शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

किलबिल

अ .भारतीय म हा प मध्य मुंबई समूह क्रमांक २
उपक्रम क्रमांक २९१
अष्टाक्षरी काव्यलेखन
विषय ..किलबिल
  शीर्षक..चिवचिवाट 

सोनसळी किरणांची. 
झाली  सुंदर पहाट 
सुरू झाली किलबिल
गोड तो किलबिलाट .

होता झुंजूमुंजू पहा
 करी पक्षी कलरव
पाना पानातून  ऐका
अलवार त्यांचा रव

दाणे टिपण्या निघती
पक्षी पक्षीण नेमाने
पिले साद  ती घालती 
रोज सकाळी प्रेमाने 

उष‌काल  मनोहर
थंड मंद वाहे वारा
किती सुंदर दृश्य ते
पहा निसर्ग पसारा
 
 कोण सांगते खगांना
 चला उठा झाली ऊषा
  करूनिया किलबिल
 दावी, पहा  पूर्व दिशा   .             

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...