बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

शामला क्षरी चाक

 शामला क्षरी काव्य समूह 

आयोजित चित्र लेखन 

     वर्ण ९

       चाक

*वाट* चालायचा कंटाळा 

 मुले शोधती युक्ती नामी 

*वाट* पाही आई घराला 

गाडी आलीय पहा कामी.   1

*शोध* चाकाचा लागताच 

कामे झाली पहा सुलभ

*शोध*  दुजे चाक आताच 

नकोच  शंकेचे मळभ,   2

*झर झर*   रेटा गाडीला

देऊन पोहचुया घरी

*झर झर* पाऊस धारा 

बरसतील भुमी वरी.  3


वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

वाट ... रस्ता सडक.    प्रतिक्षा 

शोध... खोज  शोध खोळ.  शोध  क्रियापद   शोधणे   आज्ञार्थी रुप

झरझर.  पटपट.   करतील पडतील

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

दसरा

साकव्य काव्य स्पर्धा ४६* 
समूह सदस्या नीता कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य काव्य स्पर्धेसाठी स्वरचित कविता
दिनांक ८/१०/२०२४
विषय :- दसरा
शीर्षक...आनंदी दसरा

 सोडा जीवनी मी पण
उल्लंघूया सीमा स्वार्थाची
हात मदतीचा करु पुढे
सेवा करण्या दीन पतीतांची

 देती शिकवण  पाने आपट्यांची 
दोन ह्रदयी ठेवू स्नेह  खरे
आनंदाचे ,सौख्याचे, प्रेमाचे
वाहू देऊया सदैव झरे.

संत वाणी हृदयी ठसवू
सोने करु अनुभवाचे
सदीच्छांचा करु वर्षाव
नको मनी बोल अहंकाराचे.

 गर्वाने  संपला रावण 
 गर्व, कुकर्माचे करू दहन
 गाऊ गीते  देश, देवभक्तीची
होईल जीवन सदा पावन.

पहा लाभे उत्साह मनी
मर्म जाणिता  खूलेल चेहरा
होईल आनंदी जीवन
साजरा करू, सण दसरा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
८\१०\२४





आनंदी दसरा
संपता उत्सव नवरात्रीचा
 विजयादशमी येतो सण
 असे आनंदाचा उत्साहाचा 
 दसरा तया संबोधती जन.

सोडा जीवनी मी पण
उल्लंघूया सीमा स्वार्थाची
हात मदतीचा करु पुढे
सेवा करण्या दीन पतीतांची

 देती शिकवण  पाने आपट्यांची 
दोन ह्रदयी ठेवू स्नेह  खरे
आनंदाचे ,सौख्याचे, प्रेमाचे
वाहू देऊया सदैव झरे.

संत वाणी हृदयी ठसवू
सोने करु अनुभवाचे
सदीच्छांचा करु वर्षाव
नको मनी बोल अहंकाराचे.

 गर्वाने  संपला रावण 
 गर्व, कुकर्माचे करू दहन
 गाऊ गीते  देश, देवभक्तीची
होईल जीवन सदा पावन.

पहा लाभे उत्साह मनी
मर्म जाणिता  खूलेल चेहरा
होईल आनंदी जीवन
साजरा करू, सण दसरा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
30/9/25


रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

कथा. कष्टाचे चीज

कष्टाचे चीज 
  मुलीशी सहज गप्पा मारत असता, जीवनाचा आढावा घेत नाना म्हणाले,
    "खरच, त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्यातून अगदी जवळ काही पैसा आडका नसला पण मेहेनत करण्याची व स्वावलंबी बनविण्याची मनातून तीव्र ईच्छा असेल. तर ते मेहेनत व कष्ट करून दोन पैसे मिळवू शकत  होते.  आणि खरच जे कष्ट करतात त्यांच्या पाठीशी देव असतोच.  हे आपण पहातोच. 
म्हणतात ना प्रयत्ने वाळूचे रगडीता तेल ही गळे."

या संभाषणाचे उदाहरण म्हणजे आमचे बाबा. महेनत करून विदर्भातून येऊन, चांगल्या स्थितीत जीवन गुजराथ मधे जगले.  ख-या अर्थाने  शुन्यातून घरदार ,मुले कुटुंबाला उत्तम स्थितीत उभे केले.
      आधीची घरची गरीबी.  ४ बहिणी ..त्यांची लग्ने झालेली. एक धाकटी बाकी होती. जिला घेऊन व जोडीला आई व बाबा.  असे चारजण. .अहमदाबादला आले..तेव्हा अहमदाबाद मधे कापड गिरण्या खूप होत्या. त्यांची आत्या तेथेच रहात होती. तिचा मुलगा कापड गिरणीत कामाला होता. कापड गिरणीच्या शेठचा अगदी विश्वासू माणूस होता ...मराठी माणूस महेनती व प्रामाणिक असतो. हे सर्वत्र मानले जायचे व अजूनही आहे. त्यावेळी अहमदाबाद मघे खूप मराठी माणसे गिरणीत स्पिनिंग मास्टर म्हणून कामास होती 
   आत्याने स्वतः चया मुलाला सांगून ,भाच्याला पण अहमदाबादला बोलावून घेतले. 
ती  भाच्याला म्हणाली,
"येथे माझ्या कडे ये. कापड गिरणीत काम मिळेल".  
भाचा ,आत्याने सांगितले तसे आला. आधी एकटा आला. काही दिवस आत्या जवळ राहिला.मग स्वतःची खोली घेतली आणि मग आई बाबांना बहिणीला आणले.
   गिरणीत ओव्हर टाईम करून पैसे कमविले.  लग्न झाले. चौघे जण रहात पण पैशाची ओढाताण व्हायची.
पण जीद्य होती. सकाळी उठून टिफीन घेऊन गिरणी गाठायची.गिरणीत सतत आवाज व केमिकल चा वास.
त्रास व्हायचा ,पण काम तर केलेच पाहिजे.....पुढे लग्न झाले.
    लग्ना नंतर पत्नी पण तितकीच जिद्दी. तिने पण त्यावेळी व. फा  (व्हर्नीक्युलर फायनल म्हणायचे.)
ते केले की, शाळेमध्ये नोकरी मिळायची. तिने पण शिवण शिक्षिका म्हणून जे काम मिळेल ते घ्यायचे 
ठरविले. दोघे जोडीने काम करू लागले. शिवण काम शिकली होती.शिवण कामाचे  मशीन हप्ताने घरी  विकत त्यावर आजुबाजुच्या लोकांचे शिवण करून दे ,असे करत , जे पैसे मिळतील तेवढाच कुटुंब जनास  मदतीचा हातभार हे तत्व लक्षात घेऊन दोघंही मेहेनत घेत.
     .गिरणीतून परत आल्यावर  संध्याकाळी एका गिरणी तून मशीन ला कव्हर म्हणून कापड्याचे तागे यायचे, त्या ताग्यातून ठराविक पध्दतीने शिवण करून कव्हर बनविण्याचे काम  ओळखीतून मिळविले. ती कव्हरे
शिवण्याचे काम.मिळवून त्यातून आवक उत्पन्न केली.अशा रीतीने मेहनत करण्यात कधीच मागे पडत नव्हते. पत्नीस   पण म्युनिसिपालटीत शाळेत नोकरी कायम स्वरूपाची खटपट करून मिळाली. मग तर दोघांनी घराचा भार सहज मेहेनत करून उचलला. 
   मीलची नोकरी झाल्यावर दुसऱ्या गिरणी तर contract वर कामे घेत .महेनतीला कधीच मागे पडले नाहीत.कष्टाचे जीवन जगले पण कधी कोणा समोर हात पसरला नाही. स्वकष्टाने पैसा ,नाव कमविले.
  संसारात दोन मुले .एक मुलगा व एक मुलगी . पत्नी शिक्षिका मग काय सरस्वतीला मान असणार च. दोघांनाही  शिक्षीत केले . दोन्ही मुले पण शिकून उत्तम  नोकरीला लागली.स्वत:चे छोटे घर पण घेतले. अशारितीने कष्ट केल्याचे समाधान मिळाले. व दोघे सुखी समाधानी जीवन जगले.  अहमदाबाद ला आले व स्वतः चे घर  स्वतः ची दुचाकी.. पण  घेतली. मग पुढे  मुले पण शिक्षीत होतीच,. आई वडिलांचे संस्कार व त्यांनी आई वडीलांनी केलेले कष्ट पाहिले होते. त्यामुळे त्यांना पण मनात फार आदर होता.पुढे कार पण घेतली.

     अशा रीतीने कष्टाळू पण स्वाभिमानी जीवन जगले.  सहज एकदा मुलीशी जीवनाचा आढावा घेत म्हणाले,
" खरच आता  कापड गिरण्यांना मंदी आलीय .ब-याच नामांकित कापड  गिरण्या बंद झाल्या आहेत.पण त्यावेळी त्याच गिरण्यांनी माझ्या सारखी बरीच घरे सावरली. नाही तर मी काय केले असते.तेव्हाच्या महेनत व कष्टाचे चीज झाले. .आता तुम्हीच मला सक्तीने रिटायरमेंट  घेऊन आरामदायी सुखी जीवनाचा आनंद देत आहात.
तुम्ही पण दोघेही छान नोकरीत आहात व मला पण विमानाचा प्रवास करविला.घडविला. केवढा आनंद झाला होता.
मागे जीवनात वळून पाहिले तर कळते . प्रयत्न हाच परमेश्वर ही म्हण पटते. जीवनात मी  अतोनात 
अशा रीतीने कष्ट केले पण त्या *कष्टाचे चीज* झाले ह्याचा मनात सदा अभिमान व आनंद राहिला.
  

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

अपराध (मुलगी येता जन्मा)

काय केला गुन्हा


लागता चाहुल मुलीची
होऊ नकोस ग कष्टी
येऊ द्या मला जन्मास
बघायला ही जीवन सृष्टी 

मुलगी म्हणून येणे जन्मा 
   हा काय गुन्हा  होतो खास  
झाशी सिंधूताई जिजाऊंनी
घडविलाच ना इतिहास 


*काय माझा गुन्हा*
असता आपण कलिका
जाण ठेवा अस्तित्वाची
कशी चालेल समाज मालिका

विविध रूपात वसे नारी
आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
 सदा वाहे ममता हृदयातूनी
 सर्वच रुपातील *ती*हवी हवीशी


जरी नसली मी वंश दिवा
शिकून दाखवीन मम कर्तृत्व 
तुझ्या प्रेमाची ठेवून जाण
सदा पटवीन स्त्री चे महत्त्व 


नको घाबरु या जगाला.        
कर विचार पक्का मनी.      
येउ दे मला जन्माला .     
राहीन मी सदा ऋणी.          

नाही हो अपराध   
जन्मा येणे मुलगी  
बदला दृष्टी कोन
करा मनाची सलगी

शाश्वत निरंतर सिंगापूर शब्दगंध

 शाश्वत



 जगी काहीच नाही निरंतर 

 नसे कसली शाश्वती 

जीवन पण ,असे क्षणभंगुर 

करिता विज्ञानाने कितीही प्रगती 


किती ही करा प्रयत्न 

टिकविण्याची जरी आस

प्रत्येक वस्तूला , व्यक्तीला

नाश हा असतोच खास 


उत्पत्ती वाढ  आणि  अंत 

या तीन्ही क्रिया होणार 

पण   हेच नित्य निरंतर 

 अमर्त्यची शाश्वती  नसणार


जलचरसृष्टी  पण नाही निरंतर 

ते पण नाही  शाश्वत 

जो पर्यंत श्वास चाले

जीवन असे अविरत


अहो, म्हणती जरी सारे जन

अपत्य हवीत आपल्या संगती.     

 निवृत्त काळी आधाराकाठी.        

