साकव्य काव्य स्पर्धा ४६*
समूह सदस्या नीता कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य काव्य स्पर्धेसाठी स्वरचित कविता
दिनांक ८/१०/२०२४
विषय :- दसरा
शीर्षक...आनंदी दसरा
सोडा जीवनी मी पण
उल्लंघूया सीमा स्वार्थाची
हात मदतीचा करु पुढे
सेवा करण्या दीन पतीतांची
देती शिकवण पाने आपट्यांची
दोन ह्रदयी ठेवू स्नेह खरे
आनंदाचे ,सौख्याचे, प्रेमाचे
वाहू देऊया सदैव झरे.
संत वाणी हृदयी ठसवू
सोने करु अनुभवाचे
सदीच्छांचा करु वर्षाव
नको मनी बोल अहंकाराचे.
गर्वाने संपला रावण
गर्व, कुकर्माचे करू दहन
गाऊ गीते देश, देवभक्तीची
होईल जीवन सदा पावन.
पहा लाभे उत्साह मनी
मर्म जाणिता खूलेल चेहरा
होईल आनंदी जीवन
साजरा करू, सण दसरा.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
८\१०\२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा