रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

चाहुल वसंत ऋतुची

चाहुल वसंताची


पाने टाकून पिवळी
वृक्षलता पहाती वाट
नव पर्णांची अगोपंगी
पहा बहरलेला थाट

संपली पानगळ आता
 निसर्ग सारा बहरेल
लेवून कोवळी पाने
अवनीचे रुप खुलेल

थंड वा-याची झुळूक
शहारेल अंगावर
तृण पाने डवरतील
फूले फुलती फांदीवर

मोहरेल बहावा पळस
फुटे पल्लवी वनो वनी
नव चैतन्याची सृष्टी
वसंत फुलेल मनोमनी

मोहरेल आम्रतरु
चला रानमाळ फिराया
ऐकून  कोकील कुजन कवि
आले वसंत ऋतु  वर्णाया .

वैशाली वर्तक


ओढ लागली लेखणीची

आजचा उपक्रम
अष्टाक्षरी रचना
 ओळ - ओढ लागली लेखणीची

रोज लिखाण करिता
ओढ लागली प्रेमाची
माया सहज जडली
लेखणीची कागदाची

ओढ खुणावी मनाला
काही तरी लिखाणास
सेवा करुया भाषेची
हीच मनी सदा आस

काव्य करितांना रोज
चाले शब्दांचाच खेळ
शब्द शब्द विचाराने
जमविते काव्य मेळ

मना मनातील गुज
सांगावया सोपी रीत
सहजची होते  व्यक्त
यात जडली ही प्रीत

हीच मागणी  शारदे
चित्ती राहो तव मूर्ती
ओढ लागली जीवाला
तूच दे मजला स्फूर्ती .
    ......वैशाली वर्तक  3/2/2020

वैशाली वर्तक

महिमा मकर सक्रांतीचा

स्पर्धे साठी--
महिमा संक्रातीचा

होते मकर राशीमधे
सूर्याचे या दिनी संक्रमण
वदती म्हणोनी मकरसंक्रात
पहिला असे हा वर्षाचा सण

महिमा असे संक्रातीचा
एकमेका तीळगूळ देण्याचा
मनीचा रूसवा दूर  सारुनी
नात्यातील गोडवा जपण्याचा

नको नुसता शब्दात गोडवा
स्निग्ध  गोड भाव जपू हृदयात
देऊन तीळ गूळ ऐकमेकाना
सदा ठेवू मैत्री जीवनात

विविध रंगी उडवीत पतंगी
आली उत्साहाची  संक्राती
 आनंद सुख समृद्धी  लाभूनी
यश मिळो तुला सदाच "क्रांती"

वैशाली वर्तक 15/1/2020

चाराक्षरी गुलाब




चाराक्षरी
मी गुलाब


मी गुलाब
माझा दिन
नसतो मी
कधी क्षीण


रंग  माझा
नसे एक
लाल श्वेत
ते अनेक

रुपाने मी
  समर्पक
गंध माझा
आकर्षक

सुगंधात
गुणवंत
दरवळे
आसमंत


कधी लाल
रंगी वसे
गणेशाला
प्रिय असे

राजा असे
मी फुलांचा
नेहरूंचा
तो लाडाचा

सर्व  फुले
देती मान
राजा मीच
माझी शान

वैशाली वर्तक

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

तुझी वाट पहाते रे

तुझी वाट  पहाते रे

कधी येशील गगनी वाट तुझी पहाते
निशेचा तम सारण्या  तुझी वाट पहाते

उमलतील कळ्या  आशा रुपी फांदीवर सकाळी
किलबील खगांची भासेल जणु गोड भुपाळी

तुझ्या येण्याने वहातील  नव चैतन्य वारे
सडे केशराचे पाहू नभी, विरता चमकते तारे

तुज अर्ध्य देण्या उभे जन सारे कधीचे
तुझ्या आगमनाने जाईल नैराश्य मनीचे

फाकलेल्या प्रभा त्या सहस्त्रकिरणांनी
तुला पहाताच मन प्रसन्न होते तव दर्शनानी

स्वर्ण रंगात येता आकाशी मिळे जीवन जनांना
 प्रफुल्लित मने जन म्हणती "प्रभात "त्या क्षणांना

वैशाली वर्तक




रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

गवळण

गवळण   2/2/2020


गोकुळाची तहान भुक हरपते श्रीहरीची नाद बासरी
मोहनची छबी पाहण्यासाठी  होई राधा गौळण बावरी

 कशी आवरु मम मनाला
नको भुल पाडू या राधेला
तव संगती येता क्षणभरी
मन गुंतते तुझ्याच अंतरी
मोहनाची छबी पाहण्यासाठी होई राधा गवळण  बावरी

जाता आम्ही मथुरेच्या वाटेवरी
दही दुध लोणी घेउनी बाजारी
वाट अडवितो हा खट्याळ कान्हा
सा-या गोपिकांना सदा छळतो भारी
मोहनाची छबी पाहण्यासाठी ,होई राधा गवळण बावरी

दही दुधाची  हा करितो चोरी
सवंगडी संगे मटकी हा फोडी
सांगतेच आता कान्हा तुझी खोडी
संभाळ ग यशोदे कान्हाला आता तरी
मोहनाची छबी पाहण्यासाठी होई राधा गवळण बावरी

    ....वैशाली वर्तक  2/2/2020






गोकुळाची तहान भुक, हरपते हरीची  बासरी       
मोहनाची छबी पाहता,   राधा गौळण होई बावरी
            


कशी आवरु मी मनाला.,नको भुल पाडू या राधेला.     19
येता तव संगे क्षणभरी. मन गुंतते तुझ्या अंतरी.          20
मोहनाची छबी पाहता , होई राधा गौळण  बावरी.    19


जाता आम्ही मथुरेला  हाती, दुध लोणी विकण्या बाजारी 20
वाट अडवी खट्याळ कान्हा, गोप गोपींना छळतो भारी.    20
मोहनाची छबी पाहता , होई राधा गौळण बावरी.              19


दही दुधाची करितो चोरी,सवंगडी संगे घट फोडी.        20
सांभाळ  यशोदे  कान्हयाला,  सांगतेच आता तुझी खोडी 20
मोहनाची  छबी पाहता ,होई राधा गौळण बावरी.     19

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद 

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...