातावरण लाभले. त्यातून आम्ही  अहमदाबाद मधे बाकी दोन्ही दीर नणंद मुंबई पुण्यात.व आमच्या कडे आमच्या सास-यांनी दिवाळी फिरती म्हणजे प्रत्येकाकडे एक एक वर्षी साजरी करायची अस ठरविले होते. त्यामुळे घरी
पाहुणे येणार तर आमची मुले, पुतणे भाच्या असा गोतावळा जमायचा.त्यामुळे पांघरुण,गाद्या, दिवाळीचा फराळ बनविणे वगैरे ची मस्त धमाल व्हायची. पण आम्ही तिघी जावा अगदी उत्साहाने एकत्र होऊन, काम करण्याचा कंटाळा न करता मस्त 
सण साजरा करायचो. 
      प्रत्येक जणींचा एक एक विशेष पदार्थ ठरलेला असायचा. जशी माझी दालमुठ व चिरोटे.  अशी एकही दिवाळी झाली नसेल की   माझी दाळमुठ व चिरोटे बनले नाहीत
आता मुले मोठी झाली पंख विस्तारून परदेशी गेलीत . त्यामुळे आता ती मजा नाही.पण स्वभावात पाहुणे यावेत ही मनापासून आवड. त्यामुळे अजून ही  कोणी घरी येणार म्हणताच उत्साह तोच असतो. 
 पाहुणे येणार म्हणता जितके दिवस रहाणार त्या दिवसांची काय भाजी ,कोशिंबीर वगैरे ची तयारी मनात व प्रत्यक्षात केली जाते.
सकाळ रात्री चा स्वयंपाक ठरला जातो. कुठे फिरायला जाणे वगैरे पण नक्की होते.
एकुण काय पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजेचे शिस्तबद्ध आयोजन करण्याची
मनाला सवय पडली आहे.
    आता पाहुणे येणार यात. प्रश्न हेच पडतात की कामवाली ने रजा पाडू नये. 
अर्थात आम्ही दिवाळीत एकत्र व्हायचो तर आम्ही तिघी मिळुन मिसळून करायचो.
कधी प्रश्न नाही पडायचा.
  आता तर काळ बदलला आहे. संस्थेच्या बायका पण रोजची कामं वाली येणार नाही म्हणता सोय करता येते. तसेच स्वयंपाक करणारी नाही आली तर घरगुती डबे देणा-या
गृहिणींची पण सोय करता येते. बाहेरून  पण गरम नाश्ते मागवता येतात.
      तसेच disposable पण डीशेस available असतात त्यामुळे भांडी वालीचा पण प्रश्न सहज सुटतो.
तर सांगायच काय की मनी आवड असेल तर प्रश्न सहज सुटतात. 
    खरच बालपणी ची शिकवण आतिथी देवो भव दिलेली व सासरी पण तितकाच उत्साह  त्यामुळे आनंदाला उधाण येते.आणि खरच लोक येणार ,रहाणार यातच जीवनाची मजा असते. अर्थात मुलांच्या शाळा क्लासेस पण adjust करतोच .
 आजी आजोबा म्हणजे आता ती पदे ..जागा आपल्याच पहावयास लागतात. सूना पण समजून उमजून सहकार देतात. त्यामुळे जीवनाचा आनंद लुटत जगण्याची मजा लुटता येते.
           घर लहान असेना. पण मन मोठी असली की सर्व नीट पार पडत. पण कधी कधी  येतात काही आडमुठे पाहुणे...तर तेव्हा थोडे मन खट्टू होते. पण नेहमी ची मनाला सवय झाल्याने ,उगा शब्द न वाढविता, वेळ निभावून नेण्याची कला पण अवगत झाली आहे. व कधी तरी पडते घेतले तर काय?,आता वाढत्या वयाला तेवढा समंजस पणा आलाच असतो ना?
          तसेही आज काल फास्ट जीवन शैली झाल्यानं कोणी 2/3दिवसा हून जास्त दिवस कोणी येत नाही. व तेवढी सरबराई सहज होते. 
       आणि वरिष्ठ नागरिकांना तर कोणी आले गेले की छानच वाटते.
आज काल लग्न कार्य  पण  एक एक दिवसात आटोपली जातात. 
तर असे धावपळीचे जीवन असता कोण कोणाकडे ठाम मांडणार.?गेले ते दिवस.
तर, मी तर म्हणते मस्त पाहुणचार करावा अतिथीला आनंद द्यावा व तर आपल्याला पण  पाहुणचार घेण्याचा आनंद घेता येतो. पण आधी आपण अतिथी देवो भव अगदी नाही तरी आनंदाने स्वागत केले तर वेगळाच आनंद मिळतो. नाही का?

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

कर्म रेषा बोलत आहे





साहित्य तेज 7/1/24


कर्म रेषा बोलत आहे 

जसे मानव घेतो जन्म
सुरु होते करणे कर्म.
चांगलं वाईट करी काम. 
 त्याची कर्मी दडले जीवनाचे मर्म

जसे होतेची सत्कृत्य
देवमाणूस येती शब्द अधरी
वृध्दी  होते चांगल्या कामांची 
 पुण्य  संचय होतो पदरी
 

ध्यानी ठेवावा कर्म सिध्दांत
कर्मातच वसे परमेश्वर
जैसे कर्म तैसे मिळे फळ
भाग्य बोले कर्म रेषेवर

जैसे  पेरतो तेच उगवते
तैसेची असे रेषा कर्माचे.  
कर्म रेषाच बोलत आहे 
 हेची खरे   मर्म जीवनाचे


कोणास मिळते चिमूटभर
असे ते त्याच्या कर्माचे-फळ, 
  कोणास मिळते ओंजळभर
तया लागे गंगाजळी, सत्कर्माचे बळ



संतानी  केले आपणा सजाण
केली जाण सामान्य  जनास
दिले बोधक कर्म रेषा ज्ञान 
उमजून करण्या सत्कर्मास


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



कविता साहित्य तेज साठी पाठवित आहे 👆🏼

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

हाताच्या रेषा

काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
काव्यलेखन उपक्रम क्रमांक 567
विषय.... हाताच्या रेषा 
       
      *खरं कर्म बोलते*
जन धाव घेती, ज्योतीष्याकडे
दाखविण्या हात , होऊनी दीन
येताची जरा  , प्रसंग बाका 
 मानव असतोच, नशिबाधीन

असे श्रध्दा , गगनातल्या 
हजारो मैल , दूरच्या ता-यांवर
केव्हा भाग्य, उजळणार 
कसे कळते हस्त रेषावर?

कर्म रेषाच ,असते बोलत
हेची खरे , मर्म जीवनाचे 
कर्मची खरे ,नशीब घडवे
तरी महत्त्व , हाताच्या रेषांचे

कोणास मिळते चिमूटभर
असे ते त्याच्या कर्माचे-फळ, 
कोणास मिळते, ओंजळभर
तया लागे गंगाजळी, सत्कर्माचे बळ

संतानी  केले ,आपणा सजाण
केली जाण, सामान्य  जनास
दिले बोधक, कर्म रेषा ज्ञान 
उमजून करण्या ,सत्कर्मास

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



कर्म रेषा बोलत आहे 

जसे मानव घेतो जन्म
सुरु होते करणे कर्म.
चांगलं वाईट करी काम. 
 त्याची कर्मी दडले जीवनाचे मर्म

जसे होतेची सत्कृत्य
देवमाणूस येती शब्द अधरी
वृध्दी  होते चांगल्या कामांची 
 पुण्य  संचय होतो पदरी
 

ध्यानी ठेवावा कर्म सिध्दांत
कर्मातच वसे परमेश्वर
जैसे कर्म तैसे मिळे फळ
भाग्य बोले कर्म रेषेवर

जैसे  पेरतो तेच उगवते
तैसेची असे रेषा कर्माचे.  
कर्म रेषाच बोलत आहे 
 हेची खरे   मर्म जीवनाचे


कोणास मिळते चिमूटभर
असे ते त्याच्या कर्माचे-फळ, 
  कोणास मिळते ओंजळभर
तया लागे गंगाजळी, सत्कर्माचे बळ



संतानी  केले आपणा सजाण
केली जाण सामान्य  जनास
दिले बोधक कर्म रेषा ज्ञान 
उमजून करण्या सत्कर्मास


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



कविता साहित्य तेज साठी पाठवित आहे 👆🏼

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

बाराक्षरी स्मरण..नवीन उभारी \

 नाम घ्यावे सदा ,मुखी राघवाचे

करितो सार्थक ,तोची जीवनाचे


लावा तया नामे,अंतरीचा दिवा

क्षालन करण्या, वाईट कर्माचे

भुरळ  पाडे  ती , षडरिपू जिवा

मनन चिंतन ,करा ईश्वराचे         १


बळे बळें  चित्त कोठेची  रमेना

नामस्मरणात सुख ते मिळाले

उठता मनीं वादळ विचारांचे

मन समाधाने प्रसन्न जहाले.     २


मार्गची दिसेना, जीवन तरण्या

मन अडकता  , संसार सागरी

विचार छळती सदैव संसारी

कशा मिळतील ,सुखाच्या घागरी


तोची जगी असे, कर्ता करविता

लाभावे भाग्यची ,मज दर्शनाचे

शरणची आले, तुज भगवंता

उजळेल मम ,भाग्य जीवनाचे







स्पर्धेसाठी 

मोरणा कार्यशाळा चौकट बद्ध बाराक्षरी उपकाव्य प्रकार 

स्पर्धा क्रमांक 1

दि 12/1/24

विषय ... नवीन उभारी 

शिर्षक.   जीवनी भरारी 



उंच नभातला पाहूनी पतंग            

मनी देत असे सदैव उमंग 


    इच्छाशक्ती हवी, मनात यशाची 

    जीवाला देतसे *नवीन उभारी*    

    उंच उडणा-या  पतंगा सारखे.       

