मंगळवार, १० जून, २०२५

ओळ काव्य मन मोहना तुझी बासरी

विश्व लेखकांचे 
उपक्रम ओळ काव्यलेखन 
ओळ.    *मन मोहना तुझी बासरी*
पहा कडव्यात पहिली दुस-या  2रीतसेत 3... 3 चौथ्या त चौथी


*मन मोहना तुझी बासरी*
वेड लावी गोकुळाला
 चारा खाणे विसरती गायी (पाडसे)
  भूल पडे जन  मनाला

होता कृष्ण मय राधा
*मन मोहना तुझी बासरी*
गोकुळवासी  येती ऐकण्या
 कृष्ण नाम असे अधरी

गवळण राधा करिते
अविरत हरिचे चिंतन
*मन मोहना तुझी बासरी*   
 ऐकून कृष्ण बोलती कंकण 

कशी आवरु मनाला
मन गुंतते तुझ्याच अंतरी
भुल  पाडे या राधेला
*मनमोहना तुझी बासरी*
              
 वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
;

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...