गुरुवार, ३ मार्च, २०२२

फूलले हे क्षण माझे. दोन ध्रुवावर आपण

फूलले हे क्षण माझे


  माझ्या मनीच्या इच्छा 
केल्या पूर्ण  सहजीवनी
 साथ  तुझी  मिळता
 भाग्यवान वाटे मनी

भाव मम अंतरीचे
तू जीवनी जाणिले
सहज देत हात हाती
सप्त रंगी  रंगविले


सहवास तुझा माझा
प्रीत गंध पसरला
एकमेका देत साथ
संसार ही फुलवला


आहे मज समाधान
दिधले तू सर्व  काही
भर भरुनी जीवनी
मागणे उरत नाही


फूलले हे क्षण माझे
तव कृपा प्रसादाने
मन माझे आनंदले
जगले जीवन मोदाने

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



दोन ध्रुवावर दोघे आपण

जरी असूनही दूर 
प्रेम भाव तो अंतरी
मनाने जगतो सदैव 
नाम तुझेच अधरी 

देवाने दिधले तन
डोळे कान अवयव
करिती काम अविरत
जरी भेटीचा अभाव

राहूनी दूर जरीअक्ष
पाणी झरे  दोन्ही नयनी
ऐकता दुख बातमी
तेच चाले  अपुल्या जीवनी

 एकमेका   देती जिव्हाळा
सुख दुःखात मिळूनी साथ
 भासे न कधी दुःखाचा उन्हाळा 

दोन जीव दोन कुळाचे
बांधले जातात रेशीम गाठींनी
सहजीवन आनंदी करीती 
साथ देत  तडजोडींनी

  सहजीवन सुखी होण्या
  असे   धागा  विश्वासाचा  
  देण्या  सुखाच्या घागरी
  रेशीम गाठीत महत्त्वाचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

परिचारिका

जगाचा पोशिंदा समूह आयोजित उपक्रम  दि ७\५\२६ विषय परिचारिका  सेवा रूग्णांची करणे गुणाने असे मायाळु नसे ठाऊक आराम स्वभावाने ती दयाळु परिचारिका...