    पंख पसरूनी घेऊया भरारी      


    चढाव उतार , येणार जीवनी

    सुखाची अपेक्षा नको सदोदित   

    मन लावुनिया करिता प्रयत्न    ‍ 

   उज्वल यश येणारच खचित   


वैशाली वर्तक 

अहमदाबाद



*स्पर्धेसाठी*

मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 

आयोजित 

काव्य प्रकार  चौकटबध्द बाराक्षरी 

विषय ... देशप्रेम 

शीर्षक ...बलिदान 



देशप्रेम होते ,स्वातंत्र्य वीरांचे.      पहा

मोल स्मरुयात ,त्या बलिदानांचे.  ....1



स्वतंत्र करण्या ,आपला भारत 

अर्पिले जीवन ,उदार होऊन 

हसत चढले   ,वीर फाशीवर

खंतावते मन ,कधीही स्मरुन....  2


अशी शूर वीरांची भारतभूमी 

स्वर्गाहून प्रिय , ही भारत माता

तिच्या रक्षणार्थ ,सदैव  तत्पर 

किती मी वर्णावी, तिची गुण गाथा.         3


वैशाली वर्तक 

अहमदाबाद




रविवार, २९ डिसेंबर, २०२४

झोप

          झोप  28/12/24

झोपे सारखे  सुख नाही 
वाटे डुलकी घ्यावी थोडी 
 मिळते मनास विश्रांती  
 झोप शब्दातच भासे गोडी

करू मस्त आराम 
ताणुन देऊया छान 
 पडता झोप लागे लगेचच
असे तो  खरा भाग्यवान 

झोप हवीच सर्वांना 
असे जरुरी शरीरास
कमी झोपेने ,अस्वस्थ मन.
देई आमंत्रण व्याधींना खास 

लवकर उठावे सकाळी  
म्हणताती  जरी , जन सारी
सकाळच्या साखर झोपेची 
 मजाच असते ती न्यारी 

विद्यार्थी दशेत असताना 
झोप येई  अनावर आवर्जून     
 झोपेला  तेव्हा अव्हेरण्याचे 
  दु:ख वाटे मनापासून 
 
रविवार तर खास झोपण्याचा
 घड्याळाला करून दुर्लक्षित 
सकाळी उशिरा पर्यंत झोपण्या
असतो ठेवलेल्या सुरक्षित 






शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

ललित लेखन. प्राजक्त

वल्ड व्हिजन टाईम्स मुंबई मधे प्रकाशित 

स्पर्धेसाठी 
विश्व लेखाकांचे
ललित लेखन 
विषय ... प्राजक्त 

   सकाळी उठून अंगणात गेले. काल संध्याकाळी अलवार उमलू पहाणा-या  प्राजक्ताच्या कळ्यांच्या मंद सुगंधाने ,  पूर्ण आसमंत दरवळत होता. प्राजक्तच्या  कळ्या अर्धंवट उमलेल्या होत्या आणि वा-यावर हेलकावे घेत होत्या.आणि आता  सकाळी. पहाते  तो .....छान टपोरी प्राजक्त फुले जमिनीवर पसरलेली होती.जणु फुलांची उधळण केली होती. पारिजात वृक्षाने सर्व फुले भुमीला समर्पित करुन रिक्त हस्त झाला होता.
  फुले जणु हसतमुखे प्राचीचे स्वागत करत होती.   प्राजक्ताच्या शुभ्र  पाच पाकळ्या व तितकेच मोहक केसरी देठ , अशी फुले विखुरलेली होती.सुंदर सडा पडला होता. पाहून  सहज ओळी सुचल्या....

        टपोरे शुभ्र प्राजक्त
        फुलले मम अंगणी
        किती मोहक रूपाने 
        पाहता आनंद  मनी

         देठ शोभते केसरी
         शुभ्र पाकळ्या मोहक
         पडे  सहज भुवरी
         सडा चित्ताला वेधक.
  
          खाली वाकून मी पटपट,.... पण हळुवार फुले परडीत गोळा केली.फुलांकडे पाहताना विचार आले. किती नाजूक आहे फुल. गर्द हिरव्या पानांत किती शोभून दिसते.   फुल उमलते ... , ते पण गुच्छात बरोबर दुसऱ्या फुलांना  साथ देत. रात्र भर झाडाच्या पानांच्या सान्निध्यात रहाते. स्वत:चा परिमल जनांना देते  आणि तितक्याच अलगदपणे वृक्षाच्या फांदीवरुन वेगळी होऊन भूमीवर स्वतः ला झोकून धरणी मातेच्या कुशीत विसावते.
     या प्राजक्ताच्या वृक्षाबद्दल अनेक म्हणी आहेत, ज्यांना लोकमान्यता आहे. एक म्हणजे अर्जुनाने हे वृक्ष स्वर्गातून आणले .  कुंती, शिवजींना प्राजक्ताच्या फुलांचा मुकुट द्यायची . दुसरी म्हण आहे की भगवान श्रीकृष्णांनी हे त्यांच्या प्रिय राणी सत्यभामेसाठी आणले होते.
        प्राजक्त वृक्ष हे पवित्र आणि दैवी वृक्ष आहे. ज्याला हिंदू पौराणिक कथांमध्ये मोठा मान आहे. पारिजात या शब्दाचा अर्थ स्वर्गातून उतरलेला किंवा खगोलीय असा होतो. भागवत पुराण, विष्णु पुराण आणि महाभारतानुसार पारिजात फुले समुद्र मंथनाच्या परिणामी निर्माण झाली . त्यामुळे हे स्वर्गीय वृक्ष मानले जाते.
     हे सारे झाले वृक्षाचे. पण प्राजक्त फुल स्वतः नाजुक .....अती अल्प काळ टिकणार असते. पण त्या अल्पावधित स्वतः च्या मोहक रुपाने  व तितक्याच मन मोहक सुगंधाने जन-मनास हर्षित  आकर्षित करते.व जगाला सुंदर शिकवण देते . आयुष्य किती अल्प असो ,..जगायचे ते आनंदाने व दुसऱ्यांना प्रसन्नता देत जगायचे. हे विचार, फुले प्राजक्ताची ,  मला क्षणात  सांगून गेली.
      मी काही फुले  प्रगतीतील ओंजळीत घेतली. व श्री कृष्णा चरणी अर्पण केली.देवघर काय सुगंधाने दरवळले सांगू ! शोभिवंत दिसले. सहज ओळी मनात आल्या.

अल्प काळाचे आयुष्य
आनंद देणे दुसऱ्यास,
घ्यावी शिकवण प्राजक्ताची 
उपयोगी  किती जगण्यास,

          खरच छोटं फुल पण काम किती महान. मी ओंजळी शिवायच्या  परडीतील बाकीच्या फुलांकडे पाहत होते पाहता पाहता सहज मनात आले. व  लगेच त्या फुलांनी  श्रीकृष्णांची आकृती बनविली. तशी मला चित्र कलेची आवड आहेच व बरी पण जमते. त्यामुळे थोड्याच वेळात मी श्रीकृष्णाची फुलांची कलाकृती देवघरात तयार केली.  
      किती  मोहक सुंदर दिसत होती माझी कलाकृती . त्या कलाकृतीला पाहून मन तर आनंदलेच  आणि मी मनाने  त्या प्राजक्त फुलांची कलाकृती बनविण्यात माझे मन हरवून गेले. लगेचच त्या कलाकृतीचे 2/4 फोटो पण काढले. आणि साहित्य समूहावर धाडले .
  आणि पहाते तर काय ! किती तरी कृष्ण भक्तांचे  शेअर  केलेल्या कलाकृती ला   लाईक आले होते., व सर्वांनी भक्ती भावे नमन. व  *जयश्री कृष्ण* चे संदेश पण आले.
    मी पण हे पाहून खूप खुश झाले . लगेच त्यावर चित्र काव्य ,श्रीकृष्णावर,व  त्याच्या बासरीचे वर्णन केलेली काव्ये पण सादर झाली. मला पण प्राजक्ताने कृष्ण दर्शन घडविले केले. मी पण राधे प्रमाणे कृष्ण भक्तीत लीन होऊन कृष्ण मय झाले.
     






आज प्राजक्ताने माझा दिवस आनंदात व प्रसन्नतेत घडविला.  मीच बनविलेल्या कलाकृती पहात सहज विचार  आले ते असे काव्यात 
           वाटे बसावे पहात 
           कलाकृतीचा श्री हरी
           भान हरपले माझे
           दर्शन जाहले घरी.

       अशाप्रकारे दिवस खूप मजेदार सुरू झाला. आणि कारण काय ? तर प्राजक्ताची फुले ,प्राजक्ताचा  अंगणी पडलेला सडा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...