माझी कविता
माझी प्रिय सखी |
आहेची कविता ||
विचार सरिता |
वाहे सदा || १
गुज मनातील |
भावना अव्यक्त ||
करितसे व्यक्त |
सदा साठी || २
नकळत ओळी |
स्फुरती मनात ||
झरती क्षणात |
काव्यरुपी || ३
नेटक्या शब्दांची |
सुरेख बांधणी ||
ओळींची मांडणी |
कवितेची || ४
चाले शब्द खेळ |
शब्दांना आकार ||
कविता साकार. |
होत असे. || ५
भाव भावनांचे |
जीवनी ओधळ ||
शब्दांनी ओंजळ |
भरितसे ||. ६
मधाळ शब्दात |
कधी प्रबोधन ||
संस्कार जतन |
तीच करी. ||. ७
नित्याचे जाहले |
स्फुरते सहज ||
विषय गरज |
तिज नसे ||. ८
कविता रचिता |
मिळे सुख भारी ||
मनास उभारी |
मिळतसे ||. ९
कविता देतसे |
आत्म समाधान ||
शारदेचे दान |
मजलागी. ||. १०
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा