गवळण 2/2/2020
गोकुळाची तहान भुक हरपते श्रीहरीची नाद बासरी
मोहनची छबी पाहण्यासाठी होई राधा गौळण बावरी
कशी आवरु मम मनाला
नको भुल पाडू या राधेला
तव संगती येता क्षणभरी
मन गुंतते तुझ्याच अंतरी
मोहनाची छबी पाहण्यासाठी होई राधा गवळण बावरी
जाता आम्ही मथुरेच्या वाटेवरी
दही दुध लोणी घेउनी बाजारी
वाट अडवितो हा खट्याळ कान्हा
सा-या गोपिकांना सदा छळतो भारी
मोहनाची छबी पाहण्यासाठी ,होई राधा गवळण बावरी
दही दुधाची हा करितो चोरी
सवंगडी संगे मटकी हा फोडी
सांगतेच आता कान्हा तुझी खोडी
संभाळ ग यशोदे कान्हाला आता तरी
मोहनाची छबी पाहण्यासाठी होई राधा गवळण बावरी
....वैशाली वर्तक 2/2/2020

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा