स्वराज्य लेखणी मंच
आयोजित
सहाक्षरी काव्यलेखन
विषय .. क्षण निसटले
*काळ चलला पुढे*
सारखा चालला
पुढे पुढे काळ.
नसेल पुनश्च
आजची सकाळ
आजचा दिवस
उपभोगा क्षणी
गेलेल्या क्षणाचे
दुःख नको मनी.
क्षण निसटती
रंक असो राजा
येत नाही पुन्हा
नको गाजावाजा
जीवनाचा मोद
वेळीच लुटूया
असलेला क्षण
आनंदी करूया
क्षण निसटता
आनंदाची वेळ
न जाणो पुनश्च
जमेल का मेळ
वाळू निसटते
जशी हातातून
काळही सरतो
क्षणा क्षणातून
काल आज उद्या
टप्पे जीवनाचे
पुन्हा परतून
न कधी येण्याचे
आजचा दिवस
असे सोनियाचा
कालचा उद्याचा
नको विचारांचा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
