मीरा
मीरेचा गोपाल ।
वसे तो अंतरी ।
मनाच्या मंदीरी ।
सर्व काळ ।। 1
हरी नाम गोडी ।
तिला बालपणी ।
स्मरे तेच मनी ।
अविरत ।। 2
भजनी रंगूनी।
सदा मीरा दंग।
राही कृष्णा संग ।
मनोमनी ।। 3
मुखी सदा नाम ।
एकची अधरी ।
बोलली श्रीहरी ।
नित्यनेमे ।। 4
होई कृष्णमय ।
करिता साधना ।
करी उपासना ।
श्रीहरीची ।। 5
जळी स्थळी दिसे ।
तीज एक मात्र ।
कृष्णची सर्वत्र ।
घनश्याम ।। 6
श्रीहरीची पदे ।
मीराने रचली ।
सकले गायली ।
प्रेमभावे ।। 7
विष प्राशियता ।
कोण तिज मारी ।
वसे गिरीधारी ।
अंतरंगी ।। 8
कृष्णाच्या भक्तीत ।
आत्माचे अर्पण ।
प्राण समर्पण ।
करियले ।। 9
सहाक्षरी
यारिया साहित्य कला समूह
विषय- एक होती मीरा
मीरेचा गोपाल
वसे तो अंतरी
तया वीण तिचा
दुजा नसे हरी
मुखी सदा नाम
एकच अधरी
गोपाळाची भक्ती
घेतली पदरी
जळी स्थळी मीरा
गोपालच पाही
कृष्णाच्या भक्तीत
सदा लीन राही
विष पण प्याली
राजा तो गिरधारी
अंतरंगी वसे
कोण तिला मारी
नको तिला धन
मोतियांच्या सरी
भजनात रंगे
कृष्ण राहे उरी
सारे जन सांगे
झाली प्रेम वेडी
कृष्ण नामे तिने
बांधियली बेडी
एक होती मीरा
भक्तीत जाणिली
दुजी राधाकृष्ण
नामे ओळखिली
वैशाली वर्तक
अष्टाक्षरी
*होते जिवाला काहिली*
वेड लागले मीरेला
पाही जळी स्थळी हरी
दुजा कोणी नको तिज
कृष्ण नावच अधरी
नको तिजलासंपदा
गळा मोतीयांच्या सरी
भक्ती भजनात रंगे
गिरीधर राहे उरी
मनी भक्ती श्रीहरीची
होई जिवाची काहिली
हरी नाम सदा ओठी
गीते हरीची रचिली
हरी नामे विष प्याली
मनी राजा गिरधारी
तोची वसे अंतरंगी
मग कोण तिज मारी
एक अशी होती मीरा
जिला भक्तीत जाणिली
दुजी होती राधाकृष्ण
नामे जगी ओळखली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा