*उपक्रमासाठी*
सावली प्रकाशन समूह
काव्य लेखन
विषय -तूच माझे काळीज
प्रेमभाव
आई देते जन्म बाळास
स्वतः कडे करून दुर्लक्षित
मनी एकच विचार
कसा राहिल तो सुरक्षित
जरा होता दुखापत
उद्गार निघे मुखातून
*तूच माझे काळीज*
अश्रू निघे डोळ्यातून
बालक होता जरी मोठा
जीव जडे काळजात
काळजाचा माझ्या तुकडा
म्हणत प्रेम करे अतोनात
माता असे प्रेमाचा सागर
सदा मनी असे जिव्हाळा
प्रेम देई घागर भरुनी
हृदयी भरला उमाळा
आई असो कोणाचीही
मग असो पशु प्राण्यांची
तूच माझे काळीज
हीच भावना सर्वांची
वैशाली वर्तक
अहमदाबाद
काव्य प्रकार अष्टाक्षरी
शीर्षक- **तव महिमा**
उच्चारता शब्द आई
फुटे मायेचा पाझर
भरलेला सदा साठी
दया कृपेचा सागर
धरुनीया तीचे बोट
टाकी पाऊल जगती
तिच्या संस्कार पुंजीने
आज साधली प्रगती
होता जीव कष्टी कदा
आई शब्द येई मुखी
स्वामी तिन्हीही जगाचा
नाही आई, नाही सुखी
जसे घडविण्या घडा
देती मातीला आकार
करी संस्कारी बाळांना
घेउनीया कष्ट फार
किती वर्णू आई गुण
तव मायेची ती गाथा
तुझी थोरवी महान
नमवितो माझा माथा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सुधारित रचना👆🏼
खूप धन्यवाद मार्गदर्शनासाठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा