रविवार, १८ जून, २०२३

पश्चात्ताप

कल्याण डोंबिवली महानगर 2
उपक्रम 
विषय - पश्चाताप


व्हायचे ते तर होणार 
चिंता का करावी मनी
जायचे ते नक्की जाणार
 मग पश्चात्ताप  नको त्याक्षणी

नाही मिळाले  जर यश 
कमी पडले तेव्हा बळ
रडून काय उपयोग 
नशीबी नव्हते फळ

 निष्काळजीने होते चूक
लक्ष देता होत नाही भूल
हवी दक्षता कामात
मग मिळे यशाचे फूल


होते अलवार हलके
पश्चाताप होता मन
पुढच्या कामासाठी
तयार होतात क्षण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, १३ जून, २०२३

चित्र काव्य......

सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
चित्र काव्य लेखन
   *लगबग परतणीची*

नभ दाटले कृष्ण मेघांनी  
तयांना बरसण्याची घाई
गडगडता  ते डोंगर माथ्याशी
घरी जाण्यास अधीर बाई

दोर गाईचा एक हाती
दुजा हाती वासरांचा
घेऊन चाले भरभर
खटाटोप घरी पोहचण्याचा.

गेली होती गुरे चरायला
अचानक दाटले नभी मेघ
वारा सुटलाय जोरात
चमके नभी दामिनीची रेघ

मुखाने वदे वासराला
अनवाणी चालता भरभर
बिगी बिगी पाय उचला
येईल  पावसाची सर.
 
आता थंड खट्याळ वारा
झोंबता अंगाला उठे शहारा
पहा आता बरसणार धारा
काळोखी  आसमंत सारा

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सोमवार, १२ जून, २०२३

चित्र काव्य.......काव्य प्रणाली रचना असामान्य दर्पण. | मनाचा आरसा



स्वप्नगंध स्पर्धा समूह
चित्रा धारित रचना
स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित
काव्य प्रणाली चित्र काव्यलेखन स्पर्धा
10/8/8/10
काव्य प्रणाली  रचना
 १०\८\८\१० ओळी शब्द 
शीर्षक...  *असामान्य दर्पण*


रूप निरखण्या उभी बाळी. 
बाळीला भासे आगळे 
आगळेची प्रतिबिंब 
प्रतिबिंबाचे रुप वेगळे

वेगळे  पाहुनीया   स्वरूप    
स्वरुपाने भयभीत 
भयभीतीने निरखे 
निरखून झालीय चकित 

चकित होऊनिया पाहता
पाहताच   वाटतसे 
वाटे स्वरूप वृद्धेचे
 वृध्द काळी दिसेल असे

असेची काही  विचार मनी
मनातून   उद्भवले
उद्भवलेले विचार 
विचारांचे मंथन  संपले

संपले जरी वाटे मनाला
मनाला शांतता नाही 
नसे दर्पण सामान्य
असामान्यता शोधीत राही. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद



मनाचा आरसा

काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक ४४३
विषय ..मनाचा आरसा


दिसे क्षणात स्व रूप 
पाहताच दर्पणात
जसे आहे तसे दिसे
नसे बदल रुपात 

सत्य वचनी आरसा 
दावी  बाह्यच रूपाला
पण डोकवा अंतरी 
जाणा त्या अंर्तमनाला

बोट  इतरा दाविता
प्रश्न विचारा मनात 
सांगे बाकीची ती बोटे 
 मिळे उत्तर क्षणात 

हेच प्रात्यक्षिक असे 
साधे होते परिक्षण
 खेळ उमजे  मनाचे 
स्वच्छ दिसे अंतर्मऩ

निराकार तो आरसा
पहा कसा तो मनाचा
सदा दावी गुणदोष
आपुल्याच अंतरंगाचा 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, ९ जून, २०२३

सुनीत काव्य बेरोजगार

माझी लेखणी साहित्यमंच शहापूर जि ठाणे 
आयोजित तृतीय वर्धापन दिनानिमित्त महास्पर्धा
काव्य प्रकार ..सुनित काव्य
विषय... बेरोजगारी

     *कशाला चाकरी*
 
रंगवली होती साहेबी स्वप्ने मनात
मनाजोगती नक्की मिळेल नोकरी 
झालो आहोत ना उत्तम पदवीधर ?
आता कसलाच नाही खेद अंतरी .  1      

केले अर्ज अनेक जागी कचेरीत
असूनही कुशाग्र बुध्दी हुशार
  कसे सरसावले वशीलेवाले पुढे?
सर्वत्र दिसला माजलेला भ्रष्टाचार..2

काय करावे काही कळेना
शिकून सावरुन पण मी बेकार
 काय कामाची हातातली प्रमाणपत्रे?
हासत म्हणाली तू शिक्षीत *बेरोजगार.  ३

 न होता विचलित,धावत आलो शिवारी
माझीमाय काळी माती,कशाला करु  चाकरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, ८ जून, २०२३

संवादाची परिभाषा

 भारतीय साहित्य व सां मंच चंद्रपूर 

आयोजित

विषय - संवादाची परिभाषा


दोघांत होतो तो संवाद

मनाशी बोलतो ते स्वगत

बहुजन बोलती ती चर्चा

आंतरिक भाव दावी ते मनोगत


संवादात सहृदयात हवी

कठोर बोलणे नसावे

जेणे करून हृदयी लागेल

असे नेहमीच टाळावे


 जग जिंका गोड बोलून 

नाही लागत गोड बोलण्या पैका 

सहजतेने  होते काम जीवनी

नको सदा मीपण दुजांचे पण एका


ऐकता संत वचने

दाखवी सहज प्रबोधने

असती मौलिक वचने 

करी जनांना संबोधने


वैशाली वर्तक

अहमदाबाद

सोमवार, ५ जून, २०२३

चित्र काव्य. विडियो वरुन देवा स काकुळतीने विनवणी

मुक्ताई फाउंडेशन संत मुक्ताई जागतिक साहित्य मंच आयोजित उपक्रम क्रमांक 27
काव्य लेखन 
दिलेल्या विडीओ वरुन 

   *काकुळतेची देवास विनवणी* 

आयुष्य काढले एकत्र
 सुख दुःखाचे पाहिले दिन
केली जीवनी तडजोड
धनी झाला वैचारिक क्षीण


हृदय पतीचे द्रवले
पाहून पत्नीला आजारी
नयनांचे आसू थांबेना 
दु:ख सहवेना भारी

तूची माझा आधार
तुझ्या साथीने मी खंबीर
 नको कधी तुज आजार
झोपलेली पाहून मी गंभीर 

साथ तुझी हवी मजला
करीतो मी देवाला वंदन
लवकर बरी कर तिला
 आलो मी तुजला शरण

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, १ जून, २०२३

चित्र काव्य प्रतिबिंब

तळ्याकाठी बसलेले
बघती जलकुंडात स्वरुप
दिसले तयांना प्रतिबिंब जलाते
झाले पहाण्यात दंग एकरुप

वदले गोड बिंब पाहता
निरखून घेतची दुरुनी
पाण्या ,अशीच ठेवी प्रतिमा
प्रतिबिंबित सदा जपूनी

लाजरा हासरा चेहरा
पाहिला नाही ना कोणी
घेतो टिपूनी मी क्षणात
आमुचीच प्रतिबिंब दोन्ही

चित्र काव्य करू हितगुज

शब्द रजनी साहित्य समूह पुणे  चित्र काव्य  अष्टाक्षरी  शीर्षक  ... करु हितगुज  हात  हातात घेतला जाऊ समुद्र  किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...