 मिळण्याची  असते का शाश्वती.  

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

आशा आणि अपेक्षा










मेंदू दिधला देवाने
मानव  करी विचार 
गुंतता  मन तयात. 
उद्भवती आशा अपार 

वाढत जाती  आशा
मनी दाटतो आनंद 
होता सफळ ईच्छा 
लागे मना आशेचा छंद

होता आशेची पूर्तता 
मनी माळ अपेक्षांची 
तयार मनात सदोदित 
असा खेळ चाले  सदाची

आहे कार्यरत मेंदू 
चाले जन्म भर खेळ 
आशा अपेक्षांचा सदा
मानव जमवितो
 मेळ
     



गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

सहाक्षरी ...काय म्हणू सांगा /नभात चांदणं काही तरी चुकत जाते

सायबर क्राईम पेपरात

साहित्य दर्पण कला मंच नागपूर 
आयोजित उपक्रम 
दि ५\९\२४
विषय.. काय म्हणू सांगा 

सारे जन झाले 
  मोबाईल वेडे
होताची सकाळ 
 तया विणा अडे

स्मरण देवाचे 
 विसरून जाती 
कर न जोडता 
 फोन घेती हाती 
 
घरात असून 
संवाद संपला
 हर एक जण
स्वतःत गुंतला


काय म्हणू याला
विज्ञान प्रगती
कोणत्या शब्दात 
वर्णावी महती

एकत्रित होणे
बसून बोलणे
होत नाही आता 
विचार सांगणे

फायदे आहेत 
गुगल  हा गुरू 
 हजर क्षणात 
ज्ञान धडे सुरू 


फायदे तोट्याचा 
करूया विचार 
होण्यास  आनंदी 
जीवन साकार 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद





विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित मासिक स्पर्धा 
दि 28/1/25
षडाक्षरी
विषय ... चांदण्याची रात्र 
* *नभात चांदणे**

काळ्या काळ्या नभी




काळ्या काळ्या नभी
मोहक चांदण्या
भासे जणू दिवे
लाविले शोभण्या.

शशी संगे येते
शुक्राची चांदणी
सर्वात  शोभून 
दिसे नभांगणी.

चांदण्याचा चाले
नभांगणी खेळ
वाटे मजा पहा 
काढुनिया वेळ.

चांदण्या रात्रीत
शशी तारिकांचा
रास लोभनीय
भासे आनंदाचा
    

रातराणी पहा
बहरली कशी
नभीच्या तारिका
उतराव्या जशी.

टिपूर चांदणे
मोहाविते मना
एक एक तारे
आकर्षित  क्षणा               
    

वैशाली वर्तक
अहमदाबाद



लालित्य नक्षत्र वेल
समूह आयोजित उपक्रम 
विषय .... ......काही तरी चुकत आहे 
शीर्षक...    काय म्हणू सांगा 


सारे जन झाले 
मोबाईल वेडे
होताची सकाळ 
तया विणा अडे.

स्मरण देवाचे 
विसरून जाती 
कर न जोडता 
फोन घेती हाती .
 
घरात असून 
संवाद संपला
हर एक जण
स्वतःत गुंतला.

काय म्हणू याला
विज्ञान प्रगती?
कोणत्या शब्दात 
वर्णावी महती.

एकत्रित होणे
बसून बोलणे
होत नाही आता 
विचार सांगणे.
                          
जो तो रमतोय
आपल्या विश्वात
वरिष्ठ मंडळी 
पहातात वाट ,

फायदे आहेत 
गुगल  हा गुरू 
हजर क्षणात 
ज्ञान धडे सुरू .

फायदे तोट्याचा 
करूनी विचार 
होण्यास  आनंदी 
जीवन साकार .

मोबाईल पेक्षा
टीव्ही दिन  बरे  
एकत्र बसून 
पहायचे खरे.

कसे  थांबणार 
प्रश्न प्रत्येकाला 
कुठंतरी चुकतं 
कळतं मनाला .

